अजानचा अर्थ काय? इस्लाममध्ये अल्लाह सोडून इतर देवांना पुजण्याची परवानगी नाही.

0

सनातन हिंदू धर्मामध्ये ईश्वर सर्वव्यापी आहे, चराचरात आहे अशी उदार मान्यता आहे. त्यामुळे हिंदू व्यक्ति ३३ कोटी देवी देवता, शीख दशमेश पिता, जैन बांधव भगवान महावीर किंवा बौद्ध बांधव भगवान बुद्ध यांचीही पूजा करतात. अगदी कोणत्याही ईश्वराची प्रार्थना करण्यास हिंदू स्वतंत्र आहेत. परंतु इस्लाममध्ये हे स्वातंत्र्य नाही. इस्लामच्या दृष्टीने अन्य पंथाची किंवा अल्लाहशिवाय दुसऱ्या ईश्वराची प्रार्थना करणे म्हणजे शिर्क आहे. पाप आहे. शिर्क करणे हा इस्लामच्या दृष्टीने सर्वात मोठा गुन्हा मानला जातो. इस्लाममध्ये इतर कोणत्याही गंभीर गुन्ह्याची माफी अल्लाहकडून मिळू शकते, परंतु शिर्क करणाऱ्याला माफी मिळत नाही.

‘शिर्क’ म्हणजे काय?

शिर्क हा अरबी शब्द आहे त्याचा अर्थ देवाच्या म्हणजे अल्लाहच्या सोबत इतर देवतांना भागीदार करणे किंवा त्यांना पुजणे, अनेकेश्वरवादी असणे (polytheist), मूर्तिपूजा करणे इत्यादी. जो मनुष्य या वरील गोष्टी म्हणजे शिर्क करतो त्याला मुश्रीक असे म्हणतात.

शिर्क करणाऱ्या विषयी कुराण आणि हदीसचा उपदेश:

“स्मरण करा जेव्हा लुकमान आपल्या पुत्राला उपदेश करीत होता तेव्हा त्याने सांगितले , “बेटा ! अल्लाहसमवेत कोणालाही सहभागी ठरवू नकोस, सत्य असे आहे की शिर्क – अनेकेश्वरत्व (अल्लाहसोबत कोणालाही सहभागी ठरविणे) फार मोठा अत्याचार आहे.”
~ कुराण सूरह ३१, आयत १

(https://quran.com/31/13)

“अल्लाह निःसंशय त्याच्यासोबत अन्य कोणाला सामील करणाऱ्यांना क्षमा करीत नाही. अनेकेश्वरत्व व्यतिरीक्त इतर जितके गुन्हे आहेत तो हवे ते माफ करतो. अल्लाहबरोबर ज्याने इतर कोणाला भागीदार केले त्याने तर एक मोठे कुभांड रचले आणि भयंकर मोठे पापी कृत्य केले.” कुराण सूरह ४, आयत ४८

(https://quran.com/4/48)

“ज्याने एखाद्याला अल्लाहसमवेत सहभागी ठरविले त्याच्यावर अल्लाहने स्वर्ग (जन्नत) प्रतिबंधित केले आणि त्याचे स्थान नरक (जहाननुम) आहे व अशा अत्याचाऱ्यांचा कोणीच साहाय्यक नाही. कुराण सूरह ५, आयत ७२

(https://quran.com/5/72)

आता हदीस म्हणजे हजरत मुहम्मद शिर्कबद्दल काय म्हणतात ते पाहू :-

~ सहीह बुखारी ४४९७

( Sahih al-Bukhari 4497 https://sunnah.com/bukhari:4497)

कोणताही सच्चा मुसलमान चुकूनसुद्धा शिर्क म्हणजे अल्लाह सोडून इतर देवतांची पूजा करणार नाही, कारण त्याला माहिती आहे की त्यामुळे तो नरकाच्या आगीत जाईल! हाच आशय अजानमध्ये ध्वनित होतो. जी मुस्लिम दररोज पाचवेळा नमाज करताना म्हणतात.

अजानचा अर्थ काय होतो?

अजान ही इस्लाम धर्मातील प्रार्थनेसाठी (नमाजसाठी) दिली जाणारी आवाहनाची सार्वजनिक घोषणा आहे. अजान देण्यामागील उद्देश म्हणजे मुस्लिमांना नमाजची वेळ झाल्याची सूचना देणे आणि त्यांना प्रार्थनेची तयारी करण्यासाठी आमंत्रित करणे.

हदीस सुनान अन नसाई – ६३१ दर्जा सहीह “अबु महधुरा याने कथन केले की, अल्लाहच्या प्रेषितांनी (म्हणजेच मुहम्मद पैगंबरांनी) मला अज़ान द्यायला शिकवली आणि ती अशा प्रकारे होती, ते (मुहम्मद पैगंबर) म्हणाले –

“अल्लाहू अकबर , अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर. अश्शहदु अन्न ला इलाहा इल्ललाह , अश्शहदु अन्न ला इलाहा इल्ललाह , अश्शहदु अन्ना मुहम्मदन रसूलल्लाह, अश्शहदु अन्ना मुहम्मदन रसूलल्लाह

म्हणजे-
अल्लाह हाच सर्वश्रेष्ठ आहे, अल्लाह हाच सर्वश्रेष्ठ आहे,
अल्लाह हाच सर्वश्रेष्ठ आहे, अल्लाह हाच सर्वश्रेष्ठ आहे,

मी साक्ष देतो / देते की अल्लाह खेरीज अन्य कोणीही पुजण्यास लायक नाही (अल्लाह शिवाय दुसरा कोणताही ईश्वर नाही.)

