अमेरिकेतील भारतीय समाज.
मूळ भारतीय असणारा आणि सध्या अमेरिकेत राहणारा भारतीय समाज हा अमेरिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. अनुक्रमे चीन आणि हिस्पॅनिक यांच्यानंतरचा हा तिसरा अमेरिकेतर समाज आहे.
2017 च्या अमेरिकी लोकसंख्या च्या 1.0 3% अंदाजे 44 लाख त्याची संख्या आहे. यात 51% हिंदू ,18.6% ख्रिश्चन ,10 टक्के मुसलमान, 5 टक्के शीख ,2 टक्के जैन आणि 10 टक्के ज्यांनी धर्म नोंदवलेला नाही असे अशी एकूण वर्गवारी आहे.
भाषा नुसार विचार केला तर हिंदी, गुजराती, पंजाबी, तेलगू या भाषा जास्त बोलल्या जातात.
अमेरिकेचा लोकसंख्या वाढीचा वेग 13 टक्के आहे तर अमेरिकेतील भारतीय समाजाचा वाढीचा वेग 130 टक्के आहे.
इतिहास:
तसे तर सन सोळाशे च्या नंतरच ईस्ट इंडिया कंपनीने काही भारतीय अमेरिकन कॉलनीत आणले. परंतु भारतीयांचा जाणवण्यासारखा येण्याचा प्रवाह अठराव्या शतकात सुरू झाला. इसवी सन 1900 पर्यंत अमेरिकेत 2000 भारतीय शीख राहत होते. ही शीख मंडळी त्या वेळी कॅलिफोर्नियामध्ये राहत होती आणि तेथील मेक्सिकन लोकांशी मिळून राहत होती. यांनाही वंशभेदाचा त्रास झाला .अनेक कायदे त्यांच्याविरुद्ध तयार करण्यात आले. यांना गोऱ्या महिलेशी लग्न करायची परवानगी नव्हती. जमिनीची मालकी हक्क नव्हता. अशा अडचणी होत्या परंतु ब्राऊन म्हणजे मेक्सिकन स्त्रीशी लग्न करता येत होते. 1910 मध्ये भिकाजी बलसारा यांना प्रथमच स्वतंत्रपणे औपचारिकरीत्या अमेरिकन नागरिकत्व मिळाले. ते पारशी होते आणि पारशी हिंदू पेक्षा वेगळी व गोरी जमात आहे हा त्या वेळी तर्क होता मुजुमदार यांनाही कॉकेशियन समजून नागरिकत्व देण्यात आले.
नागरिकत्व साठी लढा मराठी माणसाचा:
1913 ते 23 च्या दरम्यान 100 भारतीयांना अमेरिकन नागरिकत्व देण्यात आले. 1923 मध्ये अमेरिकन सुप्रीम कोर्टाने एका खटल्यांमध्ये असा निर्णय दिला की ,भारतीय हे फ्री , मूक्त गोरे नाहीत आणि ते कॉकेशियन आहेत हा आधार त्यांना नागरिकत्व द्यायला पुरेसा नाही म्हणून त्यांना नागरिकत्व देता येणार नाही .भारतीय आणि अमेरिका यांच्यात प्रचंड तफावत आहे आणि ते या समाजात मिसळू शकणार नाही असेही न्यायालयाने म्हटले.या निकालाच्या परिणामी 50 भारतीयांचे नागरिकत्व काढून घेण्यात आले. सखाराम गणेश पंडित हे एक वकील होते आणि एका गोऱ्या स्त्रीशी त्यांनी लग्न केले होते .त्यांनी या निकालाच्या विरुद्ध लढा दिला आणि त्यांना नागरिकत्व पुन्हा बहाल झालं परंतु यानंतर असं नागरिकत्व अन्य कोणालाही बहाल केलं नाही. यामुळे सुमारे 3000 भारतीयांना अमेरिकेतून परत भारताकडे निघण्याची वेळ आली आणि सर्वांना ते शक्य नव्हतं .यामुळे यशोदास बघाई या भारतीयाने आत्महत्या केली .या घटनेचा परिणाम म्हणून या निर्णयावर प्रश्नचिन्ह लागलं आणि इमिग्रेशन ही वनवे सिस्टीम होऊ शकत नाही ही असेच सर्वांना वाटलं.
1917 च्या इम्मिग्रेशन कायद्यामुळे भारतीयांचं इमिग्रेशन कमी झालं आणि त्यांना मेक्सिकोचे वाटेने अवैधरित्या अमेरिकेत प्रवेश करणे हाच एक पर्याय उरला आणि त्या वेळी राहणारा शीख समाज त्यांना सहज आपल्यामध्ये सामावून घेत होता. अशाप्रकारे 1923 ते 1935 या काळात सुमारे 2000 भारतीय प्रामुख्याने शीख अवैधरित्या अमेरिकेत आले. गदर पार्टीने यांना वसवण्यासाठी पण पुष्कळ मदत केली आणि यातून गदर पार्टीला पैशाचा स्त्रोत पण मिळाला.
