शेतकऱ्यासाठी मैदानात, घोंगडी बैठका घेणारे जरांगे पुजा पवार साठी मैदानात केव्हा उतरणार ?
शेतकऱ्यासाठी मैदानात, घोंगडी बैठका घेणारे जरांगे पुजा पवार साठी मैदानात केव्हा उतरणार ?
महाराष्ट्रात आहिल्यानगर मधील कोपर्डी येथे दि १३ जुलै २०१६ रोजी अल्पवयीन मराठा मुलीवर अत्याचार करणारी पाशवी आणि अमानविय घटना आठ वर्षा पूर्वी घडली होती. त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटून संतापाची लाट सुद्धा उसळली होती. पीडितेला न्याय मिळावा म्हणून राज्यात मराठा मुक मोर्चे निघाले होते. त्यामधील पहिला मराठा मुक मोर्चा छत्रपती संभाजीनगर येथे निघाला होता. प्रचंड जनसमुदाय आणि शिस्तबध्द असलेल्या मराठा मुक मोर्चा तथा प्रचंड जनसमुदाय रेट्या मुळे कोपर्डी चा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालून कोर्टाने आरोपींना दि २९ नोव्हेंबर २०१७ रोजी दोषी ठरविले कठोर शिक्षा सुद्धा झाली. आता मराठा मोर्चाचं उगमस्थान असलेल्या संभाजीनगर जिल्ह्यातील हर्सूल पोलीस ठाण्या अंतर्गत ओव्हार गांवातील पूजा पवार अल्पवयीन विद्यार्थिनेला लव्ह जिहाद षडयंत्राच्या जाचाला कंटाळून आपला जीव गमवावा लागला आहे. पूजा पवार सोळा वर्षीय विद्यार्थिनीने कासिम पठाण याच्या सतत धमक्या आणि त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. पोलीस कारवाई झाल्या नंतर आरोपीचे नातेवाईक पूजा पवार यांच्या कुटुंबाला “आज जेल , कल बेल, फिर से वही खेल” अशा धमक्या देऊन त्रास सुद्धा देत आहेत. महाराष्ट्रातील एका मराठी वृत्त वाहिनीने सदर बातमी दि २२ सप्टेंबर रोजी दाखविली सुद्धा आहे. त्यामुळे मराठा मोर्चाच उगमस्थान असलेल्या संभाजीनगर मध्ये मृतक पूजा पवार विद्यार्थीनेस न्याय मिळण्यासाठी मराठा आंदोलन कडून अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. किवा पूजा पवार यांच्या परिवाराला न्याय मिळण्यासाठी समाज गप्प का आहे ? अशी चर्चा सुध्दा होत आहे. या पूर्वी उरण मध्ये यशश्री शिंदे तरुणीची शेख दाऊद नराधमाने देह छिन्नविच्छिन्न करून हत्या केली आहे. महाराष्ट्रातील गेल्या काही वर्षांचा मागोवा घेतल्यास अनेक हिंदू तरुणींना लव्ह जिहाद च्या षडयंत्रा मध्ये आपला जीव गमवावा लागला असून आजही लव्ह जिहादी लांडगे हिंदू तरुणींना फसवून त्यांच्या शरीराचे लचके तोडत आहात. कधी सुटकेस मध्ये तर कधी फ्रिज मध्ये हिंदू तरुणींचे मृतदेह मिळाले आहेत. लव्ह जिहाद विषया कडे केवळ जातीपातीच्या किंवा मतांच्या चष्म्यातून न पाहता हिंदू तरुणी वरील संकट म्हणून पाहणे आवश्यक आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून मराठा- मुस्लिम मतांची मोट बांधून शेतकऱ्यासाठी मैदानात उतरण्याची भाषा करणारे मनोज जरांगे पुजा पवार व यशश्री शिंदे यांच्या न्याय साठी मैदानात केव्हा उतरणार आहेत ? तसेच मनोज जरांगे खा.