Covid19 वर नियंत्रणातील महत्वाचे घटक

3

गायिका कनिका कपूरच्या संपर्कात आलेल्या १५०+ लोकांना कोरोनाची लागण? तबलीकी जमावाने नियम झुगारल्यामुळे झाला. ‘केस कापणे पडले महागात- ९१ जणांना झाली नाव्हयामुळे लागण’, अश्या अनेक बातम्या आपण गेले काही दिवस वाचत आहोत. कोरोनाचा संसर्ग होण्यापासून कसा वेळीच रोखता येईल हा ह्या बातम्यांमागील उद्देश आहे. प्रसार माध्यमांनी Covid19 च्या महामारीमध्ये असलेली जोखीम लोकांना समजावून सांगण्यासाठी communication ह्या जनजागरण मोहिमेत महत्वाची भूमिका निभावली आहे. Covid19 वर कुठला उपचार नसलयामुळे त्याला रोखण्यासाठी तीन प्रमुख उपाय आहेत-

1) निदान चाचणी (Testing)

2) संशयित व रुग्णांचे विलागिकरण (Quarantine)

3) संपर्क साखळीचा शोध (Contact tracing)

जागतिक घडामोडींचे प्रसंगावधान राखत, केंद्र सरकारने January महिन्यापासुनच Covid19 विषयक जनआरोग्य पाळत यंत्रणा (Public Health Surveillance) सक्रिय केली. Covid19 निदान व्यवस्था (testing capacity and capability) वाढवण्यासाठी test kit, PPE, clinical laboratory व doctor, nurses, lab technician, व इतर सहाय्यक कर्मचारी प्रशिक्षण हाती घेत केंद्र सरकारने राज्यांना technical मदत दिली. प्रत्येक राज्यातील मुख्यमंत्र्य़ांशी समयोचित समन्वय बाळगत रुग्णालय सज्जता, संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रण व्यवस्था, व संकटग्रस्त परिस्थितीत जलदगतीने जनसंवाद कसा साधता येईल ह्याची धोरणात्मक रणनीति आखण्यासाठी राज्य सरकार व प्रशासनाला सहाय्य उपलब्ध करवून दिले. Lockdown मुळे आंतरराष्ट्रीय/ आंतरराज्य प्रवासासंबंधित Covid19 प्रकरणे शोधणे सोयिस्कर झाले त्याचप्रमाणे स्थानिक व मोठा भौगोलिक संसर्ग ताब्यात ठेवण्यासाठी मदत झाली.

३१ जानेवारीला जेव्हा WHO ने जागतिक आणीबाणी जाहीर केली त्यावेळेला चीनमधून रोगसंसर्ग होऊ नये म्हणून प्रवास व व्यापाराविरुद्ध कुठलीही शिफारस केली नाही. ह्याउलट, जर कुठल्या देशांनी अशी पाऊले उचलली तर त्या देशांनी WHO ला तर्कसंगत औचित्य समजावणारे परिपत्रक ४८ तासात सादर करावे असा अध्यादेश जरी केला (Source: Statement on the second meeting of the International Health Regulations (2005) Emergency Committee, WHO). तरीही तात्काळ, प्रधान मंत्री कार्यालय, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय (Ministry of Health, Family and Welfare) आणि नागर विमानन मंत्रालयाने (Ministry of Civil Aviation) चीन-भारत वाहतूक असलेल्या २१ विमानतळांवर प्रवाश्यांच्या तपासणीचे आदेश देत, आंतरराष्ट्रीय सीमांवर सतर्कतेचा इशारा जारी केला. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात, सरकारने चिनी पासपोर्टधारकांच्या अवागमनावर रोख लावत, चीनबरोबरच सिंगापूर, थायलंड, हाँग काँगहुन येणाऱ्या हवाई प्रवाश्यांची रोगवाहक-तपासणी सुरु केली. फेब्रुवारीच्या महिना अखेरीस २१ विमानतळांशिवाय , १२ प्रमुख आंतरराष्ट्रीय बंदरे, ६५ किरकोळ बंदरांवर, आणि नेपाळलागतच्या सीमाभागांमधून ग्राम पंचायत स्तरावर व हॉटेल-संघटनांच्या सहकार्यातून पर्यटक नोंदणीकरण,