दुसऱ्या महायुद्धानंतर:
द्वितीय महायुद्धानंतर लुईस सेलर नुसार 1946 पासून दरवर्षी 100 भारतीयांना स्थलांतराची, अमेरिकन नागरिकत्व मिळण्याची परवानगी देण्यात आली. 1952 च्या एका कायद्यानुसार 1917 चा कायदा निष्प्रभ करण्यात आला. मात्र दरवर्षी भारतीयांच्या प्रवेशाची मर्यादा 2000 ठरविनण्यात आली. 1910 मध्ये 95 टक्के अमेरिकन भारतीय पश्चिम किनाऱ्यावर राहत होते ही संख्या कमी होत 65% वर आली कारण भारतीय आता पूर्व किनाऱ्याकडे जाऊ लागले होते. 1940 मध्ये 43 राज्यात भारतीय राहत होते .पश्चिम किनाऱ्यावरील भारतीय प्रामुख्याने ग्रामीण भागात राहत होते तर पूर्व किनाऱ्यावरील भारतीय प्रामुख्याने नागरी वस्त्यांमध्ये शहरांमध्ये राहत होते. ब्रेक यारो कार्यक्रमामुळे मेक्सिकन लोकं शेती वर कामे करू लागले आणि भारतीय लोक छोटी दुकान चालवणे, टॅक्सी चालविणे, इंजिनिअर बनणे असे अशा कामांमध्ये प्रवेश करू लागले
गुजराती भारतीयांचे स्थलांतर:
त्यानंतरच्या काळात गुजराती भारतीयांचा नवीन स्थलांतराचा लोंढा सुरू झाला आणि त्यांनी हॉटेल उघडणे मोठ्या प्रमाणावर चालू केलं. 1955 मध्ये एकवीस हॉटेल उद्योगांपैकी चौदा-पंधरा गुजरातींचे होते आणि 1980 पर्यंत गुजराती समाजाने हॉटेल उद्योगावर आपला पगडा जमवला
1985 नंतर:
1985 च्या इम्मिग्रेशन कायद्यामुळे भारतीयांसाठी अमेरिकेची दारे मोठ्या प्रमाणावर उघडले गेले आणि यात पारंपारिक उत्तर भारतीय पेक्षा वेगळे समुदाय येऊ लागले .अमेरिकेत येणारे सारेच भारतीय भारतातून येत होते असं नाही तर जगभर असलेल्या भारतीयांच्या वसाहतीतून पण ही मंडळी येत होती , येत राहिली .1965 ते 1995 यादरम्यान दरवर्षी सरासरी 40000 भारतीय अमेरिकेत स्थलांतरित होत गेले. त्यानंतर हा आकडा झपाट्याने वाढत गेला आणि इसवी सन 2000 मध्ये त्यांनी 90000 आकडा गाठला
2000 नंतर:
इसवी सन 2000 नंतर अनेक कारणाने भारताच्या स्थलांतर प्रवाहाला एक प्रचंड गती आणि वेगळेच स्वरूप प्राप्त झाले .प्रायव्हेटायजेशन, स्पर्धा ,भारतीय शिक्षण, दक्षिणेतल्या बंगलोर ,हैदराबाद सारख्या ठिकाणी इन्फॉर्मेशन इंडस्ट्रीज यामुळे या ठिकाणाहून येणारा एक मोठा वर्ग तयार झाला आणि जुन्या आंध्रप्रदेश मध्ये आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यातून तेलगू भाषिक प्रवाशी भारतीय प्रचंड प्रमाणात अमेरिकेत घेऊ लागले आणि लवकर त्यांनी अन्य सर्व भाषिक भारतीयांना मागे टाकून एक नंबरचा भाषिक भारतीयांचे स्थान पटकावले.
याशिवाय केरळ ,तामिळनाडू ,कर्नाटक आणि गुजरात या राज्यातील भारतीय अमेरिकेच्या विविध भागात मोठ्या संख्येने वसले आहेत.
2006 मध्ये अमेरिकेत आलेल्या एक लाख 26 हजार स्थलांतरा पैकी 58 हजार भारतीय होते. 2000 ते 2006 यादरम्यान सव्वा चार लाख भारतीयांचा अमेरिकेत प्रवेश झाला 1990 ते 2000 यादरम्यान भारतीयांच्या वाढीचा वेग 106 टक्के होता तर अमेरिकेच्या सरासरी वाढी दर साडेसात टक्के होता.
