पोलिस दलात संघनिष्ठ अधिकारी तपासण्या एवजी वाजे शोधा.

0 375

पोलिस दलात संघनिष्ठ अधिकारी तपासण्या एवजी वाजे शोधा.

सचिन वाजे प्रकरणा मुळे संपूर्ण राज्याचे राजकिय वातावरण ढवळून असून दिवासोदीवस नवीन नवीन खुलासे होऊन महाराष्ट्राचे राजकारण तापत आहे. पहिले मुंबई माजी पोलिस आयुक्त परमवीरसिंह यांच्या लेटरबॉम्ब मुळे आणि आता सचिन वाजे यांच्या लेटर बॉम्ब मुळे प्रकरणा मुळे राज्यात भूचाल आलेल आहे. तसेच दोन्ही लेटर बॉम्ब मधील खंडणीच्या उल्लेखामुळे तथा एन.आय. आणि सी. बी. आय. चौकशी मुळे संपुर्ण देशात राज्याच्या इज्जतीचे ढींडवडे निघाले आहेत. तसेच सचिन वाजे यांच्या लेटर बॉम्ब मुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. आणि आणखी काही मंत्री महोदयावर राजीनामा देण्याची पाळी येऊ शकते असे राजकीय संकेत मिळत आहेत. राजीनामा दिलेल्या अनिल देशमुख यांनी विधान सभेच्या अर्थसंकल्प अधिवेशन मध्ये राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या वतीने राज्यात श्रीराम जन्मभूमी मंदीर निर्माण कार्यासाठी राबविलेल्या समर्पण निधि संकलन अभियानवर खंडणी वसूल करण्याचा आरोप,टीका करून तोंडसुख घेण्याचा आनंद घेतला होता. आता अनिल देशमुखवरच खंडणीचा आरोप होऊन त्यांना मंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्या नंतर नुतन गृहमंत्री गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांनी गृह विभागाच्या पदाचा कार्यभार हाती घेताच त्यांनी संघावर तोंडसुख घेत पोलिस विभागातील संघनिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती घेणार असे वक्तव्य केले आहे. वास्तविक पाहता त्यांनी पोलिस दलातील अधिकाऱ्यांची संघनिष्ठा तपासण्या एवजी कीवा संघनिष्ठ अधिकाऱ्यांची  माहिती घेण्या एवजी पोलिस दलामध्ये किती वाझे आहेत आणि कुठे कुठे लपून बसले आहेत हे सत्य शोधण्याची आवश्यकता आहे.                                      गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी संघावर तोंड सुख घेतांना राज्याच्या पोलिस दलात संघाशी निष्ठा असलेले अनेक अधिकारी आहेत. या बाबत सर्व माहिती घेण्यात येईल व कारवाई होईल असा इशारा त्यांनी नुकताच  केलेला आहे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे स्वंयसेवक आणि कार्यकर्ते देशाच्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये नोकरी करीत आहेत. अनेक ठिकाणी महत्वाच्या हूद्दावर सुद्धा आहेत हे निर्विवाद सत्य आहे. संघाच्या दैनदिन शाखेवर देशभक्ती तथा समाजसेवेचे संस्कार घेऊन समाज जीवनाच्या विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. शासकीय नोकरी तथा निमशासकीय संस्था मध्ये नौकऱ्या,शिक्षण संस्था, बँका पतसंस्था महाविद्यालय, शाळा अशा विविध संस्था मध्ये प्रामाणिकपणे काम करतात कार्यालयाचे अनुशासन व नियम सुद्धा पाळतात तसेच त्यांच्या भौतिक सुखाच्या गरजा मर्यादीत असल्यामुळे वाममार्गचा स्वीकार करीत नाहीत किवा वाममार्ग त्यांना कधीच स्पर्श करीत नाही. हे सत्य समाजाने अनेक वेळा ओळखले आहे.  त्यामुळेच समाज वेळोवेळी संघ स्वयंसेवाकांवर विश्वास ठेवून कौतुक सुद्धा करत असतो तसेच स्वयंसेवक असलेले असंख्य कर्मचारी आपल्या कार्यालयीन वेळे नंतर किवा सुट्टीच्या दिवशी समाजसेवेसाठी समाजात जातात दुर्गम भागात जाऊन सेवाकार्य करतात, झोपडपट्टयामध्ये शिक्षणा कडे लक्ष देतात ,वनवासी पाड्यावर आरोग्य सुविधा कडे लक्ष देतात ,सेवावस्तीमध्ये जाऊन सेवाकार्य करतात ,रक्तपेढ़ी,पुस्तकपेढ़ी ,अभ्यासिका असे असंख्य सेवा प्रकल्प चालवितात एखाद्या आपत्ति मध्ये सुद्धा संघ कार्यकर्ते समाजसेवेत अग्रेसर असतात. संघ स्वयंसेवक असलेल्या असंख्य कर्मचाऱ्यांनी  आपली नौकरी संभाळून देशातील दुर्गम भागात  सेवाकार्य उभे केले त्यामुळे त्यांच्या कार्यपध्दतीवर किवा कामाच्या निष्टेवर कोणीही प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न  केलेला नाही अशा स्थितीत पोलिस दलात असलेल्या कार्यक्षम अधिकाऱ्यांच्या  संघनिष्ठा तपासण्याचे किवा संघनिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती घेण्याचे वक्तव्य करुन  संघावर तोंडसुख घेणे कितपत योग्य आहे याचा विचार करावा. आपल्या देशातील राज्या मध्ये जेव्हा जेव्हा काही राजकीय आणि सरकार बदलते किवा सरकार मधील मंत्री बदलतात तेव्हा तेव्हा राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि संघाच्या कार्यपध्दतीवर टिक टिप्पणी करण्याची प्रथा रूढ झालेली आहे. आणि प्रथे नुसार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आणि आता नवीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटिल यांनी संघावर तोंडसुख  घेण्याचा प्रयत्न केला आहे. आपले अपयश झाकण्या साठी किवा किवा वरीष्ठाची मर्जी सांभाळण्या साठी राजकीय मंडळी असे डावपेच खेळत असते.  त्यामुळे गृहमंत्री दिलीप वळसे पाटिल यांनी  पोलिस दलातील संघनिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती घेण्या ऐवजी त्यांनी पोलिस दलातील वाजे शोधावे,महाराष्ट्र अवैध राहणारे बांग्लादेशी शोधावे, महाराष्ट्रात गरळ ओकुन गेलेला शरजिल उस्मानी शोधावा असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

स्तंभ लेखक, माजी सदस्य-महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, महाराष्ट्र शासन.

Leave A Reply

Your email address will not be published.