श्रावण विशेष – कोण्डेश्वर महादेव.

प्रत्येक धर्म संस्कृती मध्ये विविध सण, वार,उत्सवाचे आपले एक वेगळेच महत्व असते. आपल्या धर्मा मध्ये सुद्धा श्रावण मास म्हणजेच श्रावण महिन्याला एक अनन्य साधारण असे महत्व आहे. यामहिन्यात विशेष करून देवाधी देव महादेवाची विशेष पुजा अर्चा केली जाते.
देशभरामध्ये मोठ्या उत्साहात महादेवची आराधना, उपासना या निमित्ताने केली जाते.
त्याअनुषंगाने आपण पाहणार आहोत विदर्भातील अमरावती येथील पाच हजार वर्षा पूर्वीच्या श्रीक्षेत्र कोण्डेश्वर महादेवाची महती.
अमरावती शहारच्या बाहेर पूर्व दिशेला थोड्या डोंगराळ भागात वसलेले हे महादेव मंदिर परिसरातील व देशभरातील हजारो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. अतिशय देखणे काळ्या पाशाणातील हेमाडपंथी मंदिर मोठ्या दिमाखात उभे आहे. त्याचप्रमाणे मदिरातील अतिप्राचीन महादेवची पिंड पाहताक्षणी आपल्याला नतमस्तक व्हायला भाग पाडते. समोरच मोठा नक्षीदार नंदी आपले लक्ष वेधतो. परिसरातच सुंदर गणपतीची मूर्ति सुद्धा आहे. हजारो वर्षापासून इथे भगवान महादेवची पुजा अर्चा केली जाते. या ठिकाणच्या इतिहासाचा शिलालेख आपल्याला पाहाला मिळतो..

पौराणिक माहात्म्य –

प्राचीन काळातील भरत नावाच्या राजामुळे आपल्या देशाला भारत असे नाव मिळाले. भरताच्या भावाचे नाव विदर्भ, त्यांच्या वाट्याला आलेला प्रदेश म्हणजे विदर्भ प्रदेश. विदर्भ राजा हा काशी क्षेत्राजवळील ब्रम्हवर्त येथील मूळ निवासी होते. या शिवभक्त विदर्भ राजाने स्थापत्य विशारद कौडीण्य मुनीस काशिवरून बोलावून सुमारे ५००० वर्षापूर्वी आपल्या नव्या विदर्भ प्रदेशात भगवान शंकरच्या पिंडीची स्थापना केली. कौंडण्यमुनीच्या नावावर या महादेवाला कोण्डेश्वर असे नाव देण्यात आले.  ११ व्या शतकातील यादव घराण्यातील श्री रामदेवराय यादव व श्री कृष्णदेवराय यादव यांच्या राजसत्तेच्या काळातील त्यांचे पंतप्रधान हेमाद्रिपंत यांनी राजसत्तेच्या खर्चाने सुमारे 15 फुट उंचीचे हेमाडपंथी मंदिर बांधून दिले. भोसले घराण्याने व मध्यावरव पेशव्यांनी या मंदिराची जोपासणा केली.  बडनेरा येथील सत्पुरुष वं दादाशास्त्री भाडेकर यांच्या प्रेरणेने 1904 मध्ये मंदिराचे 71 फुट बांधकाम, सभामडप, चार मुख्य द्वार व इतर बांधकाम जिर्णोधार समितीच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आले.
दरम्यानच्या काळात भगवान कोण्डेश्वरच्या दर्शनासाठी या ठिकाणी देशभरातून अनेक साधुसंत, सत्पुरुष व भक्त येऊन गेलेत व आज सुद्धा येत राहतत आणि भगवान महादेवाच्या दर्शनाचा, पूजेचा लाभ घेतात.

  • नितिन राजवैद्य.
  • मुख्य संपादक, लोकसंवाद.कॉम
श्रवण विशेष
Comments (0)
Add Comment