आढावा महाराष्ट्र विधानसभेचा
सध्या महाराष्ट्रात लोकशाहीचा महोत्सव सुरू आहे. राज्यघटनेने प्रत्तेक नागरिकाला दिलेल्या अधिकाराचा वापर करत आपले सरकार निवडून देण्याचा हा उत्सव आहे. महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदार संघासाठी निवडणूक होत असून दरम्यान अनेक नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी पक्षांतर केले आहे तर अनेक ठिकाणी राजकीय पक्षांनी आपापल्या जागेची अदलाबदल केली आहे तर बऱ्याच ठिकाणी विद्यमान आमदारांचे, मंत्र्यांचे तिकीट कापत राजकीय पक्षांनी भाकरी फिरविण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रयत्न कितपत यशस्वी होतो हे येणारा काळच सागेल. झालेल्या बदलांमुळे काही मतदार संघात चुरशीच्या लढत होतील अशी स्थिती आहे. अशा अनेक बाबींचा आढावा आपण लोकसंवाद.कॉम च्या वाचकांसाठी घेणार आहोत.
विदर्भ विभाग, मराठवाडा विभाग, पश्चिम महाराष्ट्र विभाग, खांदेश–उत्तर महाराष्ट्र विभाग आणि कोकण विभाग अशा पाच विभागानुसार आढावा आपण पाहणार आहोत.
विभागानुसार आढावा क्रमाक्रमाने पुढील लेखात बघूया. लोकसंवाद.कॉम सोबत कनेक्ट रहा.
मुख्य संपादक – लोकसंवाद.कॉम
नितिन राजवैद्य