योगेश सोमण यांची मुस्कटदाबी कितपत योग्य?

0

          स्वातंत्रवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याच्या चर्चेवरून देशात कांग्रेसकडून गदारोळ निर्माण करून गोंधळ घातला जात आहे. वीर सावरकरांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत तसेच त्यांच्या राष्ट्रकार्यावर संशय घेण्याचा दुर्दैवी आणि शेण चिवडण्याचा प्रकार देशात अनेक वर्षा पासून सुरू असून आता तीव्र करण्यात आलेला आहे राहुल गांधी,मणिशंकर अय्यर काही स्वंयघोषित दुटप्पी पुरोगामी मंडळी अशा असंख्य काँग्रेसी मंडळी अनावश्यक टिपाटिप्पणी करून वीर सावरकरांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे आणि अशा कृती मधून समाजात फुट निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे सावरकरां प्रति कृतज्ञता व्यक्त करण्या ऐवजी त्यांची घोर अवहेलना करण्याची खेळी खेळल्या जात आहे आणि ही खेळी कितपत योग्य आहे ? याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. वीरसावरकर उच्चकोटीचे देशभक्त होते आणि समाज सुधारक सुद्धा होतेपणराहुलगांधी यांचे कडून वीरसावरकरयांची सतत बदनामी होत असून अपमान करणारे बेताल वक्तव्य केली जात आहेत व केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर समाजाकडूनमाफी मागणीचा विषय आला तेव्हा “मै राहुल गांधी हू सावरकर नही” असे निर्लज्ज वक्तव्या करून वाद निर्माण केलाआहे. वीर सावरकरांच्या बदनामीच षढयंत्र सुरू ठेवले आहे.

            हे कारस्थान सुरू असतांना मुंबई विद्यापीठामध्ये थेटर आर्ट्स विभागाचे संचालक योगेश सोमण यांनी राहुल गांधी यांच्या प्रश्नाला इतिहासिक पुराव्याच्या आधारे सोशल मीडियावर उत्तर दिले आहे त्यांचे उत्तर सावरकर विरोधी मंडळीना इतके झोंबले की त्यांच्या बुडाला आग लागून योगेश सोमण यांना मुंबई विद्यापीठामधून सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. योगेश सोमण यांना सक्तीच्या रजेवर पाठविने म्हणजे सरळसरळ अभिव्यक्ती स्वतंत्रयाची मुस्कटदाबी किंवा गळचेपी होय तसेच योगेश सोमण यांच्यावरील अन्याया विरोधात विवेक विचार मंच कार्यक्रत्यांनी शिवाजी पार्क दादर येथे दि.22 जाने रोजी सभा घेण्याची पोलिसाकडे रीतसर परवानगी मागितली होती पण पोलिसांनी परवानगी नाकारून सभा घेतल्यास कडक कारवाईची भाषा केली आहे. वास्तवमध्ये विवेक विचार मंच राष्ट्राला समर्पित कार्यकर्त्याचा मंच असून पुण्याचे माजी खासदार प्रदीपदादा रावत यांच्या नेतृत्वात सामाजिक जाणिवेने कार्यरत आहे. विवेक विचार मंचला सभेची परवानगी नाकारणारी पोलिस यंत्रणा रजा अकादमी पासून संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झालेल्या सी.ए.बी.च्या विरोधात मोर्चा काढण्यास “फ्री-कश्मीर”फलक झळकविणाऱ्या मोर्चाना परवानगी दिली जाते मग विवेक विचार मंच ला परवानगी का देण्यात आली नाही?  असा संतप्त प्रतिक्रिया सोशलमीडिया तथा सामाजिक कार्यक्रत्यामध्ये उमटली आहे.

            वीर सावरकर यांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा, त्यांना भारतरत्न देऊ नयेअसा वाद सुरू असतांना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी धाडसी वक्तव्य केले आहे. सावरकर यांना विरोध करणाऱ्यांना अंदमानच्या तुरुंगामध्ये दोन दिवस ठेवा असे आव्हान करून कांग्रेसची गोची केलीआहे. संजय राऊत यांनी अनेक वेळा वीर सावरकर यांचा गौरवपूर्ण उल्लेख केलेला आहे पण आता राज्यात आघाडी सरकार असल्याने त्यांच्या वक्तव्याला फारशी किंमत देण्यातआली नाही. उलट कांग्रेस मध्ये त्यांच्या वक्तव्याची गरमागरम चर्चा सुरू झाली असून अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार यांनी आपली वीर सावरकर विरोधी भूमिका कायम ठेवून सावरकरांच्या देशभक्ती विषयी संशय उपस्थित केला आहे वीर सावरकर यांच्या भारतरत्न चर्चेच्या पार्श्वभूमीवर खा. संजय राऊत यांनी केलेलं वक्तव्य कांग्रेसकडून होत असलेला गदारोळ आणि योगेश सोमण यांची सोशल मीडियावरील प्रतिक्रिया तसेच मुंबई विद्यापीठाने त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविणे, विवेक विचार मंचच्या योगेश सोमण समर्थन सभेला पोलिसाकडून परवानगी नाकारणे हा सर्व घटनाक्रम समाजात गोंधळ निर्माण करणारा आहे. शेवटी योगेश सोमण यांना मुंबई विद्यापीठाकडून सक्तीच्या रजेवर पाठविणे आणि त्यांच्या समर्थन सभेला परवानगी नाकारणे मुस्कट दाबी आहे आणि पुरोगामी महाराष्ट्रमध्ये अशी मुस्कटदाबी कितपत योग्य आहे ? याचा विचार करणे अगत्याचे ठरेल.

अशोक राणे, अकोला

भ्र 9423658385

Leave A Reply

Your email address will not be published.