जीवनात आनंदी कसं राहायचं ? हे शिकवणारं विद्यापीठ कुठे आहे ?
जीवनात आनंदी कसं राहायचं? हे शिकवणारं विद्यापीठ कुठे आहे ?
अगदी बालवाडी पासून भरगोस पुस्तकांच्या माऱ्यात मुलांना घडवलं जातं, मी शिक्षण व्यवस्थेच्या विरोधात नाही. व्यक्ती निर्माणाकरिता शिक्षण हे आवश्यक आहेचं. पण मुलांना शिक्षण देतांना मुलांनी आनंदी कसं राहायचं? याचं शिक्षण कुठलं विद्यापीठ देतं?
अगदी बालपणीपासून पैसा जीवनात किती महत्वाचा हे समोर ठेऊन शिक्षण दिल्या गेलं, मात्र मनापासून आनंद कसा मिळेल? कशात मिळेल हे शिकवायचं मात्र कुठे तरी आपण विसरून गेलो.थिटा, बीटाच्या नादात हुशार आणि बुद्धू चे दोन गट तयार झाले आणि थिटा आणि बीटा म्हणजे पोरं आयुष्य समजायला लागले. गणितात अव्व्ल येणारे एकीकडे आणि जे अभ्यासात कमी आहेत किंवा गणितात कमी आहेत ते आयुष्याच्या गणितात चुकले असा काहीसा पोरांच्या मनात भ्रम तयार होत गेला. मात्र आनंद कसा साजरा करायचा? जीवन कसं जगायचं याची शिकवण देणी मात्र आपण विसरून गेलो.
आपण शिक्षण देण्याच्या उद्देशाने आलो होतो, आणि मात्र वर्गात स्पर्धा देऊन मोकळे झालो. अभ्यासात हुशार असणारा अभ्यासात कमी हुशार असणाऱ्या कडे खालच्या नजरेने पाहायला लागला आणि येथेचं मुलांच्या जीवनाचा समतोल बिघडला.
भविष्यात अभ्यास कराल तर मोठे व्हाल हे वाक्य खरं आहे, पण मोठे झाल्यावर आनंदी कसे राहाल? पैसा भरपूर कमवून पण आज लोकं आनंदी नाहीत आणि कमी पैस्यात पण काही कुटुंब आनंदी आहेत मग खरचं पैसा आनंद देतो का? मग खरा आनंद कोणता हे मात्र आपण शिकवायचं विसरून गेलो.
आपण कोणाला तरी दाखवायला आनंदी राहतोय की आपण स्वतःसाठी आनंदी राहतोय हे तपासून घेणं अत्यंत महत्वाचे आहे.
जर शाळेत, कॉलेज मध्ये मेरिट येणारा सगळ्यात हुशार असेल आणि तो ती शाळेची आणि कॉलेज ची शर्यत जिंकला असेल तर मग तोचं विद्यार्थी पुढे जाऊन डिप्रेशन चा शिकार का होतो? जीवनात पुढे जाऊन कन्फ्यूज का होतो? कारण आपण शिक्षण देतांना आनंदी कसं राहायचं याचं शिक्षण देणं विसरून गेलो.आपण मेरिट मुलांचे फोटो शाळेच्या बॅनर वर लावून कोणाला तरी नेहेमी छोटं दाखवत गेलो.
आयुष्यात आनंदी असणं महत्वाचे आहे की यशस्वी असणे महत्वाचे आहे? याचं उत्तर जेव्हा स्वतः चं स्वतःला मिळेल तेव्हा यावर तोडगा निघेल. आज जेव्हा मुलं मुली शाळा, कॉलेज सोडून निघतात, मोठ्या मल्टिनॅशनल कंपनी मध्ये कामाला लागतात भरपूर पैसा कमवतात. पण स्वतः सांगतात की आम्ही आनंदी नाही नुसता स्ट्रेस आहे, कामाच्या नादात आयुष्य जगायचं विसरून गेलो. तेव्हा मात्र प्रश्न पडतो की आयुष्य जगण्यासाठी आनंदी राहण्यासाठी आपल्याला शिक्षण दिल्या गेलं की नुसतं स्पर्धेत उतरण्या करिता?
जेव्हा आतला आवाज आपला आनंद कश्यात आहे हे सांगेल तो आनंद. त्यासाठी आपल्या अंतरील मनापासून येईल की तू यासाठी तयार झाला आहेस तो कॉल ओळखता ज्याला आला तो आनंदी आणि यशस्वी दोन्हीही होतो. सगळ्यांना एकाचं दोरीत बांधता येत नाही. प्रत्येक जण वेगवेगळ्या कारणासाठी जन्म घेतो.
पण याचा खरा अर्थ सांगणारं विद्यापीठ कोणतं? हे आजपर्यंत मला कुठे शिक्षणाच्या बाजारात दिसलं नाही. पण याची काळाला गरज आहे. नाही तर पिढ्या च्या पिढ्या उद्धव्हस्त व्हायला वेळ लागणार नाही.
अभिषेक म पत्की.
अध्यात्म आणि जीवन शिक्षा यांचा समावेश शैक्षणिक पाठ्यक्रमामध्ये असावा व त्याला इतर विषयांवर स्थान असावे .
खेळ कलाइत्यादी क्षेत्रांनाडॉक्टर इंजिनियर या क्षेत्रात समानच महत्त्व देणारी संस्कृती निर्माण होणे आवश्यक आहे .
बोध साहित्य लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच नियमित वाचनासाठी उपलब्ध असणे आवश्यक आहे .
सध्या या स्थितीमध्ये आचार्य प्रशांत हे उत्तम कार्य करत आहेत . ते जीवनावश्यक मुद्द्यांवर तसेच भगवद्गीता , उपनिषद् , बौद्ध दर्शन व संतांची शिकवण यांच्यावर शिकवण देत आहेत व या शिकवणी यूट्यूब चैनल व आचार्य प्रशांत ॲप च्या माध्यमाने सर्वांप्रती उपलब्ध आहेत .सध्या स्थितीमध्ये ही सर्व शिक्षा संसाधनांच्या कमीमुळे ऑनलाईन , टेलिव्हिजन या माध्यमातून प्रसारित केल्या जात आहेत .
नक्कीच तो दिवस दूर नाही जेव्हा या शिक्षा शाळेत कॉलेजमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना मिळतील .
या स्थितीवर मी शाळेमध्ये असताना दिलेल्या काही ओळी आठवतात .
” खुद को कॉल करके देखा busy tone सुनाई देती है कभी खुद को कॉल करके देखा busy tone सुनाई देती है ।
दुनिया से मिलने में लोग व्यस्त है लेकिन खुद से मिलने की सभी लाईन व्यस्त है ।”