संभाजी राजे पासून पृथ्वीराज चव्हाण अशा अनेक नेत्यांना भेटत आहेत ,त्यांना वेळ देत आहेत किंवा घोंगडी बैठका घेणार आहेत. परंतू पूजा पवार यांच्या कुटुंबाची त्यांनी भेट का घेतली नाही ? किंवा पूजा पवार यांच्या विषयी शब्द सुध्दा काढला नाही असा प्रश्न सुद्धा सामान्य माणसा मध्ये मोठ्या प्रमाणात चर्चिला जात आहे. नवी मुंबई मधील उरण येथे मागील महिन्यात यशश्री शिंदे तरुणींची दाऊद शेख नराधमाने निर्घृण हत्या घडवून आणली आहे. तिच्या देहाची प्रचंड विटंबना सुध्दा केली आहे. आणि आता संभाजीनगर जिल्हा मध्ये पूजा पवार तरूणीस कासिम पठाण मुस्लिम तरुणाने आत्महत्या करण्यास प्रवृत्त्त केल्याची संतापजनक घटना घडली आहे. तसेच आरोपी पूजा पवार तरुणीला जीवंतपणी धमकावत होता तर आता त्याचे नातेवाईक मृत पूजा पवार यांच्या कुटुंबाला धमक्या देऊन त्रास देत आहेत. त्यामुळे सामाजिक बांधिलकी म्हणून पूजा पवार यांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहण्याची ,त्यांना धीर देण्याची नितांत आवश्यकता आहे अन्यथा कासिम पठाणचे नातेवाईक पवार कुटुंबाला धमक्या व त्रास देत राहतील आणि हिंदू तरुणी लव्ह जिहादच्या षडयंत्रा मध्ये अडकून उपरोक्त प्रमाणे घटना घडत राहतील महाराष्ट्रात उपरोक्त दोन भयानक घटना ताज्या असतांनाच बदलापुरच्या शाळेतील लैंगिक अत्याचाराची घटना पुढे करण्यात आली सदर घटना सुध्दा दुदैवीच आहे. राज्यातील तिन्ही घटना अमानुष व पाशवी आहेत.
राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीने दि.२४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंद ची तयारी केली होती.न्यायालयीन हस्तक्षेपा मुळे महाराष्ट्र बंद एवजी निषेध कार्यक्रम केले आहेत परंतु विरोधी पक्ष महाविकस आघाडीच्या एजेंडयावर उरण आणि संभाजीनगर मधील घटनाचां साधा उल्लेख नाही तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या तोंडातून सुध्दा दोन्ही घटनावर शब्द निघाला नाही. वास्तविक पाहता उरण व संभाजीनगर मधील लव्ह जिहादच्या षडयंत्रकारी घटना असून त्या एका विशिष्ट षडयंत्रा मधुनच झालेल्या आहेत त्याचा सुद्धा निषेध होणे आवश्यक आहे. महाविकास आघाडीला हिंदू समाजाच्या मतांची आवश्यकता नसल्याचे किंवा हिंदू मतांची किंमत शून्य असल्याचे लक्षात येत आहे. महाराष्ट्रात घडलेल्या तिन्ही घटना पाशवी व अमानवीय असून राजकारणाचा विषय नाही. तसेच बदलापूर घटना अमानवी आहे पोलीस यंत्रणानी तक्रार नोंदविण्यास टाळाटाळ केली हे सत्य आणि आरोपींना फास्ट ट्रॅक कोर्ट द्वारा शिक्षा व्हावी हे सुद्धा बरोबर आहे, पण उरण मधील यशश्री शिंदे व संभाजीनगर मधील पूजा पवार यांच्या आरोपींना सुद्धा फास्ट ट्रॅक कोर्ट द्वारा शिक्षा व्हावी असे का वाटत नाही ? मनोज जरांगे यांच्या नेतृत्व उदया पूर्वी कोपर्डी घटना मधील पीडितेला न्याय मिळावा म्हणून महाराष्ट्र रस्त्यावर उतरला होता. लाखोंच्या संख्येने मराठा मुक मोर्चे सुद्धा निघाले होते मग आता मराठा आंदोलन मुळे मोठे झालेले मनोज जरांगे पूजा पवारच्या न्याय साठी काही पावले उचलतील का? किंवा पूजा पवार व यशश्री शिंदे यांना न्याय मिळण्यासाठी रस्त्यावर का उतरत नाहीत ? मराठा तरुणीचं वाटोळं होतं असताना मनोज जरांगे बघ्याची भुमिका का घेत आहेत ? असे अनेक प्रश्न समाजात चर्चिले जात आहेत. त्यामुळे पूजा पवार यांच्या न्याया साठी मनोज जरांगे मैदानात येतील की घोंगडी बैठका घेऊन आगामी विधानसभा निवडणूक साठी मराठा- मुस्लिम अनैसर्गिक मोट बांधण्यात मशगुल राहतील ? अशी चर्चा महाराष्ट्रात होत आहे.
– अशोक राणे , अकोला.