जरांगे आंदोलन : ओबीसी नेत्यांना शिव्या व मुस्लिमांना मिठया ? कितपत योग्य ?

0

जरांगे आंदोलन : ओबीसी नेत्यांना शिव्या व मुस्लिमांना मिठया ? कितपत योग्य ?

मुस्लिमांना मिठ्या कितपत योग्य ?

म.फुले-शाहू-आंबेडकर यांचा पुरोगामी महाराष्ट्रात तथा जातीअंताची लढाई लढणारा महाराष्ट्र आज मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या आडमुठी भूमिकेच्या मुद्दा वरुन अस्थिर करून हिंदूना जातीजाती मध्ये विभागण्याचा प्रयत्न केला जात आहे. मराठा – ओबीसी असा संघर्ष निर्माण करून प्रचंड मोठी दरी निर्माण करण्याचा मोठ्या प्रमाणात सुद्धा प्रयत्न सुरू आहे. त्याचे पडसाद सोशल मीडियावर रिल्स,ग्राफिक,पोस्टर द्वारा मोठ्या प्रमाणात उमटत आहेत व त्यामधून जातीय वणवा पेटत आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी जातीय ध्रुवीकरण करून केवळ भाजपा सारख्या पक्षाला मतदान होऊ नये म्हणून मराठवाड्यातील काही जिल्हा मध्ये गावंबंदी, व्यवहार बंदी, सामाजिक बहिष्कार सारखे समाज तोडण्याचे प्रयोग मोठ्या प्रमाणात झालेले आहेत. मराठवाड्यातील जालना,बीड,धाराशिव अशा जिल्हात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून ओ.बी.सी समाज आजही दहशती खाली वावरत आहे. तसेच हिंदू समाजात फूट पाडण्यासाठी व मराठा आरक्षणाच्या नावा खाली ओ.बी.सी यांना गांवबंदी व्यवहार बंदी,शिवीगाळ आणि मुस्लिम समाजाला ओ.बी.सी मधुन १० टक्के आरक्षण देण्याची मागणी केली जात आहे .  त्यामुळे ओ.बी.सी यांना गावबंदी व मुस्लिम आरक्षण मागणी करून त्यांना मिठ्या मारणे कितपत योग्य आहे? अशा प्रश्न मराठा समाजात सुद्धा चर्चिला जात आहे.  वास्तविक पाहता गरजवंत मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही सर्वांची मनोमन इच्छा आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी मराठा आरक्षणास खुला पाठिंबा सुद्धा दिला आहे. संभाजीराव भिडे यांनी तर आंतरवली सराटी उपोषण स्थळी भेट दिली होती पण गेल्या महिन्यातील घटना व मनोज जरांगे यांच्या वक्तव्यचा मागोवा घेतल्यास ही लढाई आरक्षणाची आहे की महाराष्ट्र अशांत करून एखाद्या विशिष्ट राजकीय पक्षाला मतदान घडवून आणण्याची लढाई आहे ? अशी शंका सुध्दा येत आहे.

मनोज जरांगे यांची नजिकच्या काळातील वक्तव्य लक्षात घेतली तर केवळ भाजपा नेत्या वर असंस्कृत भाषेचा प्रयोग करून तोंडसुख घेत आहेत. मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी कोण आहेत ? व मराठा समाजाचे वाटोळे कोणी केले आहे सर्वांना माहित आहे. व जगजाहीर सुद्धा आहे. ओ.बी.सी.कोट्या मधुन मराठ्यांना आरक्षण देणे मला योग्य वाटत नाही, असे म्हणणाऱ्या शरद पवार पासून म.वि.आ.नेते ओबीसी आरक्षणास हात लावू नका असा सरकारला दम देत आहेत. म्हणजे ते अप्रत्यक्षरीत्या मराठा समाजाला ओबीसी मधुन आरक्षण देऊ नका अशी जाहीर भाषा करीत आहेत. परंतु मनोज जारांगे “खुटा ठोकतो-खूटा उपटतो,  ” गलिच्छ भाषा केवळ छगन भुजबळ पासून प्रसाद लाड यांच्या साठी करतात पण तीच भाषा शरद पवार पासून म.वि.आ.नेत्यांच्या विषयी का करीत नाहीत ? अशी दुटप्पी भूमिका का घेतली जात आहे ? याची चर्चा महाराष्ट्रातील सामान्य माणूस दबक्या आवाजात करीत आहे.

