अफगाणिस्तान ची घटना – एक चिंतन.
अफगाणिस्तान नागरिकांना बोट धरून ज्यांनी किनाऱ्यावर आणून सोडायचं त्यांनी अर्ध्या वाटेत सोडलं. सोपा वाटल्याने बौद्ध धर्म सर्वदूर पसरला. पण बौद्ध धर्माने शांतीला महत्त्व दिलं. त्यादरम्यान लढवैय्ये निर्माण झाले नाहीत. त्यामुळे आहे ती व्यवस्था टिकून राहू शकली नाही. धर्माला पूर्णतः जीवनातून काढून टाकणारी रशियाची कम्युनिस्ट राजवट पचवता आली नाही. अमेरिकेने २० वर्ष सैन्याच्या जोरावर काबूत ठेवू पहिले पण तेही झाले नाही कारण प्रश्न ideology चा होता. शस्त्रांच्या जोरावर तालिबानी विचारांवर काबू मिळवणं अशक्य! युरोपमधल्या प्रबोधनपर्वानंतर स्वीकारलेली नव्या मूल्यांमुळे एकेश्वरवादी ख्रिश्चन धर्माने नवी व्यवस्था स्वीकारली. मात्र शरिया कि आधुनिक जगाने स्वीकारलेली ही घटनात्मक मुल्ये ह्या प्रश्नांच्या जंजाळात हरविलेला अफगाणिस्तान… किंबहुना पाकिस्तान… बांगलादेशही… गोंधळलेल्या स्थितीत!
आज अफगाणिस्तानमधलं यादवी सदृश वातावरण बघितलं की आपल्या आजच्या संतुलनाविषयक कमालीचा अभिमान वाटतो. शरिया कायदेच घेऊन तालिबानला राज्य स्थापित करायचं आहे, सामान्य नागरिक त्याच कायद्यांचं पालन करताहेत पण तरी प्रचंड भीतीने देश सोडून जात आहेत. इतकी भीती कि ते विमानाच्या पंखावर बसत आहेत. बरं तोच तालिबानी दहशतवाद ज्यामुळे खरतर हे मुस्लीम असल्याने ह्यांना काही भीती नाही, प्रश्न येणार आहे स्त्रियांचा, त्यांच्या हक्कांचा, तर पळून जाणार्यांमध्ये स्त्रिया कुठे आहेत? कि हे लोक त्यांना हवाली करून जात आहेत? पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान ‘गुलामीच्या बेड्या तुटल्या’ अशा क्लिप्स देत आहेत, तर त्यांचेच पत्रकार हमीद मीर ह्यांना पाकिस्तानला धोका आहे असं वाटत आहे आणि इम्रान खानच्या अगदी विरुद्ध बोलत आहेत. काबुलमधला तुरुंग तोडून तालिबान समर्थक तेहरिक ए तालिबान म्हणजे पाकिस्तान तालिबान गटाला मुक्त सोडलं. पण पाकिस्तानविरुद्ध कारवाया करणाऱ्या दहशतवादी गटांना ट्रायलशिवायच मारून टाकलं. अफगाणिस्तान हा विविध इस्लामी टोळ्यांचा प्रदेश आहे आणि कोणाचीच कोणाशी एकी नाही. अफगाणी फौजाही न लढताच, युद्ध न होताच surrender झाल्या, राष्ट्राध्यक्ष निघून गेले. पूर्ण इस्लामी राष्ट्र की पाकिस्तानप्रमाणे लोकशाहीचं प्रदर्शन करणारं इस्लामी राष्ट्र इतकंच निवडीचं स्वातंत्र्य फौजांना, सामान्य नागरिकांना! utter confusion! 99% पेक्षा जास्त जनता मुस्लीम असूनही ही अनागोंदी!
पण भारतात मात्र शेकडो भाषा, अनेक धर्म, संस्कृती असूनही, राजकीय माऱ्यामाऱ्या असूनही जे संतुलन आहे, ती हिंदुत्वाच्या पुनरुज्जीवनामुळे (revival) आहे. thanks to ज्यांनी ज्यांनी हे धर्मचक्र फिरवलं! गौतम बुद्ध, महावीर, गुरुनानक, आद्य शंकराचार्यांपासून ते विवेकानंद, योगी अराविन्दांपर्यंत, संत ज्ञानेश्वर, तुकारामांपासून ते राजा राममोहन रॉय, बाबासाहेबांपर्यंत, चंद्रगुप्त मौर्य ते शिवाजी महाराज, रणजीत सिंगांपासून ते पेशव्यांपर्यंत, सनातन धर्मातील वेदांमधील शिकवणुकीपासून ते आजच्या नव्या तंत्रज्ञानाच्या अविष्कारापर्यंत ज्यांनी ज्यांनी विचारांना, व्यवस्थेला, राज्याला दिशा दिली, पुनर्निर्माण केलं, पुनुरुज्जीवन केलं, परिवर्तन केलं आणि धर्माचं चक्र फिरवत ठेवलं. वैयक्तिक आयुष्यातील धर्म अबाधित ठेवत घटनात्मक मूल्यांच्या आधारावर वाटचाल करत जाताना इकडे जावं कि तिकडे जावं असा प्रश्न पडला नाही. नाहीतर कम्युनिजमने, अमेरिकेने जसा हात सोडून दिला तसा हात सोडून न देता किनार्यापर्यंत पोहोचवणारी भारतीयत्त्वाची ही soft power च आणि अभ्युदय आणि निःश्रेयस दोन्हीची संतुलित प्राप्ती करता येणारे हिंदू अध्यात्मच केवळ इथून पुढे दिशा दर्शक ठरेल. thanks to those ज्यांनी सनातन धर्माची नाळ आजच्या काळाशी विचार दर्शनाच्या मांडणीतून सुसंगतपणे जोडली.
अफगाणिस्तानमधील विविध टोळ्यांची एकमेकांवर चाललेली कुरघोडी, आणि विविध विचार – शक्यता ह्यामुळे झालेली अनागोंदी बघितली कि एकजूट किंवा संगठन ही गोष्ट किती म्हणजे किती महत्त्वाची आणि दूरदृष्टीने विचार केलेली होती हे कळतं. स्वातंत्र्य दृष्टिपथात आलं असताना आणि राजकीय नायक होण्याची क्षमता आणि संधी असतानाही, राजकीय मंचाकडे पाठ फिरवून डॉ. हेडगेवारांनी एकात्मता आणि संगठन ह्यावर लक्ष केंद्रित केलं. शेकडो सण समारंभ, विचारधारा ह्यामधून भारतीय एकत्र येतील असे सहा उत्सव निवडले. म्हटले तर धार्मिक, म्हटले तर सामाजिक! महाराजांच्या स्वराज्य स्थापने इतकंच, राज्यघटना निर्मिती इतकंच, समाज सुधारकांनी अनिष्ट प्रथा दूर करण्याइतकंच challenging आणि आवश्यक काम होतं असं एकत्र आणणं. त्याच्या अभावी अशी अनागोंदी झाली असती.
राष्ट्रांना होरपळवून टाकणारी विचारसरणी क्रिटीकली तपासली आणि रोखली पाहिजे आणि सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दुख भागभवेत। सांगणारी विचारधारा आत्मविश्वासाने कोणत्याही गिल्टी भावनेशिवाय रुजवली पाहिजे.