मी साक्ष देतो/देते की अल्लाह खेरीज अन्य कोणीही पुजण्यास लायक नाही (अल्लाह शिवाय दुसरा कोणताही ईश्वर नाही.)

मी साक्ष देतो/ देते की मुहम्मद हा अल्लाहचा प्रेषित आहे.
मी साक्ष देतो / देते की मुहम्मद हा अल्लाहचा प्रेषित आहे.

त्यानंतर मुहम्मद पैगंबरांनी याचा पुनरुच्चार केला आणि म्हणाले –

अश्शहदु अन्न ला इलाहा इल्ललाह, अश्शहदु अन्न ला इलाहा इल्ललाह , अश्शहदु अन्ना मुहम्मदन रसूलल्लाह, अश्शहदु अन्ना मुहम्मदन रसूलल्लाह हय्या अलस सला, हय्या अला सला, हय्या अलल फलाह, हय्या अलल फलाह, “अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर, ला इलाहा इल्ललाह

म्हणजे-
मी साक्ष देतो/ देते की अल्लाह खेरीज अन्य कोणीही पुजण्यास लायक नाही (अल्लाह शिवाय दुसरा कोणताही देव नाही.)
मी साक्ष देतो / देते की अल्लाह खेरीज अन्य कोणीही पुजण्यास लायक नाही (अल्लाह शिवाय दुसरा कोणताही देव नाही.)
मी साक्ष देतो/ देते की मुहम्मद हा अल्लाहचा प्रेषित आहे.
मी साक्ष देतो / देते की मुहम्मद हा अल्लाहचा प्रेषित आहे.”

प्रार्थनेसाठी या , प्रार्थनेसाठी या , समृद्धीकडे या समृद्धीकडे या, अल्लाह हाच सर्वश्रेष्ठ आहे, अल्लाह हाच सर्वश्रेष्ठ आहे, अल्लाह खेरीज अन्य कोणीही पुजण्यास लायक नाही (अल्लाह शिवाय दुसरा कोणताही देव नाही.)

इंग्रजी –

It was narrated that Abu Mahdhura said:

“The Messenger of Allah (S.A.W) taught me the Adhan and said: ‘Allahu Akbar, Allahu akbar, Allahu Akbar, Allahu Akbar; Ashhadu an la ilaha illallah, Ashhadu an la ilaha illallah; Ashhadu anna Muhammadan Rasulallah, Ashhadu anna Muhammadan Rasulallah (Allah is the Greatest,Allah is the Greatest, Allah is the Greatest, Allah is the Greatest; I bear witness that there is none worthy of worship except Allah, I bear witness that there is none worthy of worship except Allah; I bear witness that Muhammad is the Messenger Allah,I bear witness that Muhammad is the Messenger Allah)’. Then he repeated it and said: ‘Ashhadu an la ilaha illallah, Ashhadu an la ilaha illallah; Ashhadu anna Muhammadan Rasulallah, Ashhadu anna Muhammadan Rasulallah; Hayya ‘alas-salah, Hayya ‘ala-salah; Hayya ‘alal-falah Hayya ‘alal-falah; Allahu Akbar, Allahu Akbar; La ilaha ill-Allah (I bear witness that there is none worthy of worship except Allah, I bear witness that there is none worthy of worship except Allah; I bear witness that Muhammad is the Messenger of Allah, I bear witness that Muhammad is the Messenger of Allah; Come to prayer, come to prayer; come to prosperity, come to prosperity; Allah is the Greatest, Allah is the Greatest; there is none worthy of worship except Allah).'”

Reference:

Grade: Sahih (Darussalam)
Reference : Sunan an-Nasa’i 631
In-book reference : Book 7, Hadith 6
English translation : Vol. 1, Book 7, Hadith 632
click here

मुस्लिम धर्मगुरू झाकीर नाईक अजान बद्दल आपल्या एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, भारतातील मुस्लिमांना अजानचा अर्थच माहीत नसतो. तो तर माहीत झाला तर तुमच्या (मुस्लिमांच्या) मनावर इस्लामचा अधिक प्रभाव पडेल आणि जे गैर मुस्लिम आहेत त्यांच्याही मनावर परिणाम होईल. आपण अजान म्हणतो तेव्हा “अल्लाह सर्वोच्च आहे, मी साक्ष देतो की अल्लाह शिवाय कोणी मोठा नाही, मी साक्ष देतो की मोहम्मद सलल्लाहुसलं अल्लाहचे रसूल आहे, सलाहकडे या, सलाहकडे या” अशी ईबादत करतो. ही ईबादत सुंदर आवाजात केली तर तुमच्यावर आणि गैरमुस्लिमवर नक्की प्रभाव करेल. मुंबईत खूप बेसुर आवाजात अजान म्हंटली जाते असेही ते म्हंटले. (सोर्स )

+1
Leave A Reply

Your email address will not be published.