सहकार क्षेत्रातील संधी – मा.संजयजी पाचपोर यांचा गुगल मीट द्वारे संवाद

0

मित्रांनो
सस्नेह नमस्कार.

लोकसंवाद डॉट कॉम चे वतीने आपल्या सर्वांकरिता आत्मनिर्भर या विचारावर आधारित सहकार क्षेत्रातील विविध संधी या विषयाला धरून माननीय संजयजी पाचपोर, मुंबई यांचेशी गुगल मीट द्वारे संवाद साधणार आहोत. माननीय संजयजी पाचपोर हे गेल्या २० वर्षां पेक्षा अधिक  सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या संजयजी सहकार क्षेत्रात कार्य करणार्‍या सहकार भारती या देशातील अग्रगण्य समजल्या जाणार्‍या  राष्ट्रव्यापी संघटनेचे राष्ट्रीय संघटनमंत्री असून संपूर्ण देशभर त्यांचा संघटन कार्य निमित्ताने प्रवास होत असतो. देशभरात सहकारी क्षेत्रामध्ये विविध प्रकारचे तसेच वैशिष्टपूर्ण असे प्रकल्प व उद्योग अनेक तरुणांनी आपापल्या कल्पनेतून उभारले आहे. अशा सर्व माहितीचा व अनुभवांचा एकत्रित ठेवा आज मा.संजयजी यांचेकडे आहे. हा बहुमूल्य असा माहितीचा खजिना अनेकांसाठी प्रेरणादायी व दिशादर्शक ठरू शकतो याच उद्देशाने आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे. प्रस्तुत कार्यक्रमात संजयजी आपल्या समोर देशातील विविध प्रयोग व प्रकल्पांची माहिती मांडतील व मार्गदर्शनही करतील. जेणेकरून आपणही यापासून प्रेरणा घेऊन सहकार क्षेत्रात अग्रेसर होऊया. सदर कार्यक्रम हा गुगल मीट वर दिनांक ०२ ऑक्टोंबर २०२० रोजी सायंकाळी ४ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याकरिता खालील अर्ज भरून आपली नोंदणी अवश्य करावी. सदर कार्यक्रमाला केवळ नोंदणीकृत प्रतिनिधी उपस्थित राहू शकतात याची कृपया आपण नोंद घ्यावी. ही नोंदणी प्रक्रिया दिनांक ०१ ऑक्टोबर २०२० सायं ०५ वाजेपर्यंत सुरू राहील, तत्पूर्वी कृपया आपली नोंदणी करावी व या दुर्लभ संधीचा अवश्य लाभ घ्यावा.

धन्यवाद…!

बिना सहकार नही उद्धार..! 
टीम लोकसंवाद डॉट कॉम

नोंदणी करिता  खालील अर्ज भरून सबमीट करा .

Leave A Reply

Your email address will not be published.