गीतसप्तक

0

आज आपण बघणार आहोत, “संत ज्ञानेश्वर” या चित्रपटातलं सुंदर आणि अर्थपूर्ण गाणे. संत ज्ञानेश्वर म्हणजे अगाध भक्ती आणि लहान वयात ज्ञानेश्वरी म्हणजेच भगवद्गीताच पण मराठी भाषेचा पाया रचून सोपी करून सांगितली. भगवद्गीतेवर भाष्य केले आहे. असह्य यातना,समाजकंटकांनी दिलेल्या पीडा संयम ढळू न देता सहन करत सर्व सहन केले आणि स्वतःच्या तेजःपुंज अशा ज्ञानाने स्वतःचे अनन्यसाधारण महत्व सिद्ध केले, आपले कार्य फारच बालवयात संपवले आणि समाधिस्त झाले. मोह नव्हता जगण्याचा फक्त जेवढे करता येईल तेवढे अगदी भरभरून दिले आणि आजही त्यांचे अभंग ऐकले की क्ळतं,काय सुरेख आहेत.अर्थात श्री विठ्ठल कृपा तर होतीच ज्ञान अधिक ईश्वर ज्ञानेश्वर यावरून लक्षात येईलच. इतक्या लहान वयात सर्वंकष ज्ञान अवगत असणं म्हणजे ईश्वराचा वरदहस्त नक्कीच असणार नव्हे अवतार कार्य करण्यासाठीच जन्म घेतला. तर आज आपण, ज्योत से ज्योत मिलाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो….” ह्या गाण्याविषयी मला जे भावलं ते समजून घेणार आहोत. ज्योत म्हणजे दिवा तर अशा ज्योत जोडत चला म्हणजे ज्ञान आणि प्रेमाची अखंड ज्योत जोडून अज्ञान रूपी अंधःकार नाहीसा करायचा आणि आपल्या कार्यात जे गरीब, दीन,दुबळे सोबत येतील त्या सर्वांना प्रेमाने घेऊन चला. ज्यांचे कोणीच नाहीत त्यांचे ईश्वर रक्षण करतो तसेच ज्यांच्याकडे पैसा नाही, जे दुबळे आहेत तेच ईश्वराचे लाडके आहेत आणि हे खरंच आहे, ईश्वराला तुमचा पैसा नकोच आहे फक्त भक्तीभावाने शरण जा. भक्ती अगदी अंतःकरणापासून करा,ईश्वर तुमचाच आहे म्हणून फक्त प्रेम करत जा सर्व जीवमात्रांवर. इथे “प्यार के मोती ” खूप सुंदर म्हंटले आहे.तसं पाहिलं तर मोती खूप महाग आहेत पण इथे मोती म्हणजे प्रेमरूपी मोती उधळा असा अर्थ अपेक्षित आहे. ब-याच जणांच्या इच्छा, आकांक्षा पूर्ण होत नाहीयेत,निराश आहेत,माया जिव्हाळा पण मिळत नाहीये,सगळं काही हातातून सुटत चाललंय म्हणून तुम्ही मायेचा ,आशेचा किरण बना अशांसाठी, तुमच्यातली कणव,दया सोडू नका आणि आधार द्या जमेल तेवढा ,हे सर्व करण्यासाठी दयारूपी दीप सदैव तेवत ठेवा ,दया ,प्रेम आटू देऊ नका. सतत दया नितळत राहू द्या. सध्या चहूबाजूंनी अंधार पसरला आहे म्हणजे मनामनात अंधार पसरला आहे, दिशा भटकल्यात ,कोणी कोणाला चांगला मार्ग दाखवू शकत नाहीयं. मनुष्याचे विचार बदललेत,वाईट मार्गाला लागलायं,गुंडागर्दी वाढत चालल्याने मनुष्य दानव म्हणजेच राक्षस बनतोयं त्यामुळे हे कोणाला समजावून सांगणार? मनुष्य बुद्धीमान प्राणी आहे पण तो सध्या कुकर्म करायला लागला आहे तर ही व्यथा सांगायची तरी कोणाला, ऐकून घेणारेच कोणी नाही? धरती म्हणजेच पृथ्वीला स्वर्ग बनवा ,हे सर्व जे चालू आहे ते सुधारून पृथ्वी वाचवण्यासाठी तरी निदान स्वर्गासारखं बनवा. कोणी श्रेष्ठ नाही, कोणी कमी नाही, सर्वांमध्ये परमेश्वर स्थित आहे,सामावलेला आहे मग मी मोठा, तू लहान हे सगळे आपल्याच मनाचे खेळ आहेत. भेदभावाच्या भ्रमातच मानव अडकून पडला,भ्रमिष्ट झाला म्हणून अधर्म करू नका तर मानव