अमेरिकेतील खांदा पालट आणि भारत
अमेरिकेतील खांदा पालट आणि भारत
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत (यूएस निवडणूक 2020) मतदान संपले व मत मोजणी सुरू असतानाच ही निवडणूक एका वेगळ्याच वळणावर आली होतो. निवडणुकीचे निकाल जाहीर होई पर्यंत प्रत्येक देश जगातील सर्वात सामर्थ्यवान देशाच्या सिंहासनावर कोण बसणार याची वाट पाहात होता. जो बायडन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करत ऐतिहासिक विजय संपादन केला. अमेरिकेच्या मतदारांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून केलेला बदल भारतासाठी कसा राहील हे येणारा काळ सांगेल. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रंप यांच्या विजयासाठी चांगलेच प्रयत्न केलेले दिसले. अमेरिकेतील भारतीयांची मते डोनाल्ड ट्रंप यांना मिळावी या करिता मोदींनी प्रयत्न केल्याचे ही बोलले जाते. म्हणून अहमदाबाद येथे कार्यक्रम नमस्ते ट्रम्प हा कार्यक्रम घेतला होता. अमेरिकेत हाऊडी मोदी कार्यक्रम घेऊन अबकी बार ट्रंप सरकार अशी घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली होती. एका देशाच्या निवडणूक प्रक्रियेत दुसऱ्या देशाच्या प्रमुख्याने प्रत्यक्ष घेतलेला सहभाग म्हणून अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या. डोनाल्ड ट्रंप यांचेशी माझे अरेतुरेचे संबध असून ते माझे घनिष्ठ मित्र आहेत असे नरेंद्र मोदी सांगत असत. कदाचित मोदींची ही राजकीय मुत्सद्देगिरी म्हणावी लागेल. दुसऱ्या देशाच्या राजकारणात हस्तक्षेप करणे भारतासाठी घातक ठरू शकते. अमेरिकेसारखा बलाढ्य देशाने भारताच्या राजकारणात हस्तक्षेप केल्यास भारतातील लोकशाही धोक्यात येऊ शकते. याचे भान ठेवलेले बरे.
निवडणूक प्रचारादरम्यान, दोन्ही उमेदवारांनी म्हणजे ट्रम्प आणि डेमोक्रॅट पक्षाचे उमेदवार जो बायडन असो त्यांनी भारतीय मतदारांमध्ये सामील होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेले दिसतात. सध्या दोन्ही देशांमधील संबंधही मजबूत आहेत.
बायडेन यांचा विजय भारतासाठी आनंददायी व सकारात्मक ठरू शकेल अशी अशा बाळगण्यास काही हरकत नाही. कारण अमेरिकेचे भूतपूर्व अध्यक्ष बराक ओबामा यांच्या मंत्रिमंडळात बायडन यांनी उपराष्ट्रपतीपदाच्या कारकिर्दीत भारत-अमेरिकन सशक्त संबंधांच्या प्रतिपादन केले आहे. रिपब्लिकन पार्टी च्या कारकिर्दीत बायडन यांनी उपराष्ट्रपती म्हणून भारताचे समर्थन केले. भारत-अमेरिका नागरी अणुकराराच्या मंजुरीसाठी आणि द्विपक्षीय व्यापारातील $ 500 अब्ज अमेरिकन डॉलर्सचे उद्दीष्ट ठेवण्यात बायडन यांचा मोलाचा वाटा होता. तसेच, बायडन यांच्या कोर टीममध्ये भारतीयांची संख्या मोठी आहे असे मानले जाते. त्यांच्या वतीने, उपराष्ट्रपती पदाची उमेदवार कमला हॅरिस भारतीय वंशाच्या आहेत, तर बायडन यांचे दोन महत्त्वाचे सल्लागारदेखील भारतीय वंशाचे आहेत. याखेरीज बायडन यांनी निवडणुकीदरम्यान सांगितले आहे की, ‘ओबामा-बायडन प्रशासनाने नेहमीच भारताशी मजबूत संबंधांना प्राधान्य दिले. जर मी राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडला गेलो तर हे उच्च प्राधान्य असेल.
अमेरिका निवडणुकीत भारताचा सहभाग
वास्तविक अमेरिकेत भारतीय वंशाचे 4 दशलक्ष लोक आहेत. तेथे 20 लाख मतदार आहेत. अमेरिकेतील रिझोना, फ्लोरिडा, जॉर्जिया, मिशिगन आणि टेक्साससह 8 जागांवरील भारतीयांची मते जोरदार प्रभावी आहेत. राजकीयदृष्ट्या, भारतीय वंशाचे लोक येथे शक्तिशाली आहेत. एकूण 5 खासदार भारतीय वंशाचे आहेत.
दोन्ही देशांमधली द्विपक्षीय व्यापार वेगाने वाढतच राहतील.
अमेरिकेत एकूण 12% भारतीय वैज्ञानिक आहेत. नासामधील वैज्ञानिकांपैकी 36% भारतीय आहेत. तर 38% डॉक्टर भारतीय आहेत. यूएस-आधारित तंत्रज्ञान कंपनी मायक्रोसॉफ्टचे 34% कर्मचारी भारतीय वंशाचे आहेत. या व्यतिरिक्त, 13% भारतीय येथे काम करतात. आयबीएमच्या कर्मचार्यांपैकी 28% भारतीय वंशाचे आहेत. या अर्थाने, अमेरिका भारताचे आणि भारत अमेरिकेचे महत्त्व आहे.
जो बायडन यांना व त्यांच्या सहकर्यां पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा.. !
दहशतवादाच्या लढाईत, व्यापारी संबंधामध्ये आणि एकूणच सर्वे भवन्तु सुखीन: या विचाराला धरून अमेरिकेतील नवे सरकार काम करेल अशी आशा बाळगुया. तशी मुत्सद्देगिरी करण्यात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भारत सरकार यशस्वी होईल यात शंका नाही.
Well done
खूप छान नितीन सर ,
आपले लीखान मुद्देसूद व खूप महत्त्वाचे असते.