मनोज जरांगे यांच्या आरक्षण आंदोलनाचा मागोवा घेतल्यास ते आपल्या सभा मधुन मुस्लिम समाजाला ओ.बी.सी मधुन आरक्षण देण्याची भाषा करीत आहेत. वास्तविक आपल्या देशात धर्माच्या नावावर आरक्षण देता येत नाही ही वस्तुस्थिती आहे. परंतु ते मुस्लिम समाजाला आकर्षित करण्याच काम करीत आहेत. तसेच त्यांच्या परभणी पासून नांदेडच्या अनेक दौऱ्यात मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्याचे दिसून आले आहे. नांदेड येथील रॅली मध्ये मुस्लिम तरुण जरांगे यांचे पोस्टर घेऊन नाचत होते. सर्व प्रकार पाहता आगामी विधानसभाच्या निवडणुकीवर डोळा ठेऊन राजकीय फायदासाठी मराठा-मुस्लिम अनैसर्गिक मोट बांधण्याचा प्रयत्न करीत असल्याचे संकेत दिसत आहे. वास्तवमध्ये हिंदू समाजात ओबीसी विरुद्ध मराठा अशी दरी निर्माण करून फूट पाडण्यासाठी व हिंदू समाजात कायम संघर्ष रहावा म्हणून मुस्लिम जरांगे यांच्या पाठीशी उभे राहत आहेत. त्यामुळे शिवपुत्र संभाजी राजे यांची चाळीस दिवस छळ निर्घृण हत्या करणाऱ्या औरंगजेबाच्या नावाने असलेल्या औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर नामकरण करण्यात आले तेव्हां नामकरणाच्या विरोधात न्यायालयात जाऊन आंदोलन करणाऱ्या तसेच औरंगजेबा सोबत नात जोडणाऱ्या सोबत मैत्री करणे किंवा त्यांच्या आरक्षणाची धुरा आपल्या खांद्यावर घेण्याची काय आवश्यकता आहे ? म्हणजे मराठा आरक्षण मुद्द्याच्या निमित्ताने हिंदू समाजात जाती पातीचे विष कालवून फूट पाडणे,ओबीसी नेत्यांना शिव्या देणे व मुस्लिमांना मिठ्या मारण्याचा प्रकार कितपत योग्य आहे ?

महाराष्ट्रात सतत लव्ह जिहाद मध्ये हिंदू मुलींची फसवणूक करून त्यांची निर्घृण हत्या केल्या जात आहेत व दंगली सुद्धा घडत आहेत. या वर्षी नांदुरा, धुळे,जळगांव सह अनक ठिकाणी श्री शिवजयंती उत्सवाच्या मिरवणुकावर दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे मराठा आरक्षण आंदोलनामध्ये मुस्लिमांचा प्रवेश म्हणजे बेगडी प्रेम व चिंतनीय बाब आहे कारण महाराष्ट्रातील मराठा समाज कोणतेही आंदोलन करण्यासाठी सक्षम असताना कोणाच्या तरी राजकीय फायदा साठी आपली तुतारी वाजवून मराठा-मुस्लिम अनैसर्गिक मोठ बांधण्याचा जो निंदनीय प्रकार होत आहे. तो प्रकार बंद झाला पाहिजे तसेच हे हिणकस प्रयोग कारस्थान कोण रचत आहे कोणत्या अदृश्य शक्ति त्याच्या मागे उभ्या आहेत याचा तपास सुद्धा व्हावा. शेवटी मराठा आरक्षण आंदोलन निमित्ताने राज्यात मराठा-मुस्लिम मोट ची बांधणी करतांना ओबीसी यांना शिव्या व मुस्लिमांना मिठ्या कितपत योग्य आहे. याचा विचार करण्याची आवश्यकता आहे.

–  अशोक राणे, अकोला.

स्तंभ लेखक, माजी सदस्य-महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, महाराष्ट्र शासन.

Leave A Reply

Your email address will not be published.