आढावा विधानसभेचा – पश्चिम महाराष्ट्र विभाग

विधानसभा आढावा १९

0
  • पश्चिम महाराष्ट्र विभाग –

पश्चिम महाराष्ट्र विभागात एकूण ०५ जिल्ह्यातील ५८ मतदारसंघाचा समावेश येतो.

त्यामध्ये पुणे जिल्ह्यात २१, सांगली जिल्ह्यात ०८, सातारा जिल्हा ०८, कोल्हापूर जिल्हा १० आणि सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे.

पश्चिम महाराष्ट्र विभागात महायुतीने, आघाडीने, मनसे व इतर विविध राजकीय पक्षाने आपले उमेदवार निवडणुकीच्या लढाईत उतरवले आहेत.

  • पुणे जिल्ह्यातील कोथरूडच्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी चे तिकीट कापत भाजप ने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. याठिकाणी मेधा कुलकर्णी चे तिकीट कापल्यामुळे स्थानिक कार्यकर्ते व मतदारांमध्ये मोठी नाराजी आहे. दादा पाटील यांचे विरोधात मनसे चे किशोर शिंदे हे उभे असून यांना आघाडीने पाठींबा जाहीर केला आहे. या लढतीत आघाडीने उमेदवार न देता स्थानिक मतदार व कार्यकर्त्यांना मनसे कडे वळवण्याचा डाव आखत महायुतीच्या पारंपारिक मतदारांना फोडण्याचा प्रयत्न आघाडीकडून होताना दिसेल. मतदार व स्थानिक कार्यकर्ते  नेमकी काय भूमिका घेतता यावर चंद्रकांत दादा पाटील यांचे भवितव्य अवलंबून आहे.
  • सोलापूर मध्ये कॉंग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि महायुतीचे  शिवसेनेचे माने मैदानात आहेत., एमाएम, शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार सुद्धा मैदानात आहेत. त्यामुळे शिंदे घराण्याची प्रतिष्ठा पणाला लागणार की विजय मिळणे सोपे जाईल हे येणारा काळच ठरवेल.
  • बारामती मतदार संघात आघाडी चे नेते अजितदादा पवार विरुद्ध भाजपचे गोपीचंद पडळकर अशी रंगतदार लढत पाहाला मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांनी या नियवडणुकी करिता पडळकरांना भाजपत घेऊन तिकीट दिले त्यामुळे आपला पारंपरिक मतदार संघ राखण्यात अजितदादाना कसरत करावी लागणार असे दिसते.
  • कराड मध्ये कोंग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण रिंगणात असून त्यांचे विरिधात महायुतीचे अतुल भोसले मैदानात आहेत. पृथ्वीराज चव्हाण आपला गड राखतात की अतुल भोसलेंना जनता स्वीकारते हे लवकरच कळेल.
  • सातारा मतदार संघ हा राष्ट्रवादीचा गड मानल्या जातो. परंतु राष्ट्रवादीला मोठा धक्का  देत माजी खासदार उदयन राजे भोसले व माजी आमदार शिवेंद्रराजे भोसले हे दोघेही भाजपा वासी झाले आहेत. या मतदार संघात भाजपा कडून शिवेंद्रराजे भोसलेंना उमेदवारी देत विरोधी पक्षांना भाजपा ने चांगलेच अडचणीत पकडले आहे. भाजपाच्या विरोधात येथे रा.कोंग्रेस ने दीपक पवार यांना निवडणुकीत उतरवले आहे. शरद पवार स्वत: या मतदार संघात जातीने लक्षदेऊन असल्यामुळे या निवडणुकीत चांगलाच  रंग आलेला पाहायला मिळेल.
  • गुहाघर मतदार संघातून शिवसेनेचे भास्कर जाधव, आघाडीचे सहदेव भेटकर, वंचित चे विकास जाधव हे मैदानात असून या ठिकाणी तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. 
  • कोल्हापूर उत्तर मतदार संघाचे आमदार शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर मैदानात असून आघाडीने मात्र चंद्रकांत जाधव यांना उमेदवारी देऊन चांगलेच आव्हान उभे लेके आहे. भाजपा चे कार्यकर्ते या मतदार संघावर दावा करत होते त्यामुळे ते आता सेनेचे किती काम करतील हा प्रश्नच आहे. शिवसेनेचे आमदार यावेळी हयट्रिक करतील का ? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
  • कोल्हापूर दक्षिण मध्ये वृतुराज पाटील यांना आघाडीने मैदानात उतरवले आहे. महायुतीने अमोल महाडीकांना मैदानात उतरवले आहे. त्याच सोबत वंचित बहुजन आघाडीचे बबनराव कवडे मैदानात आहेत त्यामुळे वंचितचा त्यामुळे मैदान कोण मारेल याची उत्सुकता शिगेला लागली आहे.

पुढील लेखात पाहूया खान्देश-उत्तर महाराष्ट्र विभागातील काही मतदार संघाचा आढावा. लोकसंवाद.कॉम सोबत कनेक्ट रहा. 

मुख्य संपादक- लोकसंवाद.कॉम

नितिन राजवैद्य.

नितीन राजवैद्य, मुख्य संपादक लोकसंवाद डॉट कॉम

Leave A Reply

Your email address will not be published.