दुरितांचे तिमिर जावो

0 1,350

 

दिवाळी म्हटली की सर्विकडे लखलखाट आपल्याला पाहायला मिळतो.

समाजाच्या सर्व स्थरातील लोकांना दिवाळी हि प्रियच.! प्रत्येक परिवार आपापल्या शक्ती प्रमाणे हा दीपोत्सव साजरा करताना आपल्याला दिसतात.

सणांचा राजा दीपावली हा अश्विन वद्य एकादशी पासून सुरु होतो. एकादशी, वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलीप्रतिपदा आणि भाऊबीज असा आठवडाभर मोठ्या आनंदात चालणारा हा उत्सव ,नंतर वर्षभर मनात रेंगाळत राहतो.
शेतकरी, कष्टकरी माणसांच पीक घरात आलेलं असतं या मूळे त्यांची आर्थिक गणितं जुळलेली असतात. सर्विकडे बाजारपेठे मध्ये नेहमीपेक्षा जास्तच लागबगाट असतो, नोकरदार वर्गांचाही दिवाळी बोनस च्या निमित्ताने किसा गरम झालेला असतो. अशा विविध कारणांमुळे सर्विकडे लक्ष्मी च आगमन होतांना दिसतं. घराघरात फराळाची तयारी, घराची साफसफाई, नवनवीन कपडे – वस्तूच्या खरेदीची घाई यामुळे सर्विकडे आनंदी आनंद जाणवतो.

कुणी अंगणात एका पणतीने तर कुणी अख्खेघर दिव्यांच्या झगमगाटात सजवून लक्ष्मी च्या आगमनाचे हर्षोल्लासात स्वागत करतात.

हे सगळ होत असताना मात्र गावाच्या कोण्या एका कोपर्यातील काही घरं मात्र भाजी-भाकरीच्या काळजीत आणि दुसऱ्यांची दिवाळी पाहण्यात व्यस्त असतात .

तेव्हा मनात सहजभाव येतो कि

कुठे फराळाचा सुवास तर  कुठे फटाक्यांची आतिषबाजी आहे…,

गरीबाच्या झोपडीत मात्र भाकरीसाठी टाहो आहे..!

 

परिस्तिथीला दोन हात करत जगणारे असंख्य कुटुंब आपल्या सभोवताली असतात. गावातील अशा एखाद्या कुटुंबा सोबत आपण दिवाळी साजरी करावी का ? त्यांच्या मुलां सोबत एक दिवस का असेना आपणही आनंद साजरा करावा का.?  याचा विचार गरजेचा आहे. विकासाच्या या दुनियेत कुठेतरी एखाद्याच्या मनातला अंधार आणि आनंद आपल्या  छोट्याश्या प्रयत्नाने प्रज्वलीत केल्यास काय हरकत आहे ! अंधारा कडून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश देणारा हा उत्सव. आपल्या स्वतःच्या आयुष्यातील आणि समाजतली सर्व प्रकारचा अंधार दूर करण्याची इच्छा आणि सामर्थ्य परमेश्वर आपल्या सर्वांना देवो हीच प्रार्थना.! आणि दीपावली शुभचिंतन..!

Leave A Reply

Your email address will not be published.