भूमिका

नमस्कार,

लोकसंवाद डॉट कॉम या संकेत स्थळाला भेट दिल्याबद्दल आपले मन:पूर्वक धन्यवाद..!

लोकसंवाद मिडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून आम्ही लोकसंवाद डॉट कॉम हे ऑनलाइन मीडिया संकेतस्थळ व YouTube चॅनल चालवित आहोत. या माध्यमातून अनेक लेखक, साहित्यिक, कवी, अभ्यासक, वाचक यांचे करिता सोशल मीडिया क्षेत्रात एक चांगले व्यासपीठ निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

समाजाशी निगडीत विविध विषयांची माहिती, विविध विषयांचे साहित्य हे बदलत्या काळात, बदलत्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने लोकसंवाद डॉट कॉम चे माध्यमातून आपल्या समोर ठेवत आहोत. तसेच युवा संवाद, कृषि संवाद, महिलांकरिता शक्ति संवाद अशा विविध विषयांची कार्यशाळा, चर्चासत्र, मार्गदर्शन पर कार्यक्रमांचे आयोजन सुद्धा लोकसंवाद डॉट कॉम चे माध्यमातून आम्ही करीत आहोत. आमचे वाचक, लेखक, हितचिंतक यांचे मार्गदर्शनाने व सहाय्याने लोकसंवाद आपली यशस्वी वाटचाल करत आहे.  

राष्ट्रीय विचारांना समर्पित असणारे लोकसंवाद डॉट कॉम हे संकेतस्थळ आणि YouTube चॅनल आपले सामाजिक भान कायम ठेवत आपली  सामाजिक बांधिलकी जोपासत राहील या विश्वाससह…!

टिम लोकसंवाद डॉट कॉम. 

 

नितिन राजवैद्य.

मुख्य संपादक, लोकसंवाद डॉट कॉम

www.loksanvad.com