आमच्या गांवचे सोसायटीचे १०० टक्के मतदान झाले पाहिजे.

आमच्या गांवचे सोसायटीचे १०० टक्के मतदान झाले पाहिजे.

महाभारतात कौरव शंभर होते आणि पांडव फक्त पाचच होते. शिवाय कौरवांच्या पक्षात भीष्म, द्रोण, कर्णासारखे धुरंधर योद्धे होते. तरीही विजयी पांडवच झाले. कारण सत्य आणि साक्षात कृष्ण पांडवां कडून होते. हे एक उदाहरण झाले. दुसरे माधवराव पेशव्यांच्या निधनानंतर नायणराव पेशवेपदाचे दावेदार होते. परंतु सत्तेच्या हव्यासापोटी रघुनाथरावांनी गारद्यांकरवी नारायणरावास मारले. आणि स्वतः पेशवेपदावर आरूढ झाले. अशावेळी समस्त दरबारी रघुनारावांची हुजरेगिरी करत मूग गिळून स्वस्थ होते. पण एकटे रामशास्त्री प्रभुणे स्वाभिमानाने उभे राहिले आणि रघुनाथराव यांच्या पेशवेपदाला विरोध केला. नाईलाजाने राघोबादादांना पदावरून पाय उतार व्हावे लागले. हा इतिहास आहे. प्रामाणिकपणे दिलेल्या एका मताची किंमतीचे मोल किती महत्त्वाचे असते. यावरून लक्षात येते. म्हणून मतदान करताना पैशाच्या जोरावर निवडणूक लढवणाऱ्या पेक्षा सर्वसामान्य जनतेच्या समस्या समजून घेणाऱ्या व त्यासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्यालाच निवडून दिले तरच खरा विकास होऊ शकतो हे देशाचे पंतप्रधान मोदींनी आपल्या आचरणातून दाखवून दिले आहे. तसेच आपल्या विधानसभेत ही अशाच उमेदवारास मतदान करा. हे माझे मत आहे. ते सत्यासाठी मत आहे. असाविचार करून मतदान करावे. तेही १००%. केवळ निवडणुकीपुरते पैसे फेकून पाच वर्ष तुमच्याकडून तिप्पट चौपट वसूल करणाऱ्या स यावेळी आपण धडा शिकवू.. व आपल्यातला सामान्य माणसास समस्यांची जाण अशणाऱ्यासच मत देऊन विजयी करू असा निर्धार केला तरच विकास होईल अन्यथा पुन्हा भ्रष्टाचार वाढून आपलीच लूट केल्याशिवाय राहणार नाही! तेव्हा प्रामाणिक माणसाला मतदान करा. कारण मतदान एकदाच करायचे असते. 

प्रत्येकच निवडणूक वेगळी असते आणि त्याचे महत्वसुद्धा वेगळे असते. मात्र ही विधानसभेची होणारी निवडणूक अनेक अर्थाने महत्त्वाची आहे. या निवडणुकीला राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने महत्व तर आहेच त्यासोबतच भविष्यातील महाराष्ट्र कसा असेल ?, त्याची कार्य संस्कृती कशी असेल ? देशाच्या वाटचालीत महाराष्ट्राचे स्थान काय असेल ? असे सर्व प्रश्न या निवडणुकीतून संपणार आहेत.
महाराष्ट्र गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय अस्थिर झाला आहे. कुठलेच अस्थिर सरकार हे राष्ट्राची प्रगती करू शकत नाही.
राष्ट्राला विकासावर न्यायचं असेल, प्रगतीवर न्यायचं असेल, सक्षम करायचं असेल तर योग्य लोकांच्या हातात सत्ता देणे हे महत्त्वाचे आहे.
मतदारांनी जातीपातींमध्ये विभागून मतदान केलं तर, महाराष्ट्र सुद्धा विभागल्याशिवाय राहणार नाही अशी स्थिती आहे. मागील लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात ज्या काही घटना घडल्या आणि जे काही वातावरण निर्माण झाले त्याकडे बघता महाराष्ट्राला एका सक्षम आणि कणखर सरकारची आवश्यकता आहे असे वाटते. 
त्यामुळे प्रत्येक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. पाच वर्षात फक्त आपली पिळवणूक होत आली. यापुढे हे थांबायचे असेल तर अवश्य मतदान करा! प्रामाणिक माणसालाच करा. कारण सरतेशेवटी आपले मत हे आपले हक्काचे आहे. ते पैशाने विकाऊ मत नाही. मतदान करताना राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून आपली मतदान केले पाहिजे एवढच.

नितीन राजवैद्य

नितीन राजवैद्य, मुख्य संपादक लोकसंवाद डॉट कॉम

१०० टक्के मतदानलोकसंवादविधानसभा
Comments (0)
Add Comment