मुघल अर्थात इस्लामची तलवार हिंदूं चालवीत होते ?

0

मुघल अर्थात इस्लामची तलवार हिंदूं चालवीत होते ?

आपल्या देशात हिंदुस्तानच्या खैबर खिंडीतून परकीय मुघल अर्थात इस्लामी आक्रमकांच्या टोळ्यांचा प्रवेश झाला आणि हिंदू समाजातील जयचंद प्रवृत्तीचा फायदा घेऊन त्यांनी हिंदुस्तान मध्ये आपले पाय रोवून हिंदुस्तानला व येथील हिंदू समाजाला गुलाम केले. तसेच त्यांनी हिंदू समाजाला प्रिय असणाऱ्या प्रत्येक श्रद्धास्थानावर प्रहार करून हिंदूचे तलवारीच्या जोरावर धर्मांतर करून इस्लामचा प्रसार केला. हिंदूंना प्रिय असणाऱ्या मंदिरांचा विध्वंस केला, स्त्रिया भ्रष्ट केल्या, गायीची कत्तल करून हिंदू समाजावर आघात केला होता. जयचंदाच्या साहाय्याने हिंदू सम्राट पृथ्वराज यांचे हिंदू तख्त फोडले, मानसिंगाच्या साहाय्याने महापराक्रमी महाराणा प्रताप यांचा पराभव केला. औरंगजेबास मिर्झा राजे जयसिंह यांचे सहाय्य तथा गणोजी शिर्केच्या साहाय्याने संभाजी राजे यांना कैद करून त्यांची हत्या केली गेली. सोबतच देशामधील एकमेव हिंदवी स्वराज्य अर्थात हिंदू साम्राज्य बुडविण्याचा प्रयत्न सुद्धा केला. फितुरी, चापलुसी आणि स्व:स्वार्थासाठी दगाबाजी अशा शेकडो घटना हिंदुस्तानच्या इतिहासात घडल्या आहेत. ज्यामध्ये हिंदू बलाढ्य व शक्ती संपन्न असतांना सुद्धा इस्लामची तलवार हिंदू चालवीत होते. देशातील इतिहासाचा मागोवा घेतल्यास किंवा मोठ मोठ्या इतिहासकारांच्या निष्कर्षचे निरीक्षण केल्यास असे लक्षात येते की, इस्लामच्या विजयासाठी व हिंदूंच्या पराभावासाठी इस्लामची तलवार हिंदूच चालवीत होता. त्यामुळेच हिंदुस्तान जवळपास सातशे वर्ष इस्लामचा गुलाम होता. आज काळ बदलला असला तरी परिस्थिती तीच असल्याचे लक्षात येते, आपल्या देशात लोकशाही आहे आणि मतपेटी मधुन देशाचा राजा निश्चित होतो. देशातील राजकीय वातावरण व नरेंद्र मोदी यांच्यावर होत असलेली टीकेचा रोष निरीक्षण केल्यास परिस्थिती तीच असल्याचे लक्षात येते. नरेंद्र मोदी राष्ट्राच्या प्रगती व हिंदूंच्या उज्वल भवितव्यासाठी संघर्ष करीत आहेत, लढत आहेत. जगात आपल्या देशाचा मान सुद्धा वाढवीत आहेत. परंतु आपलेच भाऊ बंधू नरेंद्र मोदी यांच्यावर मुस्लिम विरोधी धोरणे आखणाऱ्या पासून चौकीदार चोर,मौत का सौदागर,अदानी- अंबानीचा साथी अशा आरोपाच्या वल्गना करीत आहेत. तसेच नरेंद्र मोदी देशात हिंदू -मुस्लिम विषय करून सामाजिक दरी निर्माण करीत असल्याचा कांगावा सुद्धा करीत आहेत. पण देशात हिंदू- मुस्लिम हा विषय कोणी आणला आहे. गेल्या सात शतकाचा राजकीय मागोवा घेतल्यास फतवे कोणी काढले, याचा विचार करायला पाहिजे. काल परवा देवबंद चे मौलाना अशरद मदनी यांनी नरेंद्र मोदी सरकारच्या यू.सी.सी पासून अनेक मुद्द्याचा विरोध करुन सेक्युलर पक्षांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. अर्थात भाजपाला मतदान करू नये असा त्याचा अर्थ आहे परंतु अरशद मदनी यांच्या वक्तव्याचा कोणी विचारच केला नाही. त्यामुळे देशाच्या साधन सामुग्री वर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे , श्रीरामाच्या अस्तित्वर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याच्या वक्तव्या पासून “अफजल हम शरमिंदा है,तेरे कातील जिंदा है, भारत तेरे तुकडे होंगे इंशाआल्ला अशा घोषणा करणारे तसेच दिल्ली मध्ये साधुसंत व अयोध्येत करसेवकावर गोलीबार करणारे कोण होते आणि ते आज कोणत्या राजकीय विरोधी पक्षाच्या आघाडीत आहेत. तसेच विरोधी पक्ष इंडीअ आघाडीचे शिर्षस्थ नेतृत्व कोण आहेत व त्यांनी आपल्या घोषणा पत्रात मोदी सरकारचे निर्णय रद्द करून मुस्लिम अनुनयाच्या ज्या घोषणा केल्या आहेत. त्याचा विचार केल्यास इस्लामची तलवार हिंदूच चालवीत असल्याचे लक्षात येते. पण गेल्या दोन शतकात हिंदुत्वाचे जागरण होऊन हिंदू मतांचे ध्रुवीकरण झाले आहे त्याचा परिणाम राजकीय पटलावर उमटला असून हिंदूत्व विरोधी धोरणे असलेल्या पक्षाची सरकारे काळाच्या पडद्याआड गेली आहेत व पुन्हा केव्हा सत्तेवर येतील याची शक्यता नाही हिंदूत्ववादी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या नेतृत्वामुळे देश अल्पसंख्यक अनुनया पासुन मुक्त होत असल्याने इस्लामची तलवार आता हिंदू चालविण्यास तयार नाहीत असे स्पष्ट दिसून येत आहे. आणि भविष्यात राष्ट्रहितासाठी इस्लामची तलवार हिंदू चालविणे बंद करतील तो दिवस राष्टासाठी व राष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठी सुदिन ठरेल असे म्हटल्यास योग्य ठरेल.

अशोक राणे , अकोला – भ्रम.९४२३६५८३८५

फोटो गुगुल साभार …

स्तंभ लेखक, माजी सदस्य-महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, महाराष्ट्र शासन.

Leave A Reply

Your email address will not be published.