एस जयशंकर नावाचा हिरा !
एस जयशंकर नावाचा हिरा!
विदेशमंत्री एक निष्णात राजनैतिक अधिकारी म्हणून आपण ओळखतो. तसंच एखादा माणूस किती हजरजबाबी आणि तिखट असू शकतो याचंही ते एक उत्तम उदाहरण आहेत. त्यामुळेच २०१९ ला ते मंत्री बनले तेव्हा एका विशिष्ट वर्तुळाच्या बाहेर माहित नसलेले जयशंकर आता सामान्य भारतीयांच्या गळ्यातले ताईत बनलेत.
एका राजकारणी नसलेल्या “करियर डिप्लोमॅट” व्यक्तीने अशी लोकप्रियता मिळवणे बदलत्या भारतीय अभिरुचीचं सुचिन्ह दर्शवते!
त्यांची वाणी विदेश दौऱ्यात फिरंगी, उद्धट “गोरी चमडी” राजकारणी आणि पत्रकारांना आसूड ओढताना विलक्षण तेजस्वी आणि धारधार होते. ३७० काढून टाकल्यावरची अमेरिकीन सिनेटर्सनी घेतलेली मुलाखत असो किंवा युक्रेन युद्ध सुरु झाल्यावर भारताने रशियन तेल घेऊ नये म्हणुन बदमाश यूरोपियन आणि ॲपळ अप्पलपोट्या अमेरिकी पत्रकारांनी केलेला थयथयाट असो, जयशंकर यांनी त्यांना त्यांचा स्वार्थीपणा दाखवताना घेतलेली तिखट पण संयत भूमिका भारतीयांच्या मनात घर करून राहिली आहे.
काल त्यांच्या इंडिया वे पुस्तकाचं मराठी भाषांतर प्रकाशित करण्याच्या कार्यक्रमात त्यांची प्रश्नोत्तरे सुद्धा अप्रतिम होती आणि बुध्दीला खुराक देणारी होती!
एका पत्रकाराने त्यांना विचारलं, “दिवाळखोरीच्या उंबरठ्यावरील पाकिस्तान तुम्हाला संधी वाटते, धोका वाटतो, संकट वाटतं का गळ्यात पडलेली नकोशी जबाबदारी?”
जयशंकर म्हणाले,”ती एका वास्तविकता आहे!”
मूळ इंग्लिश संभाषण असं, “Sir, bankrupt and unstable Pakistan is opportunity, liability or threat for India?”
जयशंकर म्हणाले, “It’s reality!”
सामान्य जनता एखाद्या राजनैतिक मुद्द्याकडे ज्या नजरेने बघते त्याच्या पेक्षा एक कसलेला राजनैतिक, विदेशमंत्री किती वेगळ्या कोनातून बघतो याचं हे उत्तम उदाहरण आहे!
जयशंकर यांच्याकडे बघत बघत तरुण बुद्धिमान भारतीय मळलेल्या वाटा सोडुन फॉरेन सर्व्हिसेस कडे अधिकाधिक संख्येने कडे जावोत ही अपेक्षा!
— विनय जोशी
Dr S. जयशनकार फोटो गुगल साभार.