औरंगजेब संत ?

0 658

एका घरातील इंग्रजी माध्यमात शिकणारा मुलगा आणि त्याच्या वडीलांचा संवाद

मुलगा – पप्पा,तुम्हाला माहीतीय का? औरंगजेब हा महान संत होता,त्याची राहणी साधी होती, जणू या वर्ल्डमधला डिक्टो दुसरा गाॅडच…जिंदा पीर !!

पप्पा- अरे वेडा झालास का? औरंगजेबाने आपल्या छत्रपति शंभुराजांची हत्या केली. गुरु तेगबहादुरांचा शिरच्छेद केला. उदयपुरमध्ये 300 मंदिरे पाडली आणि आपल्या पंढरपुरच्या विठोबाच्या मंदिरालासुध्दा त्याने हानी पोहचवली होती.

मुलगा – Dad,…अहो, औरंगजेब तर संत होता ना? मग संत लोक असे कसे करतील? ते कस शक्य आहे?

पप्पा- अरे मूर्खा, तुला कोणत्या मास्तरने असला इतिहास शिकवला? औरंगजेब संत आणि जिंदा पीर होता म्हणून!

मुलगा – अहो किती बावळट आहात तुम्ही? आमच्या सातवीच्या इतिहासाच्या पुस्तकातच लिहिलंय…मग पुस्तके कधी खोटे लिहितील का? आमचे टिचर कसे खोटे बोलतील?

वडील कपाळावर हात मारुन घेतात…….

वरील संवाद काल्पनिक असला तरी संवादातील मुलाचे इतिहासाचे पुस्तक मात्र सत्य आहे…Social Science History – based on NCERT syllabus & guidelines for CCE या सातवी इयत्तेसाठी लिहिलेल्या पुस्तकात पान क्रमांक 54 वर औरंगजेब हा ‘देवाला घाबरणारा परंपरावादी मुसलमान’ Living Saint ( जीवंत संत) किंवा ‘जिंदा पीर’ होता असे लिहिले आहे.शिवाय त्याच्याबद्दल मुलांना आदर निर्माण व्हावा,म्हणून त्याच्या साधेपणाचे कौतुक केलेले आहे.

त्याने अकबराची सहिष्णुतेचे धोरण सोडुन दिले,असे लिहिले आहे.पण त्याचे धोरण सहिष्णु होतेच कुठे? चित्तोड विजयानंतर 30,000 राजपुतांची कत्तल करणे? युध्दात जिंकलेल्या हिंदु स्त्रीयांना जनानखान्यात भरती करणे,याला सहिष्णुतेचे धोरण म्हणायचे का?

तो जझियामुळे लोकांना अप्रिय झाला असे लिहिलेले असले तरी जझिया म्हणजे काय? हे सविस्तर लिहिलेले नाही. औरंगजेबाने केलेला हिंदु मंदिरांचा विध्वंस ,कत्तली ,धर्मांतरे याबाबत एक अक्षरही या पुस्तकात नाही. याच पुस्तकात पान क्र. 47 पासून 57 पर्यंत मुघल कालखंड शिकवलेला आहे.या प्रकरणाचे नावच मुळात ‘The Great Mughals’ म्हणजे ‘महान मुघल’ असे आहे.

NCERT चा एकुण 2200 पानांचा अभ्यासक्रम आहेत,त्यात मराठ्यांच्या वाट्याला फक्त 02 पाने आली आहेत.

अशाप्रकारे परकियांचा इतिहास आपली मुले शाळेत शिकतात… मग आपण कोणत्या वैभवशाली राष्ट्राची अपेक्षा करु शकतो? अशा शिक्षणातून निर्माण होते ते कणाहीन तारुण्य!!… छत्रपती शंभुराजांनी देव,देश,धर्मासाठी केलेल्या बलिदानाचे मोल यांना समजणार कसे? पानिपतावर देशाच्या रक्षणासाठी रक्त सांडलेल्या लाख मराठ्यांच्या बलिदानाने यांचे डोळे पाणावतील कसे???

लक्षात येतय का?……खरा इतिहास समोर आणणे का गरजेचे आहे??

– रवींद्र गणेश सासमकर

लेखक सामाजिक आणि इतिहास विषयाचे अभ्यासक आहेत. संदर्भासाहित लेखाची मांडणी करण्यात लेखकाचा हातखंड आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.