काश्मीर नंतर आता बंगाल वर पाकिस्तान ची नजर ?
काश्मीर नंतर आता बंगाल वर पाकिस्तान ची नजर ?
काश्मीर आता पाकिस्तान च्या हातून पूर्णतः निसटलेला आहे. ३७० आणि ३५ A हटण्यापूर्वी पाकिस्तान काही राजनीतिक आणि आतंकवादी हालचाली काश्मीर मधे करू शकत होता मात्र आता काश्मीर आणि लद्दाख केंद्र शासित झाल्यामुळे काश्मीर चे स्वप्न सुद्धा दूर दूर पर्यंत पाकिस्तान ला दिसत नसेलच. मात्र पूर्वी जे कश्मिरी पंडितांना आपल्या मायभूमीत हाकलून लावल्या गेले आणि तिथे जे आतंकवादी केंद्रित सत्ता सरकार मधे आली होती त्यांनी अल्पसंख्य हिंदू कश्मिरी नागरिकांवर कसे अत्याचार केले आणि त्यांना हाकलून लावले आपण ते चांगलेच जाणून आहोत. पुढे त्याच हिंदू कश्मिरी लोकांनी भारताच्या अन्य राज्यामध्ये शरण घेतली. आणि आजही ते अन्य राज्यांमध्ये शरणार्थी म्हणून जगत आहेत.
बंगाल मधे झालेली निवडणूक आणि त्यानंतर झालेली हिंसा हि पूर्व नियोजित असून , पुन्हा हिंदूंचा काश्मीर करण्याचा मोठा प्रयत्न करण्यात आला आणि काश्मीर ची पार्श्वभूमी पुन्हा बंगाल मधे दिसून आली, कित्येक हिंदू बंगाली बांधव हे आसाम ला शरण गेले आहेत. आसाम राज्य सरकार ने याच बंगाली हिंदूंना निर्वाचित हिंदू म्हणून शरण दिले आहे. खरं तर खूपच मनाला त्रस्त करणारी बाब आहे आणि अजून किती काश्मीर झाल्यावर हिंदूंना कळणार याची कल्पना करणे कठीणच …
#पश्चिम_बंगाल_आणि_मुस्लिम_तृष्टिकरण
बंगाल मधे मुस्लिम जरी बहुसंख्य नसले तरी एकूण देशाचा विचार केला तर सर्वात जास्त मुस्लिम लोकसंख्या हि पश्चिम बंगाल मधे आहे साधारणतः ३०-३५% मुस्लिम बंगाल मधे आहे . यात एकूण ३ जिल्हे पूर्णतः मुस्लिम बहुसंख्य आहे . बंगालच्या राजकारणात मग काँग्रेस असो डावी आघाडी असो वा तृणमूल काँग्रेस या सर्व पक्षांनी मुस्लिम तृष्टिकरणाची राजनीती अगदी डोक्यावर घेऊन केली आहे. हिंदूंना दुखावून तसेच घुसखोरी बांगलादेशी यांना समर्थन देण्यापर्यंत या सर्व पक्षांनी मदत केली आहे. आज आसाम मधे मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोरी करून त्यांचे स्वतःचे नेतृत्व ते उभे करीत आहे ..याच उत्तम उदाहरण म्हणजे बदृद्दिन अजमल. याच बादृद्दिन अजमल ने अनेक देश विघातक कार्य केले तसेच बंगाल आणि आसामी हिंदूंना हाकलून लावण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात केला आहे. याची जम्मात “उलेमा ए हिंद” हि संघटना मोठ्या प्रमाणात बांगलादेशी मुस्लिम लोकांना भारतात घुसखोरी करण्यासाठी मदत करीत असते. हे सर्व प्रकरण ममता सरकार असो वा अन्य कुठलाही पक्ष यांना हे उत्तम रित्या माहीत आहे .