आज ” गीता जयंती ” च्या निमित्ताने.
आज गीता जयंती..
भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्राच्या रणभुमीत अर्जुनाला श्रीमद्भगवत गीतेचे ज्ञान दिले.
त्याच कुरुक्षेत्रातील योगेश्वर श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या रथाचे सारथी होऊन गीतेचे ज्ञान देत असतानांचे चित्र संविधानाच्या भाग ४ मधे नमुद आहे.
विशेष म्हणजे संविधानाचा भाग ४ हा राज्याला राज्य कसे करावे याचे निर्देशक तत्त्वे सांगतो आणि भगवान श्रीकृष्ण सुद्धा अर्जुनला धर्माचे निर्देशक तत्वे सांगत आहेत.
या दोन्ही बाबींमध्ये फारसा फरक नाही.
आजचा काळ सुद्धा हिंदू समाजातील राजकर्त्यांसाठी धर्मयुद्धा सारखाच आहे. आजचा कुरुक्षेत्र म्हणजे आपले आपले मतदारक्षेत्र त्यामुळे आपल्या मतदार क्षेत्रात काम करतांना अधर्माच्या मुसक्या आवळून धर्माची बाजु घ्यावी लागणार आहे. आजची रणभुमी युद्ध भूमी ही देशविघातक शक्ती आहेत , मतांतरण आहे, धर्मांतरण आहे, भारतीय संविधानाचा अपप्रचार करणारी टोळी आहे.
ज्या प्रकारे भगवान श्रीकृष्णाच्या धर्मा बद्दलच्या निर्देशक तत्वाचे पालन अर्जुनाने केले आणि धर्मयुद्ध जिंकले त्याच प्रमाणे आजच्या सत्ताधाऱ्यांनी संविधानाच्या मार्गदर्शक तत्वांना पूर्णत्वाला घेऊन जायचे कार्य करायचे आहे. भारतीय संविधानाचा मुळ हा हिंदून्यायतत्वशास्त्राच्या आधारावरच आहे. आणि याची प्रचेती आपल्याला संविधानाच्या अभ्यासावरून येतेच.
वरील चित्रात युद्धाची तयारी करत असताना, चिलखत घातलेल्या अर्जुन श्री कृष्णसमवेत रथावर बसलेले आहे. धनुष्य आणि अनेक बाणांनी सशस्त्र, अर्जुनाचे डोके त्याच्या नजरेजवळ खाली केले आहे, जे त्याचे अस्वस्थ मन दर्शवते. कृष्णाने अर्जुनाला त्याच्या ‘धर्म’ किंवा त्याच्या नैतिक जबाबदाऱ्यांवरील कर्तव्याचे महत्त्व सांगून त्याला धर्मबोध दिला याचा उल्लेख महाकाव्यात आहे. चित्रात, आपण पाहतो की कृष्ण एका हाताने रथाचा पट्टा पकडत अर्जुनाकडे पाहत आहे, परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण ठेवत आहे, तर दुसरा अर्जुनाशी संभाषण करताना स्वत:कडे बोट दाखवत आहे. यावरून आपल्याला लक्षात येईल की अर्जुन आपल्या नातवड्यांना युद्धभूमेच्या विरुद्ध बाजूला बघून अवस्थ झालेला आहे आणि श्री कृष्ण त्याला सत्याचे मार्गदर्शन तत्वे सांगून त्याला उपदेश करीत आहे की धर्माच्या म्हणजेच कायद्याचा विरोधात जर आपले नातेवाईक जरी असतील ना तरी तुझी भूमिका ही धर्मसम्मत असली पाहिजे. आणि हेच तत्व भारतीय संविधान श्रीकृष्णाच्या भुमिकेत सत्ताधाऱ्यांना सांगतेय की आपली भूमिका ही संविधानाच्या मार्गदर्शक तत्वांच्या आधारितच असावी.
संविधानकर्ते किती दूरदृष्टे होते त्यांनी संविधान तयार करतांना मार्गदर्शक तत्त्वांवर बरोबर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला मार्गदर्शन करतानाचे चित्र नमुद करून राज्यकर्त्यांना धर्माचे म्हणजेच सत्याचे पालन करण्याचे मार्गदर्शक तत्वे दिली आहे.
सर्वांना गीता जयंतीच्या शुभेच्छा तसेच हे वर्ष संविधानाला ७५ वर्ष पुर्ण होण्याचे अमृत महोत्सव वर्ष आहे.
भारतीय संविधान आणि भगवत गीता दोन्ही ग्रंथ भारतीयांना मिळालेले वरदानच आहे.
जय श्रीकृष्ण !
जय संविधान !
– ॲड. संकेत राव.