अक्षय तृतीया

0

साडेतीन मुहूर्तां पैकी एक मुहूर्त असणारी तिथी. सर्व प्रकारचे शुभ कर्म करता येणारा दिवस. साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असणारा दिवस.
या दिवशी नर नारायण जयंती, परशुराम जयंती, बसवेश्वर जयंती आणि हयग्रीव जयंती असते. या दिवशी आपल्या जवळच्या नदीत जाऊन अथवा गंगा स्नान करावे, समुद्र स्नान करावे, पंखा, तांदूळ, मीठ, तूप, साखर, चिंच, फळ आणि वस्त्रा चे दान करावे, दान गरजू व योग्य व्यक्तीस करावे. या दिवशी सातू खाणे अतिशय योग्य असून जरूर सातू खावे. नवीन वस्त्र, शस्त्र, दागिने, नवीन वस्तू विकत घ्याव्यात. नवीन आर्थिक व्यवहार करावेत.
या दिवशी देव आणि पीतर यांना उद्देशून ब्राह्मणाला उदककुंभाचे दान करावे, उदक कुंभाचे दान करणे म्हणजे- स्वतःच्या सर्व देह सदृश्य तसेच कर्मसदृश्य वासनांच्या स्थूल तसेच सूक्ष्म लहरी कुंभातील जलाल पवित्र मानून त्यात विसर्जित करणे आणि स्वतःचा देह आसक्ती विरहित कर्माने शुद्ध करून उदककुंभ योगे ह्या सर्व वासना पितर व देव यांच्या चरणी ब्राम्हणाला ग्राह्य धरून अर्पण करणे. पीतर मानव योनिशी संबंधित असल्याने ते आपल्या स्थूल वासना नष्ट करतात.

‌सांस्कृतिक महत्व-
महाराष्ट्रातील स्रिया चैत्र महिन्यात एखाद्या दिवशी हळदी कुंकुवाच्या निमित्ताने बायकांना बोलावून मोगऱ्याची फुले ,गजरा, आंब्याची डाळ आणि पन्हे देतात. त्या हल्दीकुत्कू समारंभाचा हा शेवटचा दिवस.

‌शेतीविषयक महत्व-
पावसाळा तोंडावर घेऊन अक्षय तृतीया येते,गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नांगरलेल्या शेत जमिनीची मशागत पूर्ण करण्याची अक्षय तृतीयेला प्रथा आहे. या मुळे शेत चांगले पिकेल आणि शेतकऱ्याला भरगोस उत्पन्न होईल असा विश्वास आहे. निदान पूर्वी तरी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर मगणजे पावसाळा सुरुवात होण्यापूर्वी शेतीची सर्व कामे पूर्ण केली जात असत. सध्या पावसाचे प्रमाण कमी जास्त झाल्याने व शास्त्रा प्रमाणे पेरणी न केल्याने जमिनी नापिकी होत चालल्या आहेत, त्यामुळे कसदार व रुचकर धान्य उगवण्याची प्रमाण कमी झाले आहे.
या मुहूर्तावर लावलेल्या फळ बागा भरगोस पीक देतात तसेच आयुर्वेदात सांगितलेल्या औषधीं चे वृक्षारोपण केल्यास त्यांचा तुटवडा भासत नाही अशी मान्यता आहे. शेतीचे पुढच्या वर्षीचे अंदाज बांधण्यासाठी हा दिवस अतिशय महत्वाचा आहे,घरातील कर्ता पुरुष सूर्योदयापूर्वी शेतात जातो, जातांना त्याला जे कोणी प्राणी , पक्षी दिसतील त्या वरून तो पुढच्या हंगामाचा अंदाज घेतो.

‌ज्योतिष संबंधी महत्व –
अक्षय तृतीयेला कृत युग संपून त्रेता युग सुरु झाले असे सांगितले जाते,कृत, त्रेता, द्वापार आणि कली युग हि महायुगाची चार चरण मानली जातात. ब्रम्ह देवाच्या दिवसाच्या प्रारंभाला “कल्पदी” तसेच त्रेता युगाचा (१२९६००० सौर वर्ष) प्रारंभ म्हणजे युगादी हि तिथी वैशाख शुद्ध तृतीयेला येते.

‌धार्मिक महत्व –
हा दिवस आपल्या पूर्वजप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणून सुद्धा ओळखला जातो. आपल्याला सदोदित सुख,समृद्धी,शांती प्राप्त करून देणाऱ्या देवाची उपासना केल्यास आपल्यावर त्या देवतेच्या कृपादृष्टीत कधीही क्षय होत नाही अशी श्रद्धा आहे.
ह्याच दिवशी बद्रीणार्यान मंदिराचे दारं उघडून भाऊबीजेला बंद होतात.मथुरा, कशी , वृंदावन या ठिकाणी हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. केदारनाथ, बद्रीनाथ यात्रा , चार धाम यात्रा या दिवशी प्रारंभ होतो. या दिवशी उत्तर भारतात यग्य याग करण्याची प्रथा आहे.दक्षिण भारतात विष्णू, लक्ष्मी, कुबेर यांना विशेष मन देऊन विष्णू महापूजा, लक्ष्मी कुबेर याग केला जातो. दान धर्म केले जातात.
राजस्थानात हा दिवस लग्न करण्याचा सर्वात शुभ दिवस मानला जातो व लग्न समारंभ मोठ्या प्रमाणात आयोजिले जातात.
पश्चिम बंगाल मध्ये या दिवशी आपल्या व्यवसायाचे नवीन वही खाते सुरु करतात त्याला “हल खाता” असे म्हणतात.लक्ष्मी व गणपतीची विशेष पूजा करून वही खाता सुरु केला जातो. ओरिसा मध्ये धरणी मातेची पूजा करतात. नवीन वस्त्र घालून शेतात जातात व धरणी मातेची पूजा करतात व येणारे वर्ष सर्वांना चांगले उत्पन्न होऊ दे अशी प्रार्थना करतात.

‌नितीन राजवैद्य

( फोटो www.hindujagruti.org वरून साभार)

Leave A Reply

Your email address will not be published.