मात्र मुस्लिम तृष्टिकरणासाठी सर्व मंडळी उघड्या डोळ्यांनी हा प्रकार होऊ देत आहेत याचं यत्किंचितही शंका नाही. मात्र या वेळेस जर आपण मत बघितले तर २ कोटी ३० लाख मत अंदाजे भाजप ला मिळाली आहे. तर २ कोटी ८९ लाख मत तृणमूल ला मिळाली एकंदरीत हिंदूची मते मोठ्या प्रमाणात भाजप पक्षाला मिळाली हे नक्कीच म्हणजे यातून हेच समजू शकतो की येत्या बंगाल च्या राजकारणात मुस्लिम हित हे आता चालणार नाही . मुस्लिम तृष्टिकरणला आळा नक्कीच बसेल याच अडचणीमुळे आता घुसखोरी आणि मोठ्या प्रमाणात दंगली घडवून हिंसाचार करून हिंदूंना कसे हाकलून लावता येईल यावर प्रयत्न जिहादी करीत आहे यात सुद्धा शंका नाही.. बंगाल चे राज्यपाल यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून विरोध करणे हा यातीलच प्रकार आणि हा जिहाद संविधानसाठी घातकच…
#पाकिस्तानची_बंगालवर_गिद्ध_नजर
काश्मीर हातून निसटल्यानंतर आता काहीतरी भारताविरुद्ध आघाडी तयार करावी या साठी पाकिस्तानी सरकार , लष्कर ,आणि आतंकी संघटन Isis पाकिस्तान हे नेहमी तयारच असतात. खलिस्तान चे नाणे वाजवल्या वर सुद्धा काहीसा फायदा पाकिस्तान ला झाला नाही. त्यामुळे आता पाकिस्तान आपल्या isis संघटनेचा मदतीने बंगाल कडे मोठ्या आशेने बघत आहे. कारण त्यांना जसे अनुकूल वातावण हवे तसेच वातावरण बंगाली राजकारणी देत आहेत. बंगाल निवडणुकीनंतर जो हिंसाचार घडला तो माझ्यामते खूपच गंभीर आहे याला सहज घडलेला आणि राजनैतिक हिंसाचार म्हणून चालणार नाही. हा तर नक्कीच धार्मिक हिंसाचार राजकारणाला सामोर ठेवून झालेला आहे. पाकिस्तानी isis ने आता बांगलादेश मधील जमात ए इस्लामी या संघटनेला हाताशी घेतले आहे. हि तिच संघटना आहे . जिने बांगलादेश निर्मितीच्या काळात पाकिस्तानी सैन्याला मदत केली होती आणि यांनी सतत भारताला त्रास दिला आहे. याच संघटनेची एक ” हुजी” नावाची आतंकवादी संघटना आहे आणि ही हूजी पाकिस्तान च्या isis संघटनेच्या इशाऱ्यावर कार्य करीत असते. त्यामुळे बांगलादेश मधून भारताला हैराण करायचं हा कट पाकिस्तान करतोय. पश्चिम बंगाल हे नवीन आघाडी पाकिस्तान उघडण्याच्या तयारीत आहे. तसेच अनेक आतंकवादी बांगलादेश मधून भारतात पाठवणे हे काय फार नवीन नाही पण आता मात्र एक नियोजनबद्ध आतंकवादी कारवाई isis करू शकते. काश्मीर साठी लावलेली पूर्ण शक्ती आता पाकिस्तान बंगाल वर लावू शकतो हि गंभीर बाब आहे . मात्र जो हिंसाचार घडला यात मोठ्या प्रमाणात घुसखोर बांगलादेशी होते हे उघड होते आणि हाच चिंतेचा विषय आहे .आंतरिक देश विघातक शक्ती आणि मुस्लिम तृष्टिकरण जर तृणमूल सरकार ने रोकले नाही तर पुढ्याच्या निवडणुकीत चित्र बदललेले दिसेल. हिच वेळ आहे ममता बॅनर्जी यांनी आपले so called secularism सोडावे. नाहीतर आज मिळालेली हिंदू मते सुद्धा टिकवून ठेवता येणार नाही.
भारत माता की जय..!