भारतीयांची वैशिष्ट्ये:
एशियन अमेरिकन कम्युनिटीमध्ये भारतीयांचा वाटा सोळा टक्के आहे. या काळामध्ये भारतीयांची संख्या दहा लाखाच्या वर पोहोचली. 1995 -2005 भारतीयांनी स्थापन केलेल्या उद्योगांची संख्या इंग्लंड, चीन ,जपान आणि तैवान येथून आलेल्यांनी स्थापन केलेल्या एकूण उद्योगांच्या संख्या पेक्षा जास्त होती. 1999 ते 2005 याकाळात सिलिकॉन व्हॅलीमध्ये भारतीय चे प्रमाण साडे सहा टक्के वरून साडे पंधरा टक्केपर्यंत पोहोचले. सर्व मोठ्या व महत्त्वाच्या अमेरिकन कंपन्यांमध्ये टॉपच्या जागांवर भारतीय-अमेरिकन पोचले. हे सर्व भारतीय अतिशय असामान्य आर्थिक स्थितीतून आले होते उदाहरणार्थ गुगलचे प्रमुख सुंदर पीचाई लहानपणी आपल्या घरी टीव्ही सुद्धा पाहू शकत नव्हते आणि आपल्या टू बेडरूम अपार्टमेंटमध्ये कुठल्याही टेक्नॉलॉजी शिवाय आपल्या भावासोबत राहत होते ताज्याआकडेवारीनुसार भारतीय बिझनेस स्कूलमधून पास होणारे 23 टक्के विद्यार्थी अमेरिकेमध्ये नोकरी धरतात.
उच्च शिक्षित भारतीय:
भारतीय अमेरिकन इतर कोणत्याही भाषिक गटा पेक्षा जास्त गतीने व सातत्याने आर्थिक सामाजिक आघाडीवर प्रगती करीत आहे.2006 मध्ये डॉक्टरामध्ये त्यांचा वाटा सहा टक्के पेक्षा अधिक होता.
2015 मधील एका अभ्यासानुसार पंचवीस वर्षाच्या वरील अमेरिकन भारतीयांमध्ये पदवी शिक्षण घेतलेल्याचे प्रमाण 32 टक्के आहे 40% पोस्टग्रज्युएट आहेत .साधारण अमेरिकन नागरिकांसाठी हे प्रमाण अनुक्रमे 19 टक्के आणि 11 टक्के आहे.
सर्वाधिक उत्पन्न:
उत्पन्नाच्या बाबतीत भारतीय अमेरिकन गटाने नेटिव्ह अमेरिकन आणि अन्य स्थलांतरित गट या दोघांनाही मागे टाकले आहे भारतीय अमेरिकन गटाचं सरासरी वार्षिक उत्पन्न 100,000 डॉलर्स आहे तर अन्य स्थलांतरित गट आणि नेटिव्ह अमेरिकन यांच्यासाठी हे प्रमाण अनुक्रमे 51 हजार आणि 56 हजार डॉलर्स आहे.
शिक्षणावर भर आणि उत्तम कामाची क्षमता या व इतर काही गुणांमुळे भारतीय अमेरिकन हे आर्थिक दृष्ट्या सर्वाधिक यशस्वी आणि सर्वाधिक श्रीमंत असा वांशिक/इथनिक समूह ठरला आहे.
फक्त सात टक्के भारतीय अमेरिकन दारिद्र्यरेषेखाली आहे अमेरिकन जन्मलेले आणि अन्य समूहासाठी हे प्रमाण अनुक्रमे सतरा व 14 टक्के आहे.
न्यूयॉर्क मध्ये सर्वाधिक भारतीय:
न्यूयार्क शहरात सर्वाधिक अमेरिकन भारतीय राहतात ही संख्या 3 लाखाहून जास्त आहे. त्यापाठोपाठ न्यूजर्सी दोन लाख 97 हजार, टेक्सास दोन लाख 45 हजारआणि इलिनोईस 180,000 ही शहरे येतात. विशेष म्हणजे हे आकडे 2010 च्या सेन्सस नुसार आहेत. आता 2019 मध्ये हे आकडे किती वाढले असतील याची कल्पना आपण करू शकतो. मिनी इंडिया किंवा लघु भारत म्हणता येईल अशी एकट्या न्यूयार्क शहरात 21 वस्त्या आहेत.
याशिवाय जिथे अमेरिकन भारतीयांची संख्या जाणवण्या सारखीच आहे अशी शहरे म्हणजे बाल्टिमोर, वॉशिंग्टन ,अटलांटा ,डेट्रॉईट, सॅन फ्रान्सिस्को, हुस्टन ,फिलाडेल्फिया, शिकागो आहेत
अगदी 1910 च्या सर्वात आधीच्या भारतीय अमेरिकन वसाहती म्हणजे स्टॉप टोन साक्रामेंटो युवा सिटी. पण या वसाहती शेती च्या भागात असल्यामुळे इथे लोकसंख्या आता कमी आहे
तेलुगू भाषिक सर्वाधिक:
भारताबाहेर भारतीयांची संख्या सर्वाधिक असण्यामध्ये अमेरिका हे प्रथम गