तिसऱ्या महायुद्धासाठी चीनचं जैविक रणशिंग ?

0

तिसऱ्या महायुद्धासाठी चीनचं जैविक रणशिंग ?                                                            

चीन मागील नऊ वर्षांपासून,कोरोना विषाणूंसारख्या जैविक आणि जननशास्त्रीय हत्यारांचा (बायोलॉजिकल अँड जिनेटिक वेपन्स) करून तिसर महायुद्ध लढण्याची तयारी करतो आहे.उभारती महाशक्ती अंतत: स्थावर महाशक्तींच्या विरोधात युद्ध करते या थुकिडीडेस ट्रॅप थियरीच चीन उत्तम उदाहरण आहे. २००३मधे संपूर्ण चीनमधे सार्स कोव्ह विषाणूंची लागण झाल्यानंतर,हे युद्ध जिंकण्यासाठी लालसभूत पीपल्स लिबरेशन आर्मीनी (पीएलए) जैविक आणि जननशास्त्र हत्यारांविषयी विचार करण सुरू केल. पीएलएच्या या प्रकल्पावर संशोधन/प्रयोग करतांना २००९/१०त चीनमधे एक लाखावर लोक स्वाईन फ्ल्यू प्रकोपाला बळी पडलेत,२०१२मधे १८५० लोक मर्सच्या मृत्युमुखी गेले,२०१४/६त इबोला विषाणूंनी १०,९७० चीन्यांचा घास घेतला.तरी वुहानच्या बीएसएलफोर प्रयोगशाळेत कोविद कोरोना १९चा शोध लागे पर्यंत सार्स विषाणूंचे पर्याय (व्हेरियंट) शोधण्याच काम सुरूच राहील .   

अमेरिका, रशिया आणि पाश्चत्य राष्ट्रांच्या विरोधात जाऊन,महायुद्ध जिंकण्यासाठी हेच एक ब्रम्हास्त्र (कोअर वेपन ऑफ व्हिक्टरी) आहे अशी चीनची धारणा आहे. त्यासाठी ही अस्त्र केंव्हा कशी सोडायची,त्यासाठी अनुकूल वातावरण कोणत असेल आणि शत्रूच्या आरोग्य व्यवस्था त्याचा आघात कितपत सहन करू/झेलू शकेल,त्याचा  याची खातरजमा चीननी आपल्या जैविक युद्धाभ्यासात केली आहे. या हत्यारांमधील विषाणू; शत्रूच्या खेम्यात रोगराई (डिसीझेस) पसरवून,आजवर झाला नाही असा नरसंहार कशी करतील याची चांचणी आणि खात्री,पीएलएचे शास्त्रज्ञ आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी या युद्धाभ्यासाच्या माध्यमातून केली.चीनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांच मर्मस्थान असलेल्या रासायनिक जैविक प्रयोगशाळांवर फक्त ते सोडून चीनमधील दुसऱ्या कोणाचाच अंकुश नाही

जस पहिल्या महायुद्धाला रासायनिक (केमिकल) आणि दुसऱ्याला आण्विक (न्यूक्लियर) महायुद्ध म्हणून संबोधल्या जात त्याच प्रमाणे चीन लढत असलेल्या तिसऱ्या महायुद्धाला जैविक/जननशास्त्रीय  (बायोलॉजिकल) महायुद्ध हे संबोधन जास्त संयुक्तिक असेल. शत्रूवर सामरिक/व्यावहारिक वर्चस्व (गेन ऑफ फ़ंक्शन) मिळवण्यासाठी लागणारी चीनची ही ब्रम्हास्त्र,वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीमधे विकसित केल्या जातात.याच ठीकाणाहून नोव्हेंबर/डिसेंबर,२०१९मधे,कोविद करोना १९चे विषाणू पहिल्यांदा जगात पसरायला सुरवात झाली होती.याच प्रयोगशाळेत आता, याच प्रकारच्या पण याहून जास्त वेगानी संक्रमित होणाऱ्या आणि हजारपटींनी प्रभावशाली (ट्रान्समिसेबल अँड लिथल) विषाणू निर्मितींची शोध प्रक्रिया सुरू आहे. सूत्रांनुसार,हे प्रयोग करतांना अनेक शास्त्रज्ञ देखील मृत्युमुखी पडलेत.  

रानटी प्राण्यांच्या माध्यमातून  संक्रमित होऊन,मानवाला प्रताडित करणाऱ्या विषाणूबाधीत रोगांवर संशोधन करण्यासाठी, नॅशनल नॅचरल सायंस फाउंडेशन ऑफ चायनानी,डॉक्टर शु जियांगवोच्या नेतृत्वा खाली,२०१२मधे एक प्रकल्प सुरू केला.एका किवंदंतीनुसार,“ जायंट नेटवर्क ऑफ इन्फेक्शियस डिसिझ कंट्रोल इज टेकिंग शेपअशी शेखी, २०१९च्या एका कॉन्फरन्समधे शु जियांगवोनी मारली होती.वुहानमधे कोविद करोनाचा प्रकोप झाला असता त्यांच्या बातम्यांना याच महाशयांनी ब्लॉक/ डायल्युट केल होत.२०२०मधे  त्यांनी सीपीसी पॉलिट ब्युरोला सादर केलेल्या अहवालातीलविषाणूबाधीत रोगांवर संशोधन करतांना मोठ्या प्रमाणात अन्य जैविक विषाणूंचा शोध  लावण्यात आम्हाला यश प्राप्त झाल आहेया अर्थाच्या एका वाक्यामुळे, इंटरनॅशनल व्हायरॉलॉजी कम्युनिटीत भूकंप आला

आंतरराष्ट्रीय तज्ञांनुसार,चीननी संक्रमक अनुवंशवाहक तंत्रज्ञानाचा (मेटॅजिनॉमिक्स टेक्नॉलॉजी) वापर करून, कोविद कोरोना सदृश्य चार नवीन अनुवंशवाहक जैविक विषाणू (पॅथोजन्स),दहा नवे रोगजंतू (बॅक्टेरिया) आणि १६४० विषाणू (व्हायरसेस) शोधून काढले  निर्माण केले आहेत. चीनी शास्त्रज्ञ आणि सेनेचे अधिकारी वुहानच्या प्रयोगशाळांमधे मागील नऊ वर्षांपासून वटवाघळ आणि जनावरांमधील रोगांमधे आढळणाऱ्या विषाणूंवर संशोधन करताहेत. जीव शास्त्रातील काळ्या गुप्त विवरातील संशोधनातून (एक्स्प्लोरेशन ऑफ डार्क मॅटर ऑफ बायोलॉजी) त्यांनी १४३ नव्या रोग विषाणूंचा शोध लावला.चीनी पॉलिटब्युरोला सदर झालेल्या डॉक्टर ली मेंग यान यांच्या ०७ मे,२०२१च्या रिपोर्टनुसार; जनरल डेंझोन्ग शिनी २०१५मधे पीएलए टेक्स्ट बुकमधेप्रेडिक्ट वर्ल्ड वॉर थ्री ऍझ बायोलॉजिकल वॉरया शब्दांमधे या उपलब्धीचा उल्लेख केला आहे.  

डॉक्टर शु जियांगवो यांचे सहकारी असलेल्या प्रोफेसर शींनी,दक्षिण चीनमधील गुहांमध्ये असलेल्या वटवाघळांच्या रक्त विष्ठेतून या विषाणू/रोगजंतूचा मागोवा घेऊन, सांप्रत प्रचलित असलेल्या कोविद कोरोना १९ विषाणूंचा खतरनाक भाईबंद असलेल्या,आरटीजी १३ प्रजातीच्या विषाणूंची निर्मिती केली. प्रोफेसर शीं हे पीएलएचे सदस्य आहेत.”बायोलॉजिकल/जिनेटिकल ऍडव्हान्समेंट इज की एलिमेंट इन नेशन्स मार्च टुवर्ड्स ग्लोबल सुप्रीमसीया राष्ट्र्पती शी जिनपिंगच्या प्रख्यात प्रतिपादनानंतर पीएलएनी;प्रोफेसर शीं सारख्या अनेक शास्त्रज्ञांना आपल्या अखत्यारीत कार्यरत केल आहे.वरिष्ठ चीनी सेनाधिकाऱ्यांनुसार,कोविद कोरोना विषाणू या नवीन जैविक हत्याराला मानवी रोगात बदलून  भूतो भविष्यति असा नरसंहार शक्य होणार होता (इट कॅन बी आर्टीफिशियली मॅनिप्युलेटेड इन टू ह्युमन डिसीझ व्हायरस,देन वेपनाईझ्ड अँड अनलीश्ड इन वे नेव्हर सीन  बिफोर).  पीएलए  हे नव जैविक तंत्रज्ञान,स्व संरक्षण की आक्रमण करण्यासाठी वापरेल याची खात्री नसली तरी,जैविक तंत्रज्ञान (बायो टेक्नॉलॉजी) पीएलएच्या भावी संक्रमित प्रछन्न  युद्धाचा  (हायब्रीड वॉरफेयर) अभिन्न मूलभूत  अंग/हिस्सा असेल यात कोणाही संरक्षणतज्ञाला शंका नाही. “इफ यू आर बिल्डिंग स्कील्स टू प्रोटेक्ट युवर मिलिटरी फ्रॉम बायोलॉजिकल अटॅक, यू ऍट सेम टाईम आर गिव्हिंग युवर मिलिटरी कॅपॅबिलिटी टू युझ धिस वेपन ऑफेन्सिव्हली. यू जस्ट कान्ट सेपरेट टूही उक्ती पीएलएला चपखल लागू पडते.  . 

तज्ञांनुसार,तिसर महायुद्ध चीन विषाणू हत्यारांनी लढेल.सर्वात पहिले चीन जगावर रोग विषाणूंच गारुड टाकेल.त्यामुळे जगातील सामरिक/आर्थिक/सामाजिक चौकट खिळखिळी झाल्यावर तो सरते शेवटी जगावर वर्चस्व स्थापन करेल/गाजवेल.या आधीच्या महायुद्धात आपल्याला; विध्वंस, नरसंहार,मृत्यू आणि नंतरची भयाण स्मशान शांतता पहायला मिळाली.प्रत्येक महायुद्धानंतर जगाला;आर्थिक विवशता,जीवनोपयोगी सामान/संसाधनांची कमतरता,भूभाग हस्तांतरामुळे झालेली नवी राष्ट्र निर्मिती आणि नवीन जागतिक ध्रुवीकरण यांना सामोर जाव लागल.आज जगात हीच अवस्था/परिस्थिती निर्माण झालेली प्रत्ययाला येते.आजमितीला कोविद कोरोना १९मुळे जगभरात १५ कोटी ७५ लाख ९४ हजार लोक बाधित झाले असून ३२ लाख ८६ हजार मृत्युमुखी पडले आहेत. संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था चरमरीत झाली असून चीन त्याचा फायदा घेऊन मोठ्या कंपन्या,कवडी मोलानी गिळंकृत करतो आहे.जाणकार सूत्रांनुसार,१९८०मधे जगासाठी आपली अर्थव्यवस्था खुली करून चीननी  तिसऱ्या  महायुद्धाची मुहूर्त मेढ रोवली होती

तिसर महायुद्ध चीन; गोळा बारूद,बॉम्ब सैनिकांविना,कोविद १९ रोगाला कारणीभूत असलेल्या  सार्स कोव्ह विषाणूंच्या माध्यमातून लढेल. हे विषाणू,शत्रूच्या शरीरातील पेशींवर कबजा करत त्याच प्रजातीचे असंख्य विषाणू तयार करण्याच्या फॅक्टरीच काम करतात (रॅपिडली मल्टिप्लाय आफ्टर इन्फेक्शन). सुरवातीला भारत आणि उर्वरित जग हे युद्ध जिंकत असल्याचा आभास निर्माण झाला पण लवकरच या विषाणूंनी एक  नवी आघाडी उघडत,नवनवे क्षेत्र काबीज करण्याचा सपाटा लावला.या पुढे भारत आणि उर्वरित जगाला या विषाणूंच्या तिसऱ्या लाटेची प्रतीक्षा  आहे.विषाणू विरोधक लस, एकांतवास,एकमेकांपासून समयोचित दूरी,लोक संपर्क/व्यापारी व्यवहारावरील सापेक्ष सरकारी ताबा आणि मुखाच्छादन या अस्त्रांनी आपण या विषाणूंशी लढा देऊ शकतो.लोकांना एकांतवास आणि मुखाच्छादना   विषयी तिरस्कार वाटत असला तरी,करोना विरोधासाठी हे,कोणत्याही सैनिकी चिलखतापेक्षा जास्त प्रभावशाली चिलखत आहे.   

कोविद कोरोना १९च्या विषाणूंना मोकाट सोडून;सर्वत्र आर्थिक,वैद्यकीय आणि सामाजिक उलथा पालथ सुरु करून;चीननी २०२०मधे महायुद्धाच्या दुसऱ्या चरणाची सुरवात केली. या रोगाच्या प्रादुर्भावानी जगातील बहुतांश राष्ट्रांची अर्थव्यवस्था इतकी खिळखिळी झाली आहे की चीननी दिलेल आर्थिक कर्ज परत मागितल (लोन विड्रॉल) तर काय करायच,त्यामुळे निर्माण होणाऱ्या आर्थिक भूकंपाला कस तोंड द्यायच याची चिंता अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला देखील लागली आहे तर इतरांची काय बात? चीनी पॉलिट ब्यूरोनुसार;चीन,२०२५पर्यंत जगातील सर्वात शक्तिशाली तंत्रज्ञ राष्ट्र (सुपर पावर ऑफ टेक्नॉलॉजी) बनेल. २०३५पर्यंत तो नवीन उपक्रम सुरू करणारा जगातील सर्वंस्रेष्ठ देश (इनोव्हेशन लीडर) असेल आणि २०४९/५० मधे सर्वांना,आर्थिक सामरिक दृष्ट्या जगातील सर्वात सामर्थ्यवान शक्तिशाली देश म्हणून चीनला मान्यता द्यावीच लागेल. आपला उद्देश साध्य करण्यासाठी चीन,जैविक हत्यारांचा वापर करेल. वर उल्लेखित युद्धाभ्यासात, जैविक हल्ले कसे करायचे या बद्दल सराव केल्या गेला.सूत्रांनुसार,या सरावात  दोन मोठ्या गोष्टी उजागर झाल्या

पहिली म्हणजे पीएलएला; प्रखर सूर्यामुळे  जैविक हल्यात वापरल्या जाणारे अनुवंशवाहक जैविक विषाणू (पॅथोजन्स) मृतप्राय होतात आणि पाऊस किंवा बर्फ वर्षावामुळे त्यांच्या उडत्या परमाणूंवर (एरोसोल पार्टिकल्स) परिणाम होतो.शाश्वत पवन गती (स्टेबल विंड कंडिशन्स) असलेल्या रात्री,झुंजूमुंजू पहाटे किंवा संध्याकाळी गोरज मुहूर्तावर जैविक अस्त्रांचा मारा करण फलदायक असत कारण त्यामुळे लक्ष्य क्षेत्रात (टार्गेट एरिया) विषाणू वहन सुरळीतपणे होऊ शकत. जैविक हल्ल्यामुळे, शत्रू राष्ट्रात रुग्णालयाची आवश्यकता भासणाऱ्या रुग्णांची संख्या इतकी वाढली पाहिजे की त्यांची रुग्ण निवारण प्रणाली (मेडिकल सिस्टीम) कोलमडून त्याच्या प्रभावानी त्याची राजकीय,औद्योगिक,आर्थिक सामरिक ताकद नष्टप्राय होऊन  तेथील जनता वाव सुरक्षादलांमधे पराभूत मानसिकता निर्माण झाली पाहिजे हा  धडा मिळाला. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पीएलएनी; जैविक हत्यारातील अतिसूक्ष्म जैविक परमाणूंना गोठवून (फ्रीझ ड्राय), शत्रु क्षेत्रावर त्यांच परिवर्तन उडत्या परमाणुंमधे (फ्लाईंग एरोसोल्स) करण्याची क्षमता हासील केली आहे.शत्रू कोरोना विषाणूंच्या माऱ्यामुळे हताश/विवश झाला की त्याच्यावर आर्थिक/ सामरिक आक्रमण करून वर्चस्व मिळवायच/त्याचा ताबा घ्यायचा ही तिसरी महत्वाची बाब आहे.

 हा स्तर गाठण्यासाठी चीननी प्रचंड जीव हानी सहन केली. पण आज चीनपाशी जगातील मोठ्या कंपन्या,अप्रतिम संरक्षण व्यवस्था,अत्युच्च दर्जाचे तंत्रज्ञ आणि तंत्रज्ञान,संसाधन,आभासी माहितीशास्त्र,ब्लॉकचेन,पेटन्ट,पुनर्वापरी ऊर्जा आणि सर्वोत्तम इलेक्ट्रिक इंजिनियरिंन्ग कॅपाबिलिटी आहे. सूत्रांनुसार,जी २० ग्रुपच्या सदस्यांमधे चीन एकटाच असा देश आहे ज्याच सकल घरेलू उत्पादन (जीडीपी); कोविद कोरोना १९ विषाणूंनी २०२०मधे निर्माण केलेल्या जागतिक महामारीमधे दोन पूर्णांक बत्तीस टक्क्यांनी वृद्धिंगत झाल आहे. चीन सोडून इतर सर्वांना या महामारीची जबरदस्त आर्थिक झळ बसली हे ढळढळीत सत्य चीननी छेडलेल्या तिसऱ्या महायुद्धाच्या संकल्पनेला उजागर करत. सर्व बाधित देशांनी एकजूट होऊन चीनला वाळीत टाकण्याची (आयसोलेट  चायना) वेळ आली आहे.संयुक्त राष्ट्रसंघानी चीनला बहाल केलेला  विकसनशील राष्ट्राचा दर्जा काढून घेतला पाहिजे. चीन आता सर्व जगाला विकत घेऊन त्यावर सत्ता गाजवण्याची स्वप्न पाहतो आहे. चीनमधील विषाणू प्रसारावर आळा घातल्यानंतर चीननी;हेल्थ सिल्क रूट आणि वैद्यकीय औद्योगिक प्रतिष्ठानांना कार्यान्वयीत करून वैद्यकीय साधन/साजोसमान/सामुग्री/औषध निर्मिती सुरू केली आणि विषाणूंच्या या जागतिक लाटेवर स्वार होऊन प्रचंड प्रमाणात आर्थिक लाभ  घेत आपली प्रतिमा उज्वल केली आहे

 ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिया जैविक युद्धाच्या परिणामस्वरूप चीन अव्वल जागतिक आर्थिक महासत्ता बनला आहे. २०२२/२२३ मधे तो अमेरिकेवर आर्थिक मात करेल.२०२४पर्यंत चीन जगातला सर्वात श्रीमंत व्यापारी देश बनेल. चीनच्यामेड इन चायना २०२५ व्हिजननुसार”,चीन किमान नऊ विद्याशाखांमधे जगातील प्रथम क्रमांकाचा देश असेल.पण हे यश प्राप्त करतांना; ) चीनी विषाणूंमुळे जगाची अर्थव्यवस्था ध्वस्त होऊन चीनला आर्थिक महासत्ता कसा बनला; ) भारत,अमेरिका,ब्रिटन,इटली,शांघाय,ऑस्ट्रेलिया प्रमाणे चीनला कोविद कोरोना १९चा तडाखा का बसला नाही; ) २०१९मधेच चीननी त्याच्या वीस लाखांच्या सेनेत अर्धी कपात करायचा निर्णय का कसा घेतला; ) जागतिक महाशक्ती बनू इच्छिणाऱ्या चीननी पीएलची संख्या भारत अमेरिकेपेक्षाही कमी का केली; ) संयुक्त राष्ट्रसंघाच्या निरीक्षकांना वुहान प्रयोग शाळांमधे जाऊन निरीक्षण करण्याची परवानगी का नाकारल्या गेली, आणि ) हे विषाणू वुहानच्या प्रयोगशाळेत (लेबॉरेटरी) निर्माण झालेत की मांस बाजारात (वेट मार्केट) या बद्दल चीन जगाला संभ्रमात का ठेवतो आहे; या प्रश्नांची उत्तर चीनकडून अपेक्षित आहेत.

डिसेंबर,२०१९/जानेवारी,२०२०मधे भारतावर झालेल्या पहिल्या कोविद हल्ल्यामुळे आपल फारस नुकसान झाल नव्हत कारण त्यावेळी भारतात सर्वत्र चरम ते बाधित करणारी थंडी होती आणि वातावरणातील वाऱ्याचा रोख अरब समुद्राकडे होता. मात्र त्यानंतर मार्च महिन्यात असतेल समशीतोष्ण वातावरण आणि शाश्वत पवन गतीमुळे,दुसऱ्या कोविद हल्ल्यानी हाहाकार माजवला.तीच परिस्थिती मार्च एप्रिल २०२१मधे निर्माण झाली. मात्र आता यात म्युकरमायकोसिस सारख्या विषाणूंची भर पडली आहे जेकोरोना मधून सुखरूप  बाहेर पडलेल्या रुग्णांना बाधित करून मृत्युमुखी धाडताहेत. अशा प्रचंड जीव हानीमुळे भारत  सरकार/जनता बेजार/हताश होते आहे हे पाहून चीननी आता भूतान/लडाखच्या सीमेवर रणगाडे/क्षेपणास्त्र/विमान आणण सुरु केल आहे.आपल्यावर तो प्रत्यक्ष आक्रमण करेल की नाही हे येणार काळच सांगेलजगभरात थोड्या फार फरकानी हीच परिस्थिती पाहायला मिळते आहे. क्वाड मधे जायच नाही ही तंबी चीननी बांगला देशाला दिली आहे. क्वाडमधे जास्त इंटरेस्ट घेतला/दाखवला तर कोळसा व्यापार बंद करू ही धमकी त्यांनी ऑस्ट्रेलियाला दिली असून अमेरिकेच्या आर्थिक नाड्या आवळणही सुरु केल आहे. मजेची गोष्ट ही  की चीनच्या दादागिरीमुळे भयभीत झालेली वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनअशा प्रगत विषाणूंनाचायनीज कोविद व्हेरियंटम्हणण्या ऐवजी डब्ल्यूएचओ त्यांना,इंडियन, ब्रिटिश,ऑस्ट्रेलियन व्हेरियंट म्हणते आहे. एकूणच हे सर्व,अगम्य अतर्क्य आहे 

लेखक हे सेवानिवृत्त सैन्य अधिकारी आहेत, ऑपरेशन मिशन कारगील सारख्या अनेक महत्वाच्या मिशनमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे. संरक्षण विषयात लेखन सुवर्ण मदिरातील झंझावात, कारागील युद्ध आणि १९६५ चे भारत पाक युद्ध अशा पुस्तकांचे लेखन. ईमेल - abmup54@gmail.com. मो.बा. ९४२२१४९८७६

Leave A Reply

Your email address will not be published.