प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे देशाला संबोधन

करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर

1

*कोरोनाविरुद्धच्या लढाईत मा. पंतप्रधानांनी आजच्या राष्ट्र संदेशात दिलेली सप्तपदी…*

*पहिला संदेश-*
आपल्या घरातील वयोवृद्धांची काळजी घेणे. विशेषतः जे आजारी आहेत. त्यांची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे. त्यांना कोरोनापासून वाचवायचे आहे.

*दूसरा संदेश-*
लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्स च्या लक्ष्मण रेषेचे काटेकोर पालन कार्याचे आहे. घरामध्ये फेस कव्हर किंवा मास्क चा वापर अनिवार्य करणे.

*तीसरा संदेश-*
आपली प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आयुष मंत्रालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन करणे. गरम पाणी, काढा इ. चे सेवन करणे.

*चौथा संदेश-*
कोरोना संक्रमण रोखण्यासाठी मदक्त करण्यासाठी आरोग्य सेतू ऍप आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे व इतरांनाही हे ऍप डाऊनलोड करण्यास सांगणे.

*पाचवा संदेश -*
जितकी शक्य होईल तितकी गरीब परिवाराची काळजी घ्यावी, त्यांच्या भोजन, अन्न धान्याच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा.

*सहावा संदेश-*
आपण आपल्या कामावरील, व्यवसायातील सहकाऱ्यांच्या प्रति सहानुभूती बाळगून कोणासही कामावरुन काढू नये.

*सातवा संदेश-*
देशातील कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या राष्ट्र रक्षक असलेले डॉक्टर्स, नर्सेस, स्वच्छता कर्मचारी, पोलीस कर्मचारी या साऱ्यांचा आदर करावा. पूर्ण निष्ठेने 3 मे पर्यंत लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करावे. जिथे आहात तिथे सुरक्षित राहावे.

 

1 Comment
  1. Alex says

    I love what you guys are up too. Such clever work and coverage!
    Keep up the awesome works guys I’ve incorporated you guys to blogroll.

Leave A Reply

Your email address will not be published.