धर्म काय आहे? धर्माचे पालन करा,धर्माचा झेंडा सदा फडकवत ठेवा म्हणजे नीती,अनीती हे थांबेल, भेदभाव कमी होतील. सा-या जगतात,कणाकणात एकच महान,दिव्य अविनाशी, अमर आत्मा आहे. एकच ब्रम्हा आहे आणि एकच सत्य आहे आणि ते म्हणजे एकच परमात्मा आहे म्हणून जीवाला जीव देऊन, एकमेकांसोबत राहा,मिळून मिसळून राहा. आजच्या घडीला हीच स्थिती निर्माण झाली आहे, कोणी कोणाचंच ऐकायला तयार नाही, अत्याचार, आतंकवाद,गुंडागर्दी वाढली आहे,भेदभाव, लहान,मोठे अशा एक ना अनेक समस्या भेडसावत आहेत तरी आपण काहीच सोडायला तयार नाही,मी,माझं एवढ्या पुरतेच मर्यादित न राहता सर्वांचाच विचार करणं आवश्यक आहे आणि सर्वांनी मिळून जर ठरवलं तर नक्कीच ही स्थिती बदलेल, रामराज्य यावे असे वाटत असेल तर माणुसकीने वागण्याची आत्यंतिक गरज आहे. किती सुंदर सांगितले आहे, परमेश्वर चराचरात सामावला आहे पण जिथे भेदभाव केला जातो, दया ,माया नाही त्यांच्यात कधीच परमेश्वर वास करत नाही तर तो जे दीन,दुबळे आहेत त्यांच्यात तो आहे आणि तुम्हाला जर परमेश्वराला प्राप्त करायचे असेल तर तुम्ही दीन,दुबळ्यांना मदत करा,भुकेने व्याकुळ झालेल्यांना अन्न द्या, त्यांचा आधार बना,नक्कीच भगवंत तुमच्यात वास करेल. भगवंत मंदिरात नाहीच आहे ,तो तुमच्या, आमच्या सर्वातच आहे पण माणुसकीची जपणूक करणा-यांनाच तो दिसतो. आपल्याकडे भरपूर आहे,कधी मोकळ्या मनाने ज्यांना गरज आहे त्यांना देऊन तर बघा वेगळाच आनंद मिळेल,समाधान वाटेल. कधी कधी स्वतःसाठी नाही तर दुस-यांसाठी जगून तर बघा,यासारखे सुख कुठेच मिळणार नाही शिवाय ज्यांच्याकडे नाही त्यांना द्याल तर त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील आणि हा त्यांच्यात दडलेला देवच करेल म्हणून “जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा देव तेथेचि जाणावा…” अशांनाच गरज आहे आपल्या प्रेमाच्या उबेची म्हणून अशा सर्वांवर भरभरून प्रेम करा,दया,माया करा. बाबा आमटे आणि त्यांच्या अख्ख्या कुटूंबाने कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी आपले जीवन वाहून घेतले,समर्पित केले असं म्हंटल्यास वावगे ठरणार नाही पण यासाठी मनाचे औदार्य हवे तर आणि तरच शक्य होते. भेदभाव, अज्ञान,लहान, मोठे, धर्म, अधर्म या सर्वांच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची आवश्यकता आता निर्माण व्हावयास हवी,साधू,संत बनणं सोपं नाही त्यासाठी त्यागी वृत्ती हवी आणि म्हणूनच या सर्व मनातल्या अंधःकाराला नाही करण्या ज्ञानरूपी ज्योत ज्योतीला जोडत गेलात तर तुमच्या सोबत हळूहळू सर्व जोडले जातील आणि प्रेमरूपी गंगा प्रवाह्य होत राहील सर्वांच्या मनातली,मळभ दूर होऊन जग सुंदर होईल स्वर्गाप्रमाणे अगदी सर्वच बाबतीत. मनुष्यानेच हे सर्व निर्माण केले आहेत ,वाद,भांडणं, द्वेष, मत्सर आणि त्यालाच दूर करावा लागणार आहे त्याचा अंधःकार! संत ,महात्मे हीच शिकवण त्यासाठीच देत आलेत,स्वतःला सुधारा ,जग सुधरेलच पाठोपाठ. सौ स्नेहा लाडसावंगीकर

0
Leave A Reply

Your email address will not be published.