मराठी भाषा गौरव दिवस.
विष्णू वामन शिरवाडकर, (२७ फेब्रुवारी, १९१२-१० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील ज्ञानपीठ पुरस्कारविजेते अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार कथाकार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन केले. त्यांचा जन्म दिवस (२७ फेब्रुवारी) मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.
मराठी भाषा ही इंडो-युरोपीय भाषाकुळातील एक भाषा आहे. मराठी ही भारतातील २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे. मराठी महाराष्ट्र राज्याची अधिकृत तर गोवा राज्याची सहअधिकृत भाषा आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, भारत देशात मराठी भाषकांची एकूण लोकसंख्या सुमारे ९ कोटी आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातील दहावी व भारतातील तिसरी भाषा आहे. मराठी भाषा भारतातील प्राचीन भाषांपैकी एक असून महाराष्ट्री प्राकृतचे आधुनिक रूप आहे. मराठी भाषेचा गौरव ज्ञानेश्वरांनी त्यांच्या साहित्यातून ही केलेला दिसून येतो. महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य म्हणून त्याला वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे.
फोटो – pyarikhabar.in साभार.