राष्ट्रसंत तुकडोजी महाराज.

0 736

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज.

तुकडोजी महाराजांच्या विचारात जी स्पष्टता आहे ती अभूतपूर्व आहे. महाराज पुरोगामी होते पण स्वतःचा सर्वधर्म समभाव शाबूत करण्यासाठी त्यांनी अकारण हिंदुना शिव्या घातल्या नाहीत. गोरक्षनाचे पुरस्कर्ते, बाल ब्रम्हचारी, गुरुशिष्य परंपरेतील तुकडोजी महाराज आहेत. मंदिरांचे समाजातील स्थान याबद्दल अमाप लेखण त्यांनी करून ठेवले आहे.

सुखी-समृद्ध करावे गावा | या साठी मंदिर-निधी योजावा |
ही सेवाचि आवडे देवा | आपुलिया जीवांची||

ग्रामगीते मुळे महाराज सर्वश्रुत आहेत आणि ग्रामगीता वाचताना तुम्हांला शब्दांचे अर्थ शोधण्याची गरज पडत नाही. त्यामुळे अगदी सामान्य व्यक्तीही ती सहजतेनं मनावर कोरून घेतो. पण या मुळे खूप लोकांचे धंदे बंद पडायला लागले आहेत. कारण जो महाराजांच्या मार्गाने चालतो त्याला मुर्खात काढणे सोपे नाही. त्याच्या पुढे समाजविघातक विचार रेटू शकत नाही, धर्माला आणि ओल्या देवांना सरसकट अपमानित करता येत नाही….

तुकडोजी महाराज हे विश्व हिंदू परिषद चे संस्थापक सदस्य होते. तुकडोजी महाराजांची वर्ण व्यवस्थेच्या विषयीची भूमिका स्पष्ट होती.

ते धर्मांतराच्या विरोधात होते. सेवेच्या नावाखाली ख्रिस्ती लोकं धर्मांतर करायचे हे त्यांना पटायचे नाही. महाराजांना मंदिरांच्या जिर्णोद्धारा बद्दल आपुलकी असायची, ते गाईच्या महत्वा बद्दल बोलायचे. ग्रामगीतेत अध्याय 25 हा पुर्णतः’ देव-देवळे’ या विषयावर आहे. 26 वा अध्याय मुर्ती उपासनेवर.

हे हलक्या विचारांचे लोकं महाराजांवर पातळी सोडून टिका करतात आणि आपले लोकं यांना स्पष्टीकरण देत सुटतात.

जमाते पुरोगामी आणि महाराजांच्या नावाने पैसा घेऊन प्रबोधनाचे किर्तन करणारे पण तेवढेच दोषी आहेत. यांनी कधीही तुकडोजी महाराजांचे विचार सरसकट मांडले नाहीत सतत एकच बाजू मांडून यांनी महाराजांच्या विचारांचा प्रभाव कमी करायचं काम केलं आहे.

तुकडोजी महाराजांच्या ‘लहर की बरखा’ या ग्रंथातील एक ओवी आहे.

करा काही संघटना, हिंदुधर्मासाठी नाना।
नुरलासे कुणी शुर, वाहे हिंदुधर्म भार।
पर धर्माचे पारधी, पाहे शिकरीची संधी।
“तुकड्यादास” म्हणे यारे, देवापाशी शरण जारे।

:-तुकडोजी महाराज

महाराजांचे हे विचार जाणून- बुजून कुणी समाजात सांगत नाहीत कारण हे सांगितल्यावर कुणी कार्यक्रमाला बोलवणार नाही. नो कार्यक्रम – नो पैसा. म्हणून फक्त एक अर्धवट ओवी घ्यायची आणि तीच एक तास बडवून बडवत बसायचे…

महाराजांचे अजून खूप विचार आहेत जे यांना पचनी पडणार नाहीत यथावकाश ते समोर येतीलच त्यावेळी किती तरी ढोंगी लोकं दुर जातील..

Leave A Reply

Your email address will not be published.