प्रतिभावंतांचे साक्षात्कारी क्षण !

1 792

प्रतिभावंतांचे साक्षात्कारी क्षण !

सखी मंद झाल्या, तारका ! आता तरी तू येशील का ?   हे माझे खूप आवडते गाणे आहे. त्यात शेवटलं कडवे
” बोलावल्या वाचूनही आला  जरी  मृत्यू इथे,…. थांबेल तोही पळभर, पण सांग तू येशिल का ?
अतिशय नितांतसुंदर आहे .त्या प्रियकराने प्रेयसीच्या भेटीसाठी आतुर व्हावं आणि तिची आळवणी करावी !आणि तीही मृत्यूलाही थांबून ठेवावं !! असे हे उत्कट प्रेम आहे .!!
त्यानंतर या गीताचं परीक्षण वाचलं तेव्हा , असे कळले की , सुधीर मोघे यांना चित्रपटासाठी हे गीत द्यायचे होतं आणि डेडलाईन जवळ आल्या होत्या. परंतु त्यांना काही लिहित सुचत नव्हते. त्यांनी हात टेकले , तेव्हा त्यांनी हे गीत स्फुरले . हे गीत द्विअर्थी आहे .वरवर पाहता आपल्याला असे वाटते की प्रियकर आणि प्रेयसी ची आळवणी केलेली आहे .त्यांचे उत्कट असे प्रेम आहे,जे मृत्यूलाही घाबरत नाही.परंतु दुसरा अर्थ असा की ते तसे नसून कवीने प्रतिभेला प्रियसी मानुन आपल्या प्रतिभेला आपल्याकडे येण्याचे आवाहन केले आहे .हा अर्थ समजल्यावर मला हे गीत अजूनच आवडायला लागले. आणि निर्मितीच्या प्रक्रियेचा मी विचार करायला लागले

अनेक प्रसिद्ध नाटककार,लेखक यांनी झोपेत पाहिलेली स्वप्ने उ ठल्यावर झरझर लिहून काढली आणि ती अमाप लोकप्रिय झाली. प्र.के.अत्रे उत्कृष्ट विनोदी लेखन करायचे.
त्यांचे “घराबाहेर ‘ हे पहिले सामाजिक आणि अतिशय गंभीर असे नाटक आहे .वास्तविक ते विनोदी नाटककार म्हणून प्रसिद्ध होते. एक दिवस त्यांना रस्त्यावर घरातून बाहेर पडलेली रडणारी स्त्री दिसली आणि ते अस्वस्थ झाले .रात्री झोप येईना, तो प्रसंग झोपेत अस्वस्थ करत होता आणि त्यांना तिचा चेहरा दिसत होता आणि कधीतरी सकाळी पहाटे पहाटे झोप लागल्यावर त्यांना” घराबाहेर ‘ नाटक हे पूर्ण स्वप्नात दिसले आणि त्यांनी उठल्यावर ते लिहून घेतले

” स्वाभिमान ‘हे भारतातील सगळ्यात पहिली महा मालिका ! स्वाभिमान याचीही निर्मितीप्रक्रिया पण अशीच आहे. महेश भट यांनी दिलेली डेडलाइन संपत आली होती परंतु शोभा डेला काही लिखाण सूचेना. शोभा डे कडे महेश भट आले, तेव्हा ती आंघोळ करीत होती आणि तिला तिथे कल्पना सुचली .तिने लॉन्द्री बाग वर पटापट पाहिला एपिसोडल लिहिला आणि दूरदर्शन वरील स्वाभिमान ही पहिली महा मालिका , डेली सोप तयार झाली.

आर्किमडीज ने अनेकदा बाथ टब मध्ये आंघोळ केली,पण आपल्या आकारमान इतकेच पाणी खाली संडते, हे त्याला ज्या दिवशी आंघोळ करताना स्ट्रईक झाले, समजलं, तेव्हा तो युरेका ओरडत धावला. मानसशास्त्र ह्या क्षणाला, ह्या प्रक्रियेला  अनुभव म्हणते. ह्या निर्मितीच्या प्रक्रिये बद्दल मला जाम आकर्षण आहे, प्रत्येक क्षेत्राततल्या!

