मी अनुभवलेला…. LAW OF ATTRACTION!

1 405

मी अनुभवलेला…. LAW OF ATTRACTION!

“LAW OF ATTRACTION ” किंवा “आकर्षणाचा सिद्धांत” हा एक लोकप्रिय विषय किंवा विचारधारा आहे. आकर्षण सिद्धांतानुसार, आपल्या बाबतीत जे घडते तेच आपण मानतो किंवा विश्वास ठेवतो. म्हणजेच आपला विचार किंवा विश्वास नेहमीच वास्तविकता बनतो.

LAW OF ATTRACTION एक नैसर्गिक सत्य आहे. जेव्हा आपल्याला प्रामाणिक मनाने काहीतरी हवे असते तेव्हा एक आश्चर्यकारक नैसर्गिक शक्ती आपले ध्येय साध्य करण्यात मदत करते.

आपल्या सर्व अडचणी दूर होऊ लागतात आणि सर्व बंद दारे आपोआप उघडतात.

मी आकर्षण कायद्याचा अनुभव माझ्या आयुष्यात बर्‍याचदा अनुभवला आहे आणि ते एक सार्वत्रिक सत्य आहे. काल (03/05/20) रोजी दूरदर्शनवर आलेली माझ्या कार्या संदर्भातील बातमी ही मी माझ्या आयुष्यात अनुभवलेल्या “LAW OF ATTRACTION” चे एक उत्तम उदाहरण आहे.

मला अजून देखील आठवते, मी लहान असताना आमच्या घरी टीव्ही नव्हता, तेव्हा आम्ही शेजार्‍यांकडे कडे दर रविवारी जाऊन दूरदर्शन वरील रामायण – महाभारत, कृष्णा, शक्तिमान, चंद्रकांता सारख्या मालिका बघायचो आणि गंमत म्हणजे त्या मालिका संपल्यावरती टीव्ही पाठीमागे जाऊन बघायचो कि आपल्याला टीव्ही मध्ये दिसणारे मालिकेतील सगळे कलावंत कुठे गेले असतील??

पण ते कधीच टीव्ही मागे साक्षात दिसले नाही!
हे सगळे होत असतांना मनातल्या मनात खूप इच्छा व्हायची – दूरदर्शन वर दिसण्याची!
मग काय दर रविवारी तयार व्हायचं आणि शेजाऱ्यांच्या टीव्ही मागे हळूच जाऊन पाहायचं की कुठून शिरता येईल का आत मध्ये??

पण ते शक्य नव्हते. हळूहळू वयासोबत समज येत गेली आणि हे पण माहिती पडले की टीव्ही टीव्हीमध्ये जाता येत नसतं!

पण त्याक्षणी मनात प्रश्न निर्माण झाला की टीव्ही मध्ये दिसणारी कलावंत असे काय करतात की त्यांना जग पाहत?? मनात इच्छा अजून प्रबळ झाली… रोज एकच विचार मनात असायचा आपण सुद्धा दूरदर्शन वर दिसायचच!!

पाहता पाहता वर्ष सरत गेली, हळूहळू इतरही खाजगी प्रक्षेपण वाहिन्यांची संख्या वाढत गेली काळानुरूप दूरदर्शन पडद्याआड होत गेलं, पण माझी इच्छा अधिक बळकट होत गेली! 2015 मध्ये माझी पहिला मुलाखत एका खाजगी वाहिनीवर प्रक्षेपित होणार होती, आणि उद्या आपण टीव्हीवर दिसणार म्हणून मनात हुरहुर देखील लागली, मला आठवतं त्या रात्री मी झोपलो नव्हतो.
पण, दूरदर्शनवर अद्याप मी दिसलो नाही ही खंत देखील मनात होती…
त्यानंतर अजून बऱ्याच खासगी वाहिन्यांवर मुलाखती झाल्या, अद्यापही मनात एकच होतं दूरदर्शन वर दिसायच राहिलं!

पण शेवटी LAW OF ATTRACTION ने आपली कमाल दाखवलीच!

मी बागेतील झाडांना पाणी देत असतानाच मला एक फोन आला….. सर, तुम्ही दूरदर्शन सह्याद्री वर दिसताय…
मी घरात येईपर्यंत बातमी निघून गेली होती… मी परत अस्वस्थ झालो….! पण शेवटी पुन:प्रक्षेपणा मध्ये मी स्वतःला दूरदर्शन सह्याद्री च्या बातम्या मध्ये पहिले!

आनंद तर गगनात मावेनासा झाला!

सलग एक महिन्यापासून घेत असलेल्या विज्ञान उपक्रमा विषया बाबत माझी बातमी माझ्या मनातील दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर 03/05/2020 रोजी प्रक्षेपित झाली!

माझी लहानपणीची डीडी वर दिसायची इच्छा पूर्ण झाली!

सर्वात महत्त्वाचं म्हणजे तेच वातावरण तेच रामायण-महाभारत तेच शक्तिमान! त्याच NEWS ANCHOR, Its amezing!

आणि अशाप्रकारे माझे लहानपणीचे स्वप्न देखील पूर्ण झाले!

आपण सगळ्यांना एक सांगू इच्छितो…

सर्व लोकं स्वप्न पाहतात परंतु 30 व्या वर्षापर्यंत बहुतेक लोक परिस्थितीसमोर हार मानतात आणि परिस्थितीनुसार यंत्र मानवाप्रमाणे चालतात.

जर तुम्हाला तुमची स्वप्ने सत्यात उतरवायची असतील तर तुम्हाला स्वप्ने पाहायला हवीत!

अब्दुल कलाम म्हणाले आहेत –

स्वप्ने आपण आपल्या झोपेमध्ये पहात नाहीत, स्वप्ने ती असतात जे आपल्याला झोपू देत नाहीत.

आपल्या ध्येय किंवा स्वप्नांमध्ये दृढ इच्छाशक्ती नसल्यास आपले स्वप्न कधीच वास्तविक बनू शकत नाही.

मजबूत इच्छाशक्ती हा LAW OF ATTRACTION चा आधार आहे. ही इच्छाशक्ती आपल्याला “ध्येया” शी जोडत राहते आणि सतत प्रयत्नांची प्रेरणा देते.
आणि जेव्हा आपण आपले ध्येय साध्य करण्यासाठी काहीही करण्यास तयार असाल, तर संपूर्ण विश्व आपले ध्येय साध्य करण्यात आपली मदत करते.

आपल्या ध्येयात “भीती” चे स्थान असू नये. आपल्याकडे स्वत: वर पूर्ण आत्मविश्वास नसल्यास किंवा “अपयशाची भीती” असल्यास आपले स्वप्न किंवा लक्ष्य शक्तिहीन आहे.
जिथे “भीती” असते तिथे “विश्वास” कमकुवत होतो. आणि जेव्हा आपण स्वतःवर विश्वास ठेवणार नाही, तेव्हा संपूर्ण जग आपल्याला कसे मदत करेल?

Law of Attraction = Dreams + Willpower + Confidence!

(photo साभार  – abroadship)

 

  • प्रा. कुशल विजयराव सेनाड
    8177903030
1 Comment
  1. Amruta says

    Khup chan lekh…abhinandan ?????

Leave A Reply

Your email address will not be published.