अल्पसंख्यकांच्या धार्मिक शिक्षणावर आक्षेप का  नाही ?

0

अल्पसंख्यकांच्या धार्मिक शिक्षणावर आक्षेप का  नाही ?  

कांग्रेस नेते आणि गांधी-नेहरू परिवार पूर्वी पासून राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या कार्यपध्दतीवर तथा वैचारिक भूमिकेवर सतत टीकाटिप्पणी करीत आलेला आहे. काँग्रेसी नेते मंडळी सुद्धा अनावश्यक तोंडसुख घेत आलेली आहे. गेल्या चार पाच वर्षामधील काँग्रेसी नेते राहुलगांधी यांची संघ कार्या विषयी व्यक्त झालेली मते आणि त्यांच्या वक्तव्यचा विचार केल्यास, संघाला दूषणे लावण्याची गांधी परिवाराची जुनीच पोटदुखी आहे. तसेच सतत संघ कार्य वृद्धीमुळे वैफल्यग्रस्त झालेला गांधी परिवार नैराश्य मधून आपली जळफळाट व्यक्त करीत असल्याचे लक्षात येते. आता राहुल गांधी यांनी संघाच्या विविध क्षेत्रातील विद्या भारती अखिल भारतीय शिक्षा संस्थान संघटनेवर टीकेची झोड उडवून विद्या भारतीच्या सरस्वती शिशु मंदिर व अन्य विद्यालयाची तुलना पाकिस्तान मधील जेहादी दहशतवाद्याचा कारखाना असलेल्या इस्लामी मुलतत्ववादी मदरस्या सोबत केली. राहुलगांधी यांचं वक्तव्य सामान्य माणसाला चीड आणणारे असून बालिशपणाचे वक्तव्य म्हणावे लागेल. कारण आपल्या देशात अल्पसंख्यकांच्या मुस्लिम ,ख्रिस्ती शिक्षण संस्था मध्ये धार्मिक शिक्षण दिले जाते मग सरस्वती शिशु मंदिर,विद्या भरतीच्या शाळा मध्ये भारतीय संस्कृतिचे संस्कार दिल्यास का आक्षेप घेतला जातो ? अल्पसंख्यकांच्या धार्मिक शिक्षणावर राहुल गांधी  आक्षेप केव्हा घेणार ? असे प्रश्न निर्माण होत असून  संघाला दूषणे लावण्याची राहुल गांधीची पोटदुखी जुनीच आहे. मात्र  या पोटदुखीला आज जनमाणसात  कवडीची किंमत उरलेली नाही. हे कांग्रेसने आता तरी लक्षात घेईल का ?                                                           राष्ट्रीय स्वंयसेवक संघ जगातील अद्वितीय तथा अद्भुत अस सामाजिक,संस्कृतिक हिंदुच संघटन आहे. देशात लाखो कार्यकर्ते आणि शेकडो विविध क्षेत्र उभे झालेले आहेत. त्यापैकी शिक्षण क्षेत्रात  अखिल भारतीय विद्या भारती सेवाभावी संघटन असून वर्ष 1952  गोरखपुर मध्ये छोटयाशा घरगुती जागेत पहिले सरस्वती शिशु मंदिर सुरु झाले. शिक्षणा सोबत भारतीय संस्कृतीचे  संस्कार आणि शिक्षण क्षेत्राचे भारतीयकरण हे ध्येय घेऊन देशात कार्य करीत आहे. मोठया प्रमाणात कार्यरत आहेब तसेच शासकीय अनुदान न घेता अविरत कार्यरत  आहे. जेथे विजेचे खांब किवा बैलगाड़ी पोहचली नाही अशा दुर्गम भागात संघाचे स्वयंसेवक पोहचुन त्यांनी शिक्षण क्षेत्राचे सेवाप्रकल्प उभे केले आहेत. सोबतच  विविध प्रांताचे संस्कृतिक एकता तथा एकात्मता जोपासत आहेत. देशाला एका सूत्रात बांधून ठेवत आहेत.  देशाची सांस्कृतिक परंपरा,राष्ट्रभक्ती तथा सामाजिक ऐक्याची भावना साध्या सोप्या भाषेत शिकविली जाते विध्यर्थी वर्गामध्ये राष्ट्रभक्ती सोबत बलोउपासनेचा संदेश सुद्धा दिलेला जातो. आज देशात शिशु मंदिर,विद्या मंदिर,सरस्वती विद्यालय, एकल शिक्षक विद्यालय, उच्च माध्यमिक शिक्षण संस्था अशा जवळपास 30 हजार शिक्षण संस्था,9 लाख शिक्षक आणि 45 लाख विद्यार्थी असा प्रचंड मोठा परिवार सरकारी पैसा घेता  विद्या भरतीने देशात उभा केलेला आहे. हिंदू विचाराला केंद्रबिंदु ठेऊन राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच कार्य 1925 साली डॉक्टर केशव बळीरामपंत हेडगेवार यांनी महाराष्ट्राच्या भूमीत नागपुरला सुरू केलेले आहे. त्यासाठी संघाची एक तासाची शाखा नावांच तंत्र दिल संघाच्या शाखेवर एक तास देशभक्ती,समाजसेवेचे संस्कार घेऊन समान धारणा समान प्रेरणा घेऊन संघ कार्यकर्ते राष्ट्र निर्माणसाठी समाजात काम करतात तसेच  समाजाला राष्ट्रीय एकतेचे तथा सामाजिक समरसतेचे संस्कार देऊन समाज जीवनाच्या विविध क्षेत्रात जाऊन मोठमोठे सेवा प्रकल्प उभे केले आहेत. संघ विचारांची प्रेरणा दघेऊन असंख्य संघ स्वंयसेवक समाजजीवनाच्या विविध परिवर्तन साठी निःस्वार्थपणे झटत असतात संघाच्या शाखेतून समाजसेवा तथा राष्ट्रभक्तीचे संस्कार घेऊन संघ स्वंयसेवकांनी देशाच्या दुर्गम भागात दवाखाने,शिक्षण संस्था,बँका,पतसंस्था महाविद्यालय,शाळा काढल्या आहेत. योग्य नियोजन करून नावलौकिक मिळविला आहे. पण सर्व सेवाकार्य स्वंयसेवक करतात त्यामुळे संघ शाळा चालवीत नाही, केवळ शाखा चालवितात हे लक्षात घेतले पाहिजे.  संघ देश व समाज एका सूत्रात बांधून ठेवत आहे .अशा स्थितीत संघ आणि संघाच्या विविध क्षेत्रावर तोंडसुख घेणे कितपत योग्य आहे. याचा विचार करणे तथा अल्पसंख्यकांच्या धार्मिक शिक्षणवर आक्षेप केव्हा घेणार ? असा प्रश्न उपस्थित राहतो.

स्तंभ लेखक, माजी सदस्य-महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, महाराष्ट्र शासन.

Leave A Reply

Your email address will not be published.