वसंतपंचमी

0
बासर येथील सरस्वती

वसंत पंचमी माघ शुध्द पंचमीला असते. वसंत ऋतूची चाहूल लागलेली आहे तर त्या पर्वावर हा सण साजरा करतात. वसंत पंचमीला विद्येची देवता सरस्वतीचे पूजन करून विद्यार्थ्यांनी वरदहस्त मिळवायचा असतो. या सृष्टीची निर्मिती श्री ब्रम्हदेवांनी श्री विष्णुंच्या सहमताने केली पण सृष्टीत चैतन्य नव्हते, वेग नव्हता मग ब्रम्हदेवांनी कमंडलूतून पाणी शिंपडलं आणि वृक्षांच्या तिथे एक सुंदर चतुर्भूज देवी प्रकटली,एका हातात वीणा तर दुस-या हाताची मुद्रा आणि पुस्तक अशा या देवीला ब्रम्हदेवांना वीणा वाजवायला सांगितली आणि काय चमत्कार सृष्टीला संगीत मिळाले, झरे,धबधबे ,हवा सर्वांनी आपापल्या आवाजाच्या किमयेने सृष्टीला भारावून सोडले. बागेश्वरी म्हणजेच सरस्वती. “प्रणोदेवी सरस्वती वाजेभिर्वजिनीवती धीनमणित्रयुक्त” म्हणजेच ही चैतन्य आहे,सरस्वती च्या रूपात आपली बुध्दी, प्रज्ञा आणि मनोवृत्ती सुरक्षित आहे. आपण जे आचार विचार करतो याला आधार भगवती सरस्वतीच आहे.सरस्वतीचे स्वरूप चमत्कारिक आहे. पुराणात श्रीकृष्णाने सरस्वतीला वरदान दिले आणि वसंत पंचमीला तुझी पूजा केली जाईल हे सांगितले. सरस्वती काय शारदा काय एकच असे बरीच नावं आहेत. प्रथमं भारती नाम द्वितियं च सरस्वती तृतीयं शारदादेवी चतुर्थं हंसवाहिनी पंचमं जगती ख्याता षष्ठं वागीश्वरी तथा सप्तमं कुमूदी प्रोक्ता अष्टमं ब्रम्हचारिणी नवं बुध्दीदात्री च दशं वरदायिनी एकादशं चंद्रकान्ति द्वादशं भुवनेश्वरी यः पठेन्नरः जिव्हाग्रे वसते नित्यं ब्रम्हरूपा सरस्वती! किती सुंदर नावं आहेत आणि त्
आपल्या जिभेवर सरस्वती असते बरं म्हणूनच तोंडातून शब्द बाहेर पडताना तोलून मोलून बोलावं असं म्हणतात कारण शब्द परत घेता येत नाहीत म्हणून वाणी नेहमी शुद्ध हवी. महाभारतात ,रामायणात पण उल्लेख आहेच. अहंकारी रावणाचे मर्दन करण्यासाठी रामावतार झालाआणि राज्याभिषेक होणार तितक्यात मंथरेच्या जिभेवर सरस्वती बसते आणि वाईट अपशब्द निघतात असं म्हणतात, अर्थात हे सर्व आधीच ठरलेलं होतं देवांचं आणि मग वनवास चौदा वर्षांचा पुढे सीतेचे अपहरण आणि नंतर युध्द रावणासोबत आणि मर्दन रावणाचे. माझ्या माहितीप्रमाणे श्री सरस्वतीचे मंदिर आंध्र प्रदेशात,बासर येते गोदेकाठी वसलेले आहे आणि मंदिर खूपच सुंदर आहे.काळ्या पाषाणातली सरस्वतीची रेखीव मूर्ती तेजःपुंज अशी आहे. लहान मुलं जेव्हा प्रथम शाळेत जायला लागतात त्यापूर्वी या मंदिरात त्यांच्या शिक्षणाचा पाटीवर श्रीगणेशा केला जातो. श्री गणेशाचे नाव लिहून मुलाच्या हाताने सरस्वती देवीची आराधना केली जाते. किती छान संकल्पना आहे नं ,ब-याच मुलांना आम्ही बघीतले होते हे पुजन करताना, असं केल्याने बुद्धी प्रगल्भ होते,मुलं हुशार होतात पण आजकालच्या मुलांना अडीच वर्षाचे होत नाही तर प्ले स्कूल ,नर्सरी,लोअर केजी,अप्पर केजी या चक्रात अडकवले जाते. मुलांच्या मानसिकतेचा विचार केला जात नाही ही खूपच खेदजनक बाब आहे. ठराविक वयात मुलांची ग्रहणशक्ती वाढते ,अभ्यास करण्यासाठी मन तयार होत असतं पण आजकालच्या स्पर्धेच्या युगात कोणाला सांगून उपयोग नाही तरी त्यांनी मुलांचा विचार करावा ,त्यांना बालपण मुक्त हसतखेळत जगण्याचा हक्क आहे, सर्वगुणसंपन्न च्या नादात त्यांना उन्हाळ्यातही विविध समर क्लासेस मध्ये अडकवून ठेवले जाते. मैदानी खेळ खेळण्याच्या वयात संगणक,भ्रमणध्वनी हातात दिल्याने डोळे कमजोर होत आहेत. तशीही आजची पिढी खूपच हुशार आहे पण म्हणून त्यांच्या वयाचा विचार करून असे जर सरस्वतीदेवीचे संस्कार करत श्रीगणेशा कराल शिक्षणाचा तर वय आणि मन दोन्ही तयार असेल त्यामुळे नवचैतन्याने झपाटतील मुलं हा विचार अवश्य करावा. सरस्वती संगीताचे आराध्य दैवत आहे. कोणाला गोड गळा लाभला असेल तर आपण म्हणतो नं सरस्वती विराजमान आहे ते अगदी खरंय. आजच्या वसंत पंचमीला याच सरस्वती देवीचे पूजन करून तिला सृष्टीचं हे मधुर संगीत सर्वत्र निनादू दे आणि सृष्टी अशीच बहरत राहू देत म्हणून आर्जव केली जाते. पाटीवर जेव्हा श्रीगणेशा होईल तेही सरस्वती देवीच्या साक्षीने तेव्हा सर्वच मुलांना शिक्षणाची गोडी लागेल अथवा लागावी हाच उद्देश जरी डोळ्यासमोर ठेवून तरी एकवेळ अवश्य जाऊन मुलांच्या प्रगतीचा विचार कराच असंच म्हणत हे स्तवन म्हणूया,”याकुन्देदूतुषारहार धवला या शुभ्रवस्त्रान्विता याब्रम्हाच्युत शंकर प्रभृतिभिःदैवे सदावन्दिता सामांपातुसरस्वती भगवति निःशेषजाढ्या पहा!!”. सौ.स्नेहा सुनिल लाडसावंगीकर नाशिक “प्रणोदेवी सरस्वती वाजेभिर्वजिनीवती
धीनमणित्रयुक्त” म्हणजेच ही चैतन्य आहे,सरस्वती च्या रूपात आपली बुध्दी, प्रज्ञा आणि मनोवृत्ती सुरक्षित आहे. आपण जे आचार विचार करतो याला आधार भगवती सरस्वतीच आहे.सरस्वतीचे स्वरूप चमत्कारिक आहे. पुराणात श्रीकृष्णाने सरस्वतीला वरदान दिले आणि वसंत पंचमीला तुझी पूजा केली जाईल हे सांगितले. सरस्वती काय शारदा काय एकच असे बरीच नावं आहेत. प्रथमं भारती नाम द्वितियं च सरस्वती तृतीयं शारदादेवी चतुर्थं हंसवाहिनी पंचमं जगती ख्याता षष्ठं वागीश्वरी तथा सप्तमं कुमूदी प्रोक्ता अष्टमं ब्रम्हचारिणी नवं बुध्दीदात्री च दशं वरदायिनी एकादशं चंद्रकान्ति द्वादशं भुवनेश्वरी यः पठेन्नरः जिव्हाग्रे वसते नित्यं ब्रम्हरूपा सरस्वती! किती सुंदर नावं आहेत आणि त्