चाचणी व विलगीकरण मोहीम हाती घेण्यात आली. भूसीमालगत प्रदेशात कोविड -१९ विषयक जनआरोग्य देखरेख व पाळत यंत्रणा सक्रिय केली गेली. गृहमंत्रालय, माहिती व प्रसारण मंत्रालय, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय, पर्यटन मंत्रालय, रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय ह्यांना विश्वासात घेतच हि पाऊले उचलली असतील हे उघड आहे. केंद्रात मंत्रीपद भूषविणाऱ्या सर्व नेत्यांवरील वैयक्तिक कामगिरीची आणि एकत्रित येऊन राष्ट्रीय धोरण आणि रणनीतीला अनुसरून समन्वयाने काम करण्याची जवाबदारी कोविड -१९ विरुद्धच्या युद्धात वाढत चालली होती. जनआरोग्य व्यवस्थेत डॉक्टर, नर्सेस, वैद्यकीय सहायकांबरोबरच, संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून कायदा व्यवस्था, विमानतळ, टोल रोड, बस वाहतूक व रेल्वेमार्ग अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष भूमिका निभावणे गरजेचे होत चालले होते. भारतात २८ राज्ये व ७ केंद्र शासित प्रदेशांमधून एकवीस अधिकृत भाषा बोलल्या जातात. राज्यस्तरावर जनजागृती अभियानासाठी लागणारे संदेश, प्रांतीय गरजांनुसार भाषांतरित करण्याच्या कार्याला राज्य सरकारांनी प्रारंभ केला होता. मध्य-फेब्रुवारीत जागतिक आरोग्य संघटनेच्या भारत कार्यालयाने सर्व राज्य प्रशासनांना रुग्णसंख्या वाढू नये म्हणून मार्गदर्शपर तीन तत्वे सांगितली — संपर्कात आलेल्यांचा मागोवा घेणे, विलगीकरण आणि पाळत ठेवणे. संसर्गाची साखळी तोडणे हे ह्यामागचे उद्दिष्ट होते. दुसरे म्हणजे, WHO ने Indian Council of Medical Research (ICMR) आणि National AIDS Control Organization (NACO) ला त्यांच्याकडे असलेली antiviral औषधे कोविड -19 च्या आजारासाठी रूपांतरित करण्याच्या संशोधनासाठी प्रयोगशाळेला लागणारी प्रणालीसहाय्य प्रदान केले. फेब्रुवारी अखेरीस चीन, इराण,इटली आणि कोरिया चा प्रवास करू नये असे अध्यादेश भारतीय नागरिकांसाठी जारी करण्यात आले. त्या शिवाय इंडोनेशिया, नेपाळ, मलेशिया, व्हिएतनाम, सिंगापूर, थायलंड, हाँग काँग,जपान, येथून प्रवास करणाऱ्या तेवीस हजारावर व्यक्तींची सामुदायिक पाळत (community surveillance), Integrated Disease Surveillance Programme (IDSP) मार्फत रोज करण्यात येऊ लागली. भारताने ह्या दरम्यान परदेशात अडकलेल्या आपल्या पर्यटक नागरिकांबरोबरच, श्रीलंका, नेपाळ, दक्षिण आफ्रिका, पेरू, बांगलादेश, ब्रह्मदेश, मालदिव्ह्स, चीन, अमेरिका व मादागास्करच्या नागरिकांना भारतीय वायुदलाच्या विशेष सहाय्यक विमानाने परत आणले. ह्या प्रवाश्यांना चौदा दिवस quarantine (विलगीकरण) करण्यात आले. विलगीकरण अर्थात quarantine करणे हे त्या corona संदिग्ध किंवा corona रुग्णासह समाजाच्याही हिताचे असते हे आता सर्वांनाच पटले आहे. जेव्हा घरात quarantine करणे शक्य असेल तेव्हा संबधित व्यक्तीने हवेशीर बंद खोलीत एकटे राहून शक्यतो स्वतंत्र शौचालयाचा वापर केल्यास त्या व्यक्तीपासून इतर कुटुंबीयांना होणारा संसर्ग रोखता येतो. घर लहान असल्यामुळे, घरात अनेक कुटुंबीय असल्यामुळे विलगीकरण करणे शक्य नसल्यास किंवा लक्षणांच्या तीव्रतेनुसार वैद्यकीय मदतीची गरज असल्यासमात्र संस्थात्मक (facility) quarantine अर्थात नगर पालिकांनी नियोजित केलेल्या रुग्णालयांमधे corona संदिग्ध व्यक्तींची रवानगी हाच मार्ग उरतो. लक्षणांची तीव्रता बदलते का हे पाहण्यासाठी चौदा दिवस संदिग्धांना वेगळे ठेवण्यात येते. सहकार्य न केल्यास एपिडेमिक अॅक्टचा वापर करून या रुग्णांना दाखल करणे समाजहिताचे आहे. करोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे का हे तपासून पाहण्यासाठी लक्षणग्रस्त व्यक्तीचे throat swab (घशातील त्वचेचे नमुने) आणि nasal swab (नाकातील त्वचेचे नमुने) प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवले