आढावा विधानसभेचा – मराठवाडा विभाग

विधानसभा निवडणूक १९

0
  • मराठवाडा विभाग-

मराठवाड विभागात एकूण ०८ जिल्हे तर एकूण मतदारसंघ ४६ आहेत.

त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात ०९, नांदेड जिल्हा ०९, हिंगोली जिल्हा ०९, परभणी जिल्हा ०४, जालना जिल्हा ०५, बीड जिल्हा ०६, लातूर जिल्हा ०६, उस्मानाबाद जील्यात्तील ०४ अशा एकूण ४६ मतदारसंघाचा  समावेश आहे.

मराठवाड्यात महायुती,आघाडी, मनसे, वंचित आघाडी अशा विविध राजकीय पक्षांनी आपले उमेदवार रणांगणात उतरवले आहेत.

  • बीड मतदार संघात  राष्ट्रवादी कोंग्रेस मधून शिवसेनत प्रवेश केलेले माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर रिंगणात आहेत. तर त्यांचेच पुतणे संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादी कोंग्रेस कडून विरोधात रणांगणात उभे ठाकले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला ही लढत फारच चुरशीची ठरणार आहे. दोघांमध्ये  बाजी  मारणार तरी कोण अशी उत्सुकता लागली आहे.
  • निलंगा मतदार संघात महायुतीचे विद्यमान मंत्री संभाजी पाटील निलंगेकर मैदानात असून त्यांचे विरोधात कोंग्रेस चे अशोक शिवाजीराव पाटील निलंगेकर हे मैदानात आहेत. मतदार निलंगेकर घराण्यातील कोणाच्या बाजूने उभे राहतात  हे पाहणे उत्सुकतेचे राहील.
  • लातूरला कोंग्रेस चे अमित देशमुख रिंगणात असून त्यांचे विरोधात भाजपचे शैलेश लाहोटी हे  मैदानात आहेत. व माजी मंत्री अमित देशमुख  हे माजी मुख्यमंत्री कोंग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे चिरंजीव आहेत. हा त्यांचा पारंपरिक मतदारसंघ असून अमित मतदारांना किती आपलस करतात व आपला पारंपरिक मतदार संघ राखण्यात कितपत यशस्वी होतता कि शैलेश लाहोटी विजय संपादन करतात हे लवकरच कळेल.
  • परळी विधानसभे मध्ये भाजपचे विद्यमान मंत्री पंकजा मुंडे विरुद्ध राष्ट्रवादी कोंग्रेस चे नेते विद्यमान विधान परिषद चे विरोधी पक्ष नेता धनंजय मुंडे अशी स्पष्ट लढत आहे. दोघेही मुंडे घराण्यातील पावरफुल व्यक्तिमत्व मैदानात असून ही लढत संपूर्ण महाराष्ट्रचे लक्ष वेधणारी राहील. वंचित बहुजन आघाडीचे धिरज सातपुते सुद्धा रिंगणात असून मतदार नेमके कोणाला कौल देतात हे येणारा काळच सांगेल.
  • भोकरदन मतदार संघातून केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचे चिरंजीव विद्यमान आमदार संतोष दानवे हे मैदानात असून त्यांचे विरोधात आघाडीने चंद्रकांत दानवे यांना मैदानात उतरवले आहे. दानवे कुटुंबाची ही लढत कोणासाठी विजयाची ठरेल हे पहिले जाईल.
  • केज मतदार संघातून भाजपाच्या विद्यमान आमदार संगीता ठोंबरे यांची उमेदवारी कापत राष्ट्रवादीच्या घोषित उमेदवार नमिता मुंदडा यांना वेळेवर भाजपात घेत भाजपाकडून उमेदवारी देऊन विरोधकांना चेकमेट केल्याचे पाहायला मिळाले. विरोधात आघाडी कडून पृथ्वीराज साठे हे रिंगणात आहेत.  राष्ट्रवादीला हि लढत प्रतीष्टेची झाली आहे. नेमकी बाजी कोण मारणार हे वेळच सांगेल.

पुढील लेखात पाहूया पश्चिम महाराष्ट्र विभागाचा आढावा. लोकसंवाद.कॉम सोबत कनेक्ट रहा. 

 

मुख्य संपादक- लोकसंवाद.कॉम

नितिन राजवैद्य.

नितीन राजवैद्य, मुख्य संपादक लोकसंवाद डॉट कॉम

Leave A Reply

Your email address will not be published.