अफगाणिस्तान भाग-१
अजित डोवल यांची अफगाणिस्तान आणि तालिबान (होय, तालिबान!) च्या नेतृत्वाशी गेल्या 2 वर्षात तब्बल 16 वेळा बैठका/चर्चा झाली. अमेरिका अफगाणिस्तानमधून बाहेर पडल्यावर भारताचे ‘इंटरेस्ट्स’ जपण्यासाठी जी पावले उचलणे आवश्यक होती, त्यांची तयारी गेली काही वर्षे मोदी-डोवल करत होते. आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्या परिस्थितीला कधी तरी सामोरे जायला लागणार होते हे यांना फार पूर्वी माहीत होते! 2015 साली एका मद्रासी मिशनरी फादर प्रेमकुमार अँथनीसामी याला तालिबानच्या ताब्यातून भारतीय एजन्सीज आणि सुरक्षा दलांनी सोडवलं होतं तेंव्हा बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटलं होतं. हे भारतीय एजन्सी करू शकतील यावर कोणाचा विश्वास नव्हता. या फादर ला भारतात परत घेऊन येण्याआधी 8 महिने डोवल एकाच वेळी दोन वैऱ्यांशी – अफगाणिस्तान सरकार आणि तालिबानशी चर्चा करत होते! मुळात तालिबानच्या ताब्यात असूनही या फादरला त्यांनी 8 महिने जिवंत ठेवलं, आणि त्यांनतर त्याला नीट ‘वन-पीस’ मध्ये सोडण्यात आलं ते फक्त अजित डोवल यांचे तालिबान मधील काही ट्रायबल टोळीप्रमुखांशी असलेल्या ‘पर्सनल इक्वेशन्स’ मुळेच शक्य झालं होतं. डिप्लोमसी आपल्या जागेवर आहे, पण अजित डोवल हेच भारताचे अफगाणिस्तान मधील ‘ट्रम्प’ कार्ड असणार आहेत हे मोदींना तेंव्हाही माहीत होतं आणि आताही माहीत आहे..
गेल्या 2 आठवड्यात ज्या वेगवान घडामोडी आपण पाहत आलो आहोत, त्याचं आपल्याला सामान्य लोकांना नक्कीच आश्चर्य वाटत आहे. पण, हे असंच होणार आहे.. किंबहुना ही स्क्रिप्ट अशीच लिहिलेली आहे हे दिल्लीला आधीपासूनच माहीत होतं! कदाचित ही स्क्रिप्ट लिहिण्यातही भारताचे योगदान असण्याची शक्यता आहे, असं आता वाटू लागलं आहे. तिकडे बायडन-हॅरीस वॉशिंग्टनमध्ये सूत्रं हाती घेत असताना यावर्षी 13 जानेवारी 2021 रोजी अजित डोवल अफगाणिस्तानमध्ये होते! अश्रफ घानी आणि अब्दुल्ला अब्दुल्ला यांच्याशी त्यांनी चर्चा केली. त्याआधीच्या आठवड्यात दोहा येथे तालिबानशी ते अनौपचारिक चर्चा करून आले होते! भारत यावेळी इतरांपेक्षा दोन पावले पुढे होता हे यातून दिसतं..
23 मार्च 2021 रोजी अफगाणिस्तानचे विदेशमंत्री मोहमद हनिफ अतमार यांनी अमेरिकन सैन्य बाहेर पडल्यावर देशात गृहयुद्ध भडकू नये यासाठी स्वतः दिल्लीला येऊन अजित डोवल यांची भेट घेतली होती. तसं होऊ शकतं याची त्यांना भीती वाटली कारण त्याआधीच्या आठवड्यात अमेरिकन सेक्रेटरी ऑफ डिफेन्स लॉइड ऑस्टिन अजित डोवल यांना दिल्लीत भेटून अफगाणिस्तानला गेले होते. रियल-टाईम इंपुट्स आणि इंटेल आपल्या लोकांकडे होता. 23 जून 2021 रोजी अफगाणिस्तानचे NSA हमदुल्ला मोहिब यांनी ताजिकिस्तान मध्ये अजित डोवल यांची भेट घेतली. अजित डोवल यांनी त्याआधी पासूनच तालिबानच्या टॉप नेतृत्वाशी अनौपचारिक चर्चा सुरू ठेवली होती. दोहा येथे एका भारतीय टीमने तालिबानशी बैठक केली अशी माहिती नंतर कतार सरकारचे राजदूत मुतलाक बिन माजिद अल खतानी (ही पाच लोकांची नावं नाहीत, एकच माणूस आहे ?) यांनी जाहीर केली. त्यानंतर भारत सरकारने अशी बैठक झालीच नाही असं कधी म्हटलं नाही, ना त्यावर कोणती ऑफिशियल प्रतिक्रिया दिली. हमदुल्ला मोहिब आणि अजित डोवल भेटले तोपर्यंत तालिबानने उत्तर अफगाणिस्तान मधील काही भाग आपल्या ताब्यात घेतलाही होता. पण राडे आणि मुडदे पडले नाहीत. आपल्याला वाटत आहे की अफगाणिस्तानच्या सैन्याने प्रतिकार केला नाही, लढले नाहीत. पण मी परत सांगतोय – कदाचित ती स्क्रिप्टच अशी लिहिली गेली असावी. त्यानंतर 28 जुलै 2021 रोजी इंडो-पॅसिफिक, ग्लोबल आणि रिजनल अशा एकूणच परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट अँथनी ब्लिनकेन अजित डोवल यांच्या साऊथ ब्लॉक मधील ऑफिसमध्ये येऊन चर्चा करून गेले! या चर्चेत चीन आणि पाकिस्तान वर चर्चा झाली..
(यावर भाग-२ मध्ये उद्या)?
तालिबान माघारी जाणाऱ्या अमेरिकन सैन्यावर हल्ले करत नाहीये, भारतीय लोकांना त्रास देत नाहीये यात तालिबानचा चांगलेपणा नाही. अशिक्षित जनावरे आहेत ती. त्यांना कंट्रोल मध्ये ठेवण्यासाठी ‘जबरदस्त डोक्यालिटी’ आणि अथक परिश्रम घेतले आहेत आपल्या लोकांनी, विशेषतः अजित डोवल यांनी..
– वेद कुमार.
लिंक्स –
https://www.thehindu.com/news/national/ajit-doval-meets-afghan-leadership-discusses-issues-of-mutual-interest-counter-terrorism-co-op/article33569718.ece
https://www.aninews.in/news/world/asia/afghan-foreign-minister-calls-on-nsa-doval-discusses-bilateral-regional-cooperation20210323155918/
New Delhi’s role in Afghanistan after US exit — what India, Afghan NSAs plan to discuss
https://www.hindustantimes.com/india-news/blinken-doval-discuss-taliban-offensive-in-afghanistan-and-indopacific-101627459539879.html