आपल्या जिभेवर सरस्वती असते बरं म्हणूनच तोंडातून शब्द बाहेर पडताना तोलून मोलून बोलावं असं म्हणतात कारण शब्द परत घेता येत नाहीत म्हणून वाणी नेहमी शुद्ध हवी. महाभारतात ,रामायणात पण उल्लेख आहेच. अहंकारी रावणाचे मर्दन करण्यासाठी रामावतार झालाआणि राज्याभिषेक होणार तितक्यात मंथरेच्या जिभेवर सरस्वती बसते आणि वाईट अपशब्द निघतात असं म्हणतात, अर्थात हे सर्व आधीच ठरलेलं होतं देवांचं आणि मग वनवास चौदा वर्षांचा पुढे सीतेचे अपहरण आणि नंतर युध्द रावणासोबत आणि मर्दन रावणाचे. माझ्या माहितीप्रमाणे श्री सरस्वतीचे मंदिर आंध्र प्रदेशात,बासर येते गोदेकाठी वसलेले आहे आणि मंदिर खूपच सुंदर आहे.काळ्या पाषाणातली सरस्वतीची रेखीव मूर्ती तेजःपुंज अशी आहे. लहान मुलं जेव्हा प्रथम शाळेत जायला लागतात त्यापूर्वी या मंदिरात त्यांच्या शिक्षणाचा पाटीवर श्रीगणेशा केला जातो. श्री गणेशाचे नाव लिहून मुलाच्या हाताने सरस्वती देवीची आराधना केली जाते. किती छान संकल्पना आहे नं ,ब-याच मुलांना आम्ही बघीतले होते हे पुजन करताना, असं केल्याने बुद्धी प्रगल्भ होते,मुलं हुशार होतात पण आजकालच्या मुलांना अडीच वर्षाचे होत नाही तर प्ले स्कूल ,नर्सरी,लोअर केजी,अप्पर केजी या चक्रात अडकवले जाते. मुलांच्या मानसिकतेचा विचार केला जात नाही ही खूपच खेदजनक बाब आहे. ठराविक वयात मुलांची ग्रहणशक्ती वाढते ,अभ्यास करण्यासाठी मन तयार होत असतं पण आजकालच्या स्पर्धेच्या युगात कोणाला सांगून उपयोग नाही तरी त्यांनी मुलांचा विचार करावा ,त्यांना बालपण मुक्त हसतखेळत जगण्याचा हक्क आहे, सर्वगुणसंपन्न च्या नादात त्यांना उन्हाळ्यातही विविध समर क्लासेस मध्ये अडकवून ठेवले जाते. मैदानी खेळ खेळण्याच्या वयात संगणक,भ्रमणध्वनी हातात दिल्याने डोळे कमजोर होत आहेत. तशीही आजची पिढी खूपच हुशार आहे पण म्हणून त्यांच्या वयाचा विचार करून असे जर सरस्वतीदेवीचे संस्कार करत श्रीगणेशा कराल शिक्षणाचा तर वय आणि मन दोन्ही तयार असेल त्यामुळे नवचैतन्याने झपाटतील मुलं हा विचार अवश्य करावा. सरस्वती संगीताचे आराध्य दैवत आहे. कोणाला गोड गळा लाभला असेल तर आपण म्हणतो नं सरस्वती विराजमान आहे ते अगदी खरंय. आजच्या वसंत पंचमीला याच सरस्वती देवीचे पूजन करून तिला सृष्टीचं हे मधुर संगीत सर्वत्र निनादू दे आणि सृष्टी अशीच बहरत राहू देत म्हणून आर्जव केली जाते. पाटीवर जेव्हा श्रीगणेशा होईल तेही सरस्वती देवीच्या साक्षीने तेव्हा सर्वच मुलांना शिक्षणाची गोडी लागेल अथवा लागावी हाच उद्देश जरी डोळ्यासमोर ठेवून तरी एकवेळ अवश्य जाऊन मुलांच्या प्रगतीचा विचार कराच असंच म्हणत हे स्तवन म्हणूया,”याकुन्देदूतुषारहार धवला या शुभ्रवस्त्रान्विता याब्रम्हाच्युत शंकर प्रभृतिभिःदैवे सदावन्दिता सामांपातुसरस्वती भगवति निःशेषजाढ्या पहा!!”. सौ.स्नेहा सुनिल लाडसावंगीकर नाशिक

 

Leave A Reply

Your email address will not be published.