आजीच्या बटव्यातील उपाय –
◼️अद्रक रस 1/2 लहान चमचा व 1/2 लहान चमचा मध व 1/2 लहान चमचा आल्याचा हळद एकत्र करून चाटावे. दिवसातून 2 वेळ
◼️एक लहान चमचा हळद व एक लहान चमचा गाईचे साजूक तुप एकत्र करून मंद उष्णते वर थोडे परतवून घ्यावे व त्यात 1/8 लहान चमचा अद्रक रस व 1/2 लहान चमचा तुलसी रस टाकून एकजीव करून सेवन करावे-असे दिवसातून सकाळ-दुपार व रात्री झोपताना सेवन करावे.
◼️1/2 लहान चमचा हळद, 1/8 लहान चमचा मिरेपूड (चिमूटभर), एक लहान चमचा मध, एक लहान चमचा कोरफड गर एकत्र करून दिवसातून 2 वेळ घेतल्यास कफाचे बेडके येणे बंद होतात.
◼️अर्धा लहान चमचा ओवा, थोडा गूळ व लहान पाव चमचा हळद यांचे मिश्रण जेवणानंतर दुपारी व रात्री घेणे.
◼️3 लवंगची पूड 5 तुळशी पाने, 2 हिरवी विलायचीचे ठेचलेले दाणे, दालचिनी पूड 5 चिमूटभर व थोडा गवती चहा 3 कप पाण्यात मध्यम उष्णतेवर उकळा व पाणी निम्मे झाल्यावर त्यात एक मोठा चमचा खडीसाखर टाकून तयार काढा दिवसातून एक वेळ प्या. (मुळव्याध असल्यास पिऊ नका तसेच उष्णu लघवी होत असल्यास पिऊ नका)
◼️रात्री झोपतांना कोमट पाण्यासोबत 1 मोठा चमचा त्रिफळा चूर्ण घ्यावे.
◼️खोकला व कफ असल्यास गाईच्या एक मोठा चमचा साजूक तुपात व 10 काळे मिरे टाकून मंद उष्णतेवर गरम करण्यास ठेवावे व मोहरी सारखे मिरे तडतडल्यावर तूप थंड होऊ द्यावे व 2 लहान चमचे खडीसाखर पूड टाकून दिवसातून दोन वेळा जेवणाच्या अगोदर 3 तास घ्यावे.
◼️अद्रक रस दीड लहान चमचा व अडीच लहान चमचा गुळ एकत्र करून त्याच्या 3 गोळ्या तयार करा व सकाळ – दुपार व सायंकाळ घ्या.
◼️छातीत कफ व खोकला येत असल्यास मुठभर फुटाणे व 3 लसूण पाकळ्या सोबत खा व एक तासभर पाणी पिऊ नका व काही खाऊ नका.
◼️5 चिमूट काळी मिरी पूड व 5 चिमूटभर सुंठ पूड यांचे मिश्रण मधातून दिवसातून 3 वेळ घ्या.
◼️सर्दी-कफ-खोकला असल्यास कोमट पाणी प्या. थंड पाणी बिलकुल पिऊ नका
टीप – वरील उपायाने कफ व खोकला 4 दिवसात बरा झाला नाही व आताच जास्त / सतत खोकला, ताप, श्वास घेण्यास त्रास होत असल्यास वैद्यकीय सल्ला पण घ्यावा.
===================
सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे संतु निरामया |
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद दुःख भागभवेत् ||
(फोटो गुगल साभार )