पु. ल. देशपांडे

0 1,871

आज आठ नोव्हे. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांची जयंती पु.लं. चा जन्म 8 नोव्हेंबर 1919 रोजी झाला महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन कॉलेज पुणे व सांगली येथील विलिंग्टन विलिंग्डन कॉलेज येथे झाले महाराष्ट्राच्या साहित्यिक जडणघडणीमध्ये पुलंचा सिंहाचा वाटा आहे,त्यांनी साहित्य, चित्रपट, नाटक क्षेत्रामध्ये अनमोल कार्य केलेत. त्यांनी शिल्पचित्र, संगीत, अभिजात साहित्य, तत्त्वज्ञान अशा विषयांशी निगडित चिंतन खेळकरपणे मांडले, त्यांनी गुळाचा गणपती या चित्रपटांमध्ये अभिनय दिग्दर्शन व पटकथा लेखन केले. दूध नवरा-बायको देवकाते चित्रपटांत अभिनय केले तसेच वाऱ्यावरची वरात, असा मी असामी, अशा कार्यक्रमांमध्ये अभिनय सादर केला त्यांनी व्यक्ती आणि वल्ली गणगोत असे व्यक्तिचित्रणात्मक लेखन केले. पु ल देशपांडे यांची जीवनसृष्टी यांना व्यक्त झाली आहे त्यांच्या साहित्यात महाराष्ट्रात झपाट्याने उदयास आलेल्या मध्यमवर्ग सारख्यांच्या संवेदना निर्दशनास येतात तसेच समाजाच्या तसेच समाजाचे जिवंत चित्रण आढळून येते जीवनाच्या सर्वच क्षेत्रांना स्पर्श करणारे साहित्य पुलंनी लिखित केलेले आहे. त्यांनी जवळपास चाळीस पुस्तके लिहिली बटाट्याची चाळ,असा मी असामी, व्यक्ती आणि वल्ली,नसती उठाठेव, गोळाबेरीज हसवणूक ही त्यांची गाजलेली पुस्तके. त्याच्या आवृत्त्या निघाल्या पूर्वरंग अपूर्वाईतून त्यांनी प्रवास वर्णने लिहिली आहेत तुझ आहे तुजपाशी, अंमलदार सुंदर मी होणार, तीन पैशाचा तमाशा, फुलराणी, इत्यादी नाटके लिहिली. गुण गाईन आवडी मैत्र आपुलकी इत्यादी, व्यक्ती आहेत तसेच काही पुस्तकांचे अनुवाद सुद्धा केले. तसेच त्यांनी लिहिलेली बटाट्याची चाळ असा मी असामी यांचे एकपात्री प्रयोग सुद्धा केलेत. कवितावाचनाचे कार्यक्रमातून तर त्यांनी धमाल केली. साहित्यासोबतच महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळींशी सुद्धा त्यांचा जवळचा संबंध आलेला आहे. रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतन आणि बाबा आमटे यांचे आनंदवन सोबत त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. महाराष्ट्राच्या सार्वजनिक क्षेत्रांमध्ये काम करणारा एक प्रतिभावंत लेखक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते त्यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मश्री, पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. तसेच पोस्ट खात्याची तिकीट काढून त्यांचा सन्मान केला आहे. अशा या महाराष्ट्राच्या सर्वसमावेशक व्यक्तिमत्वाचा 12 जून 2002 रोजी निधन झाले.
त्यांना भावपूर्ण आदरांजली..

Leave A Reply

Your email address will not be published.