जातात. त्यांच्या शारीरिक आरोग्याचीही तपासणी केली जाते. यावरून संशयित रुग्णास हॉस्पिटलमध्ये दाखल करायचे की नाही हे ठरवलं जातं. अन्यथा, त्या व्यक्तीला घरातच राहण्याचा सल्ला दिला जातो. चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यास प्रकृती पूर्णतः सुधारेपर्यंत रुग्णाला पुढील १४ दिवसांसाठी quarantine मधे राहणं आवश्यक असते. विलगीकरणाच्या संदर्भात योग्य प्रकारची माहिती नसल्यामुळे काही जण त्याची धास्ती घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न करतात. विलगीकरण करण्यात आलेला प्रत्येक व्यक्ती हा करोनाने बाधित नसतो हे लक्षात ठेवले पाहिजे. Covid19 विरुद्ध लढाईमधे जागतिक स्तरावर विश्वासार्ह उपचारपद्धती (treatment) किंवा प्रतिबंधात्मक लस (preventive vaccine) सापडली नसल्यामुळे covid19 संसर्ग रोखण्यासाठी सर्वच देश containment strategyचा वापर करत आहेत. January पासून भारतातील विविध राज्यांची covid19 शी झुंज देण्याची कार्यप्रणाली जशी सज्ज होत गेली, तसेच मे महिन्याच्या सुरुवातीला भारत lockdown च्या तिसऱ्या टप्प्यात येऊन पोहोचला. १ मे ला केन्द्रीय आरोग्य मंत्रालयाने देशाचे covid19 संसर्गाच्या रिस्क  प्रमाणे राज्यस्तरीय जिल्हानिहाय तीन गटांमधे वर्गीकरण केले- red, orange व green zone. हे गट नवीन रुग्णदर (incidence rate), रोग्यांच्या संख्येतील दुप्पटीकरणाचा दर, आणि surveillance (पाळत यंत्रणा) feedback हया निकशांवर आधारित होते. १ मे च्या केन्द्रीय घोषणेनुसार महाराष्ट्रातील १४ जिल्हे red zone मधे, १६ जिल्हे orange zone मधे व ६ जिल्हे green zone मधे वर्गीकृत करण्यात आले. Red zone मधे सर्वाधिक cases, Orange zone मधे त्यापेक्षा कमी व green zone मधे सर्वात कमी cases असे हे गटांचे वर्गीकरण होते. ही यादी दर आठवड्याला किंवा गरज भासल्यास त्याहून लवकर update करू अशी केन्द्रीय सरकारने घोषणा केली. राज्यांनी प्रांतीय परिस्थितीचे अवलोकन करत red व orange zone मधील जिल्हानिहाय भागांमधे containment zone व buffer zone निर्धारित करावे अशी सूचना केन्द्रीय सरकारतर्फे देण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकऱ्यांनी lockdown शिथील करण्याचे आदेश काढतांना red व orange zone मधून green zone मधे ये-जा होऊ नये ह्याची खबरदारी घेण्याचे आदेश जारी केले व मे महिन्याअखेरीस उभा महाराष्ट्र green zone मधे आणण्याचे आवाहन प्रशासकीय अधिकऱ्यांना केले. Covid19 च्या रुग्णांच्या संख्येतील वाढ नियंत्रणात येण्याची कुठलीही चिन्हे दिसत नसतांना, ह्या दुर्धर रोगावर कुठला शास्त्रशुद्ध तोडगा सापडला नसतांना आणि कोरोना महाराष्ट्रात सर्वाधिक कहर करत असतांना अशी थोतांड अपेक्षा कशाच्या आधारावर ठाकरे करत आहेत कुणास ठाऊक! भारताने १७ मे ला lockdown च्या चौथ्या चरणात प्रवेश केला तोच देशातील covid19 रुग्णांची संख्या १,०००,००० वर येऊन थडकली. देशासह राज्यात corona चं थैमान सुरुच असून २४ मे पर्यंत, राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ५० हजारांच्या पार गेली आहे. महाराष्ट्रात ४,९९,३८७ लोकांना home quarantine तर ३५,००० हून अधिक लोकांना facility quarantine केले आले. कोरोनाचा रुग्ण आढळल्यास एक पथक सज्ज करण्यात येते जे त्या व्यक्तीशी संबंधात आलेल्या ईतर व्यक्तींचा शोध घेते – हा शोध कसा घेतात, ह्याचे विधिवत शास्त्र आहे व ह्या प्रक्रियेला CONTACT TRACING म्हणतात. जागतिक स्तरावर हे दोन पद्धतींनी केल्या जाते – मानवी पथकांमार्फत व TECHNOLOGY वापरून. चाचणी (Testing), विलगीकरण (Quarantine), व Contact Tracing हया तीन महत्वाच्या Covid19 नियंत्रण प्रणालींबद्दल समजून घेणे आवश्यक आहे. जागतिक स्तरावर हे कसे केले जात आहे, भारत व आपला महाराष्ट्रा काय करतो आहे हे पुढील लेखात बघूया…