माझ्या मुलाच्या विज्ञान शिक्षिका खूप सुंदर शिकवायच्या. एक दिवस गृहपाठ होता  की आई कसा स्वयंपाक करते, ते पहा कारण पाक क्रियेत रसायनाचा वापर होतो.दुसऱ्या दिवशी च गृहपाठ होतं, दुधाचे दही बनवणे, हे आंबवणे क्रिया शिकण्यासाठी,! तिसऱ्या दिवशी पानर  ! बनवले तर चौथ्या  दिवशी मूगा ला मोड आणणे ,!त्यांनी बरोबर विद्यार्थ्याना निर्मिती कशी करावी, संशोधन कसे करावे ,हे छोट्या उदाहरणाने शिकवले.

स्त्रीला आद्य सजनातेच प्रतीक मानले जाते. स्त्रीला होणाऱ्या प्रसव वेदना, ह्या खूप त्रासदायक असतात, पण जेव्हा ती बाल जन्माला घालते, तेव्हा ती ते दुख विसरते आणि आपल्या निर्मितीकडे बघून खुदकन हसते. ह्या प्रसव वेदना सर्व कलावंतांना होत असतात, मनातले कागदावर , दगडावर , क्यानव्हास  वर उतरे पर्यन्त ते अस्वस्थ असतात. मग निर्मितीनंतर ते खुल्या दिलाने श्वास घेऊ शकतात. ही निर्मिती प्रक्रिया जेवढी  आनंददायी तेवढीच वेदनादायक असते.!
मी अनेक चित्र प्रदर्षने पहिली  ,पण त्या चित्राचा अर्थ कुणी समजावून सांगितले की स्वतःला समजयाच्या..ह्याला अबस्ट्रक चित्रे म्हणतात , न समजनारी ! अर्थात सामान्यांना ! मी जेव्हा चेंनईला गेले तेव्हा राजा रविवर्मा ची चित्रे पाहिली, ती मला समजत होती. एका स्त्रीचे चित्र होते ,दागिने घालून त्यात तिने कपडे, मोत्याच्या कुड्या! , गळ्यातले हार ,जणू काही वरून चित्राला घातले आहे ,! असा अभास निरम होत होता,ती ३ डी.चित्रे होती! , हाताने काढलेले ? ,तेव्हा मला त्यांचे मोठेपण समजले.
अशी प्रतिभावान लोक मानसशास्त्र म्हणते ..०१ टक्के असतातफक्त ! त्यांचा बुध्यांक हा १४० आणि त्यावर असतो, अस शास्त्र सांगते. पण हेच अल्पसंख्याक समाजाची धुरा वाहतात. एखादाच सत्यजित राय सारखा लेखक आणि दिग्दर्शक असतो, एक च रवींद्रनाथ टागोर असतात, एकच गदिमा असतात, जे आपले सांस्कृतिक जीवन समृद्ध करतात. एकच न्युटन , आईन्स्टाईन, आर्यभट्ट , रामानुजन , एडिसन , डार्विन , अलेक्झांडर, असतो आणि मानवाच्या कल्याणासाठी झटतात.! ही पृथ्वी आणि मानवजात, सदैव त्यांच्या ऋणात राहील…..!

लेखिका सध्या नागपूर येथे सहायक राज्यकर आयुक्त (Assistant Commissioner of State Taxes) येथे कार्यरत असून त्यांना ललित व काव्य लेखनाची , वाचनाची आवड. लोकप्रभा, तरुण भारत, देशोन्नती,मातृ सत्ता व जन्मंगल अशा विविध वृत्तपत्र , मासिकांमधून लेखन. नुकताच 'मनातलं' हा ललित लेखांचा संग्रह प्रकाशित . मो.बा. - ९८२२९४०९१२

1 Comment
  1. manisha upasani says

    प्रतिभावंताचे साक्षात्कारी क्षण हा लेख फारच छान आहे। लेखिकेने छाेट्या छाेट्या उदाहरणाने लेख रंजक केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.