महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक जाहीर.
महाराष्ट्रात आणि हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने आदर्श आचारसाहिता लागू करून निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. दोन्हीही राज्यात २१ ओक्टोंबर ला मतदान होऊन २४ ओक्टोंबरला निकाल जाहीर होणार आहे.
महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ मतदार संघासाठी एकाच टप्यात निवडणूक होणार असून महाराष्ट्र राज्यात ८ कोटी ९४ लाख ६२हजार ७०६ एकूण मतदार नोंदणी झाली आहे. या निवडणुकीसाठी ९५ हजार ४७३ मतदान केंद्र असून त्या ठिकाणी १.०८ लाख ई व्ही एम चा वापर होणार आहे.
- उमेदवारी अर्ज दाखल करणे – २७ सप्टेंबर ते ०४ ओक्टोंबर.
- अर्जाची छाननी – ०५ ओक्टोंबर.
- उमेदवारी अर्ज मागे घेणे – ०७ ओक्टोंबर .
- प्रचाराचा शेवटचा दिवस – १९ ओक्टोंबर.
- मतदान (संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी ) – २१ ओक्टोंबर.
- निवडणूक निकाल – २४ ओक्टोंबर.
आचारसाहितेचे काटेकोर पालन करावे तसेच राजकीय पक्षांनी प्रचार मोहिमेत प्लॅस्टिकचा वापर टाळून पर्यावरण पूरक साहित्यांचा वापर करावा असे आवाहन मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्यात लोक शाहीचा महोत्सव जाहीर झाला असून प्रत्तेक नागरिकाने त्यात सहभागी व्हावे व आपला अधिकार व कर्तव्याचा वापर करावा अशी विनती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
- टिम लोकसंवाद