लेखिका ह्या, बीएससी ( होम सायन्स), एमए ( क्लिनिकल सायकॉलजी ) गोल्ड मेडल आहेत तसेच फ्लोरिडा येथे एमपीएच ( social and behavioral Public Health,) केले असून सध्या ऑस्टिन, टेक्सास, USA येथे, Healthcare transformation consultant आहेत. https://m.facebook.com/TheKohamVoice/

3 Comments
  1. Kiran says

    सुंदर माहिती पुर्ण लेख

  2. Darshan Vartak says

    That was quite elaborate and completely factual. In the days of mixed messages, confusions, speculations your article gave clear insight on what’s going on, on the ground. You seem to have spent considerable amount of time gathering all this information and stitching it all together to give a much broader view of the situation. Thanks for your efforts !!!

  3. Swapnil says

    लेख छान आहे। ह्यावर पुढे आणखी सुद्धा लिहावे, कारण विषय मोठा आहे आणि Jan to May पर्यंतचा पूर्ण आढावा एका लेखात घेणे अवघड आहे। केंद्र सरकारच्या आणि विविध राज्य सरकारांच्या कोरोना धोरण, उपाय योजना आणि त्रुटि यावर लिहावे ऐसे मला सुचवायसे वाटते। महाराष्ट्र राज्य सरकार आणि केंद्र सरकार कडून ही बऱ्याचशा चुका घडल्यात या दिवसात असे दिसून आले आहे!

    महाराष्ट्र, केरळ, दिल्ली, गुजरात या राज्यांचे आपसात व केंद्र सरकार सोबत तुलनात्मक परीक्षण केल्यावर यावर आणखी प्रकाश पडू शकतो!

Leave A Reply

Your email address will not be published.