तरुण तेरे तेज का आवाहन है!

0 1,320

‘ आदमीने मरने के बादही एक चौकट मे रहना चाहिए’
असा जिंदगी ना मिलेगी दोबारा मधील संवाद आठवितो का?

एकदा हे वाक्य स्वतःला विचारून पहा की ते आपल्याला लागू पडत का?

आणि लक्षात येईल की आपण स्वत: भोवती विचारांचे एक जाळे गुंतवुन घेतो आणि त्यातच समाधान मानुन आपले तेवढेच विश्व मानुन त्यात जगत असतो; त्यातुन बाहेर पडायचा साधा विचार सुध्दा आपल्या मनाला शिवत नाही.

या चौकटीचा एवढा पगडा असतो की चौकटीची मर्यादा माहीत असूनही आपण ती भेदुन जाण्याकरिता किंवा वाढविण्याकरिता आपण साधा प्रयत्नसुध्दा करीत नाही आणि मग परिस्थिती वा नशीबावर खापर फोडुन मोकळे होतो.

वास्तविकत: केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहीजे
अशी प्रयत्नवादाची भूमिका आपण कधी स्विकारतच नाही.

बरे या चौकटीचे आणखी एक वैशिष्ट्य ते म्हणजे ही जी चौकट असते ना ती आपल्या क्षमतेवर न बनविता आपण आपल्या आजुबाजुला
असणा-यांनुसार ती बनवितो.
सुख दुख यश अपयश सुध्दा मग आपण आपल्या
सभोवताली असलेल्या बोन्साय मनोवृत्ती वर आकलन करत असतो वा मनवित असतो.

आणि या सगळ्या जग रहाटीत ख-या जगण्याच्या आनंदापासुन आपण अलिप्त राहतो.
आणि सुप्त मनात जे जगायचं असत ते राहुन गेलं असत.

मग हेच जिवन आहे का?

नाही, कुठे तरी अंतरमनात ङोकावुन पहावे लागेल,
आपल्या जगण्याचे उद्दीष्ट शोधावे लागेल,
आणि मग निश्चितपणे चाकोरीबध्द जिवनाच्या बाहेर पडून यशोमार्गावर क्रमण करता येईल.

तोडुनी देवु ही परवशतेची शृखंला।
उद्युक्त होवुया निश्चित ध्येय गाठाया।।

अभिजित कोठीवान

Leave A Reply

Your email address will not be published.