सूर्यनमस्कार..!
आपल्या प्राचीन ऋषी मुनींनी (शास्त्रज्ञांनी) आपल्याला दिलेली अमृततुल्य देणगी म्हणजे सूर्यनमस्कार.!
आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टीने सूर्य उपासनेचे महत्व आहे.
सूर्यनमस्कारच्या माध्यमाने सूर्योपासना आणि त्यामाध्यमाने जीवनाचे कल्याण साधण्याचा मार्ग म्हणजे सूर्यनमस्कार होय. स्वतःचे शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी तसेच भौतिक आणि आध्यात्मिक प्रगती साधण्यासाठी सुर्यनमस्काराचे अनन्य साधारण असे महत्व आहे. निसर्गातील सजीव सृष्टी मध्ये जे चैतन्य आहे त्याचा उगम सूर्या पासून आहे असे मानले जाते. त्यामुळे सुर्योपासनेला मानवी जीवनाच्या कल्याणासाठी जोडले पाहीजे या चिंतनातून सुर्यनामस्काराची निर्मिती आपल्या थोर ऋषी मुनींनी केली आणि त्या नंतर अनेक सत्पुरुषांनी सूर्यनमस्कार हा आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग व्हावा यासाठी अनेकानेक प्रयत्न केलेत. त्याचीच फलश्रुती म्हणून आणि सूर्यनमस्कार हे सकल मानवी जीवनाच्या कल्याणाचे साधन व्हावे असे मानून, त्याचा प्रचार प्रसार सम्पूर्ण विश्वातील अधिकाधिक लोकांपर्यंत व्हावा आणि प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या आयुष्यात या साधनेच्या माध्यमाने उन्नती साधावी या हेतूने 26 जानेवारी या तारखेला जागतिक सूर्यनमस्कार दिवस साजरा केला जातो.
हिंदू धर्मामध्ये सूर्याला देवता मानले आहे. सूर्य उपासना ही सूर्य स्तुती किंवा गायत्रीच्या स्वरूपात केली जाते. त्यामुळे
”आयुप्रज्ञाबलंविर्यमंतेजतेशाच्यजायते ” म्हणजेच
आयु,प्रज्ञा, बल, विरता, तेज अशा शक्तींचा विकास होतो ही सिद्धता आहे.
भारतात अनेक ठिकाणी सुर्यमंदिरे आहेत. सौराष्ट्रातील वेरावळ, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, नेपाळ, कोणार्क इ. ठिकाणी सूर्यमंदिरे आहेत. तसेच महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यात कशेळी या गावी देखील शेकडो वर्षांपासून असलेले हे सूर्य मंदिर खूप सुंदर आहे.
तसेच रथसप्तमीला म्हणजेच माघ महिन्यातील सप्तमी ला घराघरात सूर्य पूजा केली जाते.
सूर्यनमस्कार च्या सुरुवातीला मंत्र म्हटले जातात आणि सूर्यनमस्कार घालतांना जी आसने केली जातात त्यांचा आपल्या शरीरातील प्रत्येक चक्राशी संबंध येतो. तो पुढील प्रमाणे
क्र. मंत्र आसन
१.मित्राय नमः अनाहत चक्र
२.रवये नमः विशुद्ध चक्र
३.सूर्याय नमः स्वाधिष्ठान चक्र
४.भानवे नमः आज्ञा चक्र
५.खगाय नमः विशुद्ध चक्र
६.पुष्णे नमः मणिपूर चक्र
७.हिरण्यगर्भाय नमः स्वाधिष्ठान चक्र
८.मरीचये नमः विशुद्ध चक्र
९.आदित्याय नमः आज्ञा चक्र
१०.सवित्राय नमः स्वाधिष्ठान चक्र
११.अर्काय नमः विशुद्ध चक्र
१२.भास्कराय नमः अनाहत चक्र.
मंत्र आणि सूर्यनमस्कार सोबत घातल्यास आरोग्य लाभते दीर्घायुषी होते, कार्यक्षमतेचा विकास होतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात आहारातील विसंगतता आणि येणारं नैराश्य या मुळे बिघडणारे आयुष्य या पासून सुरक्षितता मिळते. सुर्यनमस्कारा मुळे आयु-बल-बुद्धिचा विकास होतो. मस्तक, दोन डोळे, मान, दोन हात, छाती, पोट, कंबरेचे स्नायू, मेरूदंड, दोन पाय, गुढघे, पायाची बोटे, सांधे यांना व्यायाम घडतो. पोटाचे जडत्व, अनावश्यक वाढलेला मेद, ओटीपोटातील चरबी, थायरॉईडसारखे विकार, मुलांचे फिरलेले हातपाय व काही हाडांचे दोष, गंडमाळा, घशातील विकार नाहिेसे होतात. क्षय रोगा पासून संरक्षण मिळते, मनोबलामध्ये वाढ होते. शरीरात शुद्ध रक्ताचा सम प्रमाणात संचार होतो. म्हणजेच शरीराचा,मनाचा आणि बुद्धीचा विकास होतो.
हे फायदे फक्त हिंदूंनाच होतात असे नसून जो कोणी व्यक्ती सूर्यनमस्कार घालेल त्यांना असे असंख्य फायदे होतात.
जो आपला दाता आहे, जाच्यामुळे आपली उन्नती होते जीवन सुखकर होते त्या कुणालाही देवता त्याच्या प्रति आदरभाव, कृतज्ञता व्यक्त करणे हे गैर नाही.
मग ते सूर्य, वायू, जल, आकाश, माती, असो की गंगा किंवा गाय असो त्या सर्व बाबी वंदनीय असाव्यात.
श्री सूर्यनारायण भगवान आपल्याला सर्वांना ओज,तेज,बल प्रदान करो ही प्रार्थना।
।। ओम् श्रीसवीतृसूर्यनारायणायन म:हा ।।