महाकुंभ आणि आखडे

0

धार्मिक कार्यांना चालना देण्याबरोबरच हिंदू धर्म आणि त्याच्या अनुयायांचे रक्षण करणे हा या आखाड्यांचा उद्देश होता. कालांतराने आज या आखाड्यांची संख्या १३ वर पोहोचली आहे. १३ आखाड्यांपैकी ७ मुख्य आखाड्यांची स्थापना आद्य शंकराचार्यांनी केली असं मानतात. हे सात आखाडे म्हणजे महानिर्वाणी, निरंजनी, जुना, अटल, अवाहन, अग्नी आणि आनंद आखाडा. या सर्व आखाड्यांना ४ श्रेणीत विभाजित करण्यात आलं आहे.

 

 

 

किती आखाडे आहेत?

वर सांगितल्याप्रमाणे १३ आखाड्यांमध्ये ७ शैव, ३ वैष्णव आणि ३ उदासीन (सिक्ख) अखाडे अशी रचना आहे.

७ शैव आखाड्यांमध्ये :

१. जूना आखाडा
२. निरंजनी आखाडा
३. महानिर्वाणी आखाडा
४. आवाहन आखाडा
५. अटल आखाडा
६. आनंद आखाडा
७. पंचाग्नि आखाडा

आदि शंकराचार्यांनी शैव संप्रदायातील संयुक्त संन्यासी लोकांचे १० गटात वर्गीकरण केले. १. गिरी २. पुरी ३. भारती ४. तीर्थ ५. बंदी ६. अरण्य ७. पर्वत ८. आश्रम ९. सागर १०. सरस्वती
यातील जुना आखाड्यामध्ये किन्नर आखाड्याचा समावेश होतो.

तर ३ वैष्णव आखाड्यांमध्ये

१) दिगंबर आखाडा
२) निर्वाणी आखाडा
३) निर्मोही आखाडा
यांचा समावेश आहे.

३ उदासीन (सिक्ख) आखाड्यांमध्ये

१) निर्मोही आखाडा
२) मोठा उदासीन आखाडा
३) नवीन उदासीन आखाडा
यांचा समावेश आहे.

यातील प्रत्येक आखाड्याची आपली स्वतःची वेगळी व्यवस्था असते. आदि शंकराचार्य यांनी यातील १० (७ शैव आणि ३ उदासीन) आखाड्यांची व्यवस्था चार शंकराचार्य पीठांच्या अधीन करून ठेवली आहे. तर या आखाड्यांची सूत्रे शंकराचार्यांजवळ असतात.

नितीन राजवैद्य, मुख्य संपादक लोकसंवाद डॉट कॉम

Leave A Reply

Your email address will not be published.