२१ जून जागतिक योगदिवस.
२१ जून जागतिक योग दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतात योगाचे म्हत्व हे फार पुरातन काळापासून आहे. योग हे प्रत्तेक मानवाच्या आरोग्या करिता उत्तम असे एक साधन आहे. योग आणि आरोग्य याचे एक अनन्य साधारण महत्व आहे. त्याची महती संपूर्ण जगाला व्हावी या करिता विशेष करून २१ जून हा जागतिक योग दिवस म्हणून साजरा केला जातो. भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २७ डिसेंबर २०१४ ला सयुक्त राष्ट्रच्या महासभेत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव सम्म्त करण्याकरिता अपील केली. त्याला अमेरिके ने मंजूरी दिली. त्यानंतर प्रथम २१ जून २०१५ ला पूर्ण विश्वामध्ये विश्व योग दिवसाच्या नावाने साजरा करण्यात आला.
आजकाल कोरोनाच्या परीस्थिती मध्ये आपल्याला आरोग्याचे महत्व समजलेले आहे व अश्या परिस्थितीत योग आपल्याला खूप उपयोगी पडू शकतो . योगामुळे आपल्याला संपुर्ण स्वास्थ्य लाभण्यास मदत होते. जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्याची व्याख्या करताना असे म्हटले आहे कि “ केवळ आजार किवा अपंगत्व याचा अभाव नसून संपूर्ण शारीरिक , मानसिक ,सामाजिक व अध्यात्मिक सुस्थिती म्हणजे आरोग्य होय .” व योगामुळे शारीरिक , मानसिक , सामजिक व अध्यात्मिक स्वास्थ लाभण्यास मदत होते .
प्रथम आपण योग म्हणजे काय हे समजून घेऊ “योग” योग हा शब्द “युज” या धातूपासून आलेला आहे व याचा अर्थ “ जुळवणे “ , बांधणे किवा एकाग्र करणे असा आहे . सद्य परिस्थितीत म्हणाल तर आपल्याला बऱ्याच गोष्टी सोबत जुळवून घेता आले तर आपला तान कमी होण्यास मदत होते व आपण सुखी आयुष्य जगू शकतो . सर्व शाश्वत सत्याशी साधलेला संयोग व त्यातून येणारी निखळ आनंदाची अनुभूती म्हणजे योग. भगवान श्रीकृष्ण भगवत गीतेत अर्जुनाला सांगतात ,
“बुद्धियुक्तो जहातीत उभे सुदुश्कृते | तस्मोद्योगाय युज्यस्व योग: कर्मसु कौशलम ||
म्हणजे सुबुद्धी व मनशांती लाभलेल्या मनुष्याला योगाच्या अध्ययनाने कुशाग्र विवेकबुद्धी व कर्म करण्याचे कौश्याल्य प्राप्त होते .
हजारो वर्षापूवी आपल्या ऋषी मुनींनी योग याविषयावर खूप मेहनत घेतली, तप केला, अभ्यास केला, संशोधन केले, व त्याचे अनेक असे फायदे सर्वांकरिता समोर आणले. योग म्हणजे केवळ आसने , प्राणायाम किवा ध्यान नसून तर महर्षी पतंजलीनि अष्टांग मार्ग सांगितलेले ज्यामध्ये संपूर्ण आरोग्य प्राप्त होण्याकरिता अष्टांग मार्ग सांगितले आहेत.
“ यमनियामासन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यानसमाधयोsष्टावड:गानी|| प.यो . सु. २-२९ ||
यम – नियम , आसन , प्राणायाम , प्रत्याहार , धारणा , ध्यान , समाधी .
यम – नियम म्हणजे समाजात व स्वत: पाळावयाची बंधने आहेत . समाजात राहताना व स्वत: अहिंसा , सत्य , अस्तेय , ब्रम्हचर्य , अपरिग्रह हे यमतर शौच , संतोष , तप , स्वाध्याय व ईश्वरप्रनिधान हि स्वत: पाळावयाची बंधने पाळली तर त्याचे व समाजाचे स्वास्थ लाभण्यास मदत मिळते . आसनाने व प्राणायामाने शरीर आणि मनाचे स्वास्थ लाभते . आसनानि शरीराला दृडता , हलकेपणा , हार्मोन्स संतुलन , शारीरिक व मानसिक स्थिरता प्राप्त होते . प्राणायामामुळे मन शांत व एकाग्र व सद्य स्थिती मध्ये आपल्या फुफ्फु साची कार्य क्षमता चांगली राहण्यास मदत होते . प्रत्याहारामुळे ज्ञानेद्रीयांची धावपळ कमी होऊन मन अंतर्मुख होते . अशा शांत ,, एकाग्र , अंतरमुख झालेल्या मनाला धारणा –ध्यान – समाधी साधनेत लावले तर बुद्धी अधिक प्रगल्भ होते .
मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण अशी मनाची अवस्था प्राप्त होते व संपूर्ण आरोग्याची प्राप्ती योगसाधना करून आपल्याला मिळू शकते . योसासाधना आबालवृद्ध करू शकतात ,,योगसाधना करायला वयाची व धर्माची अशी अट नाही. मात्र विशिष्ट वयासाठी विशिष्ट असे काही आसने रोगानुसार काही आसन प्रकार व काही आजारांसाठी निषिद्ध अशी आसने आहेत. ते आपण अभासून करू शकता . व आपल्याला संपूर्ण स्वास्थ प्राप्त होऊ शकते जागतिक योग दिनाच्या निमित्ताने आज आपण संकल्प करूया कि आपण कोरोनाचे सर्व यम – नियम पाळूया व नियमित योग साधना करून निरोगी राहूया. आपण निरोगी तर आपला समाज निरोगी आपला समाज निरोगी तर आपला देश निरोगी व संपूर्ण विश्व निरोगी बनेल .
सर्वाना योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा .
बना योगी I राहा निरोगी II
योगशिक्षिका व आहारतज्ञ.
प्रा. जया अहेरकर गावंडे. औरंगाबाद.
Photo – Timesofindia साभार.