दीनदयाळ उपाध्याय.

0

पूर्वीच्या मुघलसराय स्टेशनवरचा खंबा क्र.1276

इथेच भारतमातेच्या एका महान सुपुत्राची निर्मम हत्या करण्यात आली.

बालपणीच आईवडील, भावाचा मृत्यू……दीदयालजींचा सांभाळ मामांनी केला. प्रचंड बौध्दीक क्षमता असलेल्या दीनदयालजींनी मोठ्या आधिकारी पदाची संधी नाकारुन स्वत:ला राष्ट्रकार्यात समर्पित केले. राष्ट्रसेवेचा निर्णय घेतल्यावर त्यांनी आपली सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे,पुरस्कार अग्निला समर्पित केले.

त्यांच्या मामांची इच्छा होती,की दीनदयालने मोठे आधिकारी व्हावे,पण दीनदयालजींनी त्यांना पत्र लिहून विनवणी केली “की ज्या राष्ट्रासाठी महाराणा प्रताप रानावनात भटकले,ज्या राष्ट्रासाठी छत्रपती शिवरायांनी सर्वस्वार्पण केले, गुरु गोविंदसिंहांनी आपल्या मुलांचे बलिदान दिले, त्या राष्ट्रासाठी तुम्ही तुमचा एक “दीनदयाल” देऊ शकत नाही का?”

दीनदयालजी रा.स्व.संघाचे प्रचारक होते…ही निष्ठा अंतिम श्वासापर्यंत कायम होती…..एकदा एका पत्रकाराने दीनदयालजींना विचारले होते ” तुमचा पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
यापैकी एकाची निवड करायची झाल्यास ,तुम्ही कशाची निवड कराल?
दीनदयालजींनी प्रतिप्रश्न केला “तुम्हाला नोकरी आणि घर यापैकी एकाची निवड करायची झाल्यास कशाची निवड कराल?” पत्रकार उत्तरला “अर्थातच घराची”!! दीनदयालजी म्हणाले “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे माझे घर आहे”

11फेब्रु 1968ची काळरात्र!! दीनदयालजी नेहमीप्रमाणे प्रवासाला निघाले……पण तो प्रवास अनंताकडे नेणारा झाला……मुघलसराय स्टेशनवर एक बेवारस प्रेत सापडले!! स्टेशनवर गर्दी जमली ,गर्दीतला एकजण ओरडला “अरे,यह अपने पंडीतजी है”
सगळा देश हादरला!!…..युधिष्ठीरांच्या परंपरेतील या माणसाला कोणी मारले असणार? हा प्रश्न आजही अनुत्तरीत अाहे”

दीनदयालजी आज देहरुपाने नाहीत,पण त्यांचा विचार अमर आहे. त्यांचे “एकात्म मानवदर्शन” भारताला वैभवशिखरावर नेणारे आणि जगाला दिशा देणारे आहे.

त्याच विचारांच्या प्रकाशात आमचा प्रवास असाच चालु राहणार आहे….वैभवशाली भारताच्या दिशेने…..चरैवेती,चरैवैती!!……चलते चलो भाई,चलते चलो!!

पंडीत दीनदयाल उपाध्याय यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन!!

– रवींद्र गणेश सासमकर

लेखक सामाजिक आणि इतिहास विषयाचे अभ्यासक आहेत. संदर्भासाहित लेखाची मांडणी करण्यात लेखकाचा हातखंड आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.