आपली मुंबई मोठ्या संकटाला सामोरी जाते आहे.?

0

आपली मुंबई मोठ्या संकटाला सामोरी जाते आहे ?

अमुक अमुक लोक मुंबई चे शत्रू आहेत. तमुक लोकांना मुंबईला तोडायचे आहे. ह्या ह्या पक्षाला / संघटनेला  मुंबईला लुटायचे आहे अशा आशयाच्या बातम्या, माहिती आपण प्रसारमाध्यमांध्ये वाचतो – पाहतो. 

मुंबई चे शत्रू कोण आहेत ? आपली मुंबई कोण हिसकावून घेत आहे ? राजकीय लोक ? राष्ट्रीय किंवा राजी पातळीवरील राजकीय पक्ष ? की  दक्षिण भारतीय ? ,  गुजराती ? , बिहारी ?,  उत्तर भारतीय ? तर नाही …. नाही … नाही ..  

आपली मुंबई यापेक्षाही मोठ्या संकटाला सामोरी जाते आहे ?  कोणत्या संकटाला ? तर……. 

ते संकट आहे बांगलादेशी आणि रोहिंग्यांचे. हे संकट दिवसेंदिवस मोठं होतांना दिसत आहे. मुंबईच्या गळ्याला नख लावणारं आहे की काय ? अशी स्थिति निर्माण होत आहे.

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या (TISS) सहाय्यक प्राध्यापक शौविक मोंडल यांनी त्यांच्या शोधनिबंधातून हा निष्कर्ष काढला आहे. ३००० प्रतिसादांच्या गुणात्मक विश्लेषणातून त्यांनी हा निष्कर्ष काढला आहे. याच बरोबर अजून काही संस्थांनी विविध सर्वे केले आहेत. त्यांचे पण गुणात्मक विश्लेषण मोठी चिंता वाढवणारे आहे.  असे लिहिल्यावर कदाचित तथाकथित धर्मनिरपेक्ष लोक हे खोटे आहे म्हणून नाचत येतील . पण नाही हे खरे आहे.  

मोंडल यांच्या मते १९६५ मध्ये ८% असलेली मुंबईची मुस्लिम लोकसंख्या २०११ च्या जनगणनेत २१% झाली, याच कालावधीत हिंदू लोकसंख्या ८८% वरून ६६% इतकी खाली घसरली.

याच वेगाने लोकसंख्येच्या प्रमाणात बदल घडत गेले तर २०५१ मध्ये मुंबईतील हिंदू लोकसंख्या ५०% पेक्षा खाली घसरेल आणि मुस्लिम लोकसंख्या ३०% होईल.

सीमांवरून होणाऱ्या बेकायदेशीर घुसखोरीमुळे मुंबईच्या सामाजिक आणि राजकीय स्वरूपात बदल घडत आहेत. मुंबईतील संसाधनांच्या वापरात बदल घडत आहेत, राजकिय प्रवाह बदलत आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत याची चुणूक दिसली आहे.

केवळ मुंबईत नव्हे तर पुण्यासारख्या शहरातही हे बदल दृश्यमान आहेत.

उलेमा बोर्डाच्या १७ मागण्या हलक्यात घेण्यासारख्या नाहीत. त्यांना हा आत्मविश्वास येण्यामागे निश्चित सांख्यिकी आहे, आणि ही सांख्यिकी त्यांना नक्की माहीत असावी. कारण ही रचना त्यांनीच निर्माण केली आहे ? बांगलादेशी आणि रोहिंग्यांचे बेकायदेशीर स्थलांतर हा वाटतो त्याहून अधिक गंभीर प्रश्न आहे.

यावेळी फ्रान्सच्या निवडणूकीत घडलेली सत्यघटना आहे. दंगे, जाळपोळ करून, भय पसरवून फ्रान्सच्या मतदारांना घाबरवले गेले आणि निकाल बदलले गेलेत. 

युरोप जात्यात आहे आणि आपण सुपात.  त्यामुळे आपणच आपल्या लोकांवर दोषारोप करत बसल्यापेक्षा या प्रश्नाकडे प्रामुख्याने पाहणे गरजेचे आहे. बंगालदेशी आणि रोहिङ्ग्यंचे लोंढे जर थांबवले नाहीत, त्यांना कायद्याच्या चौकटीत ठेचले नाही तर, येणार्‍या काळात हे मुंबईला नख लावल्या शिवाय राहणार नाहीत. 

नितीन राजवैद्य, मुख्य संपादक लोकसंवाद डॉट कॉम

Leave A Reply

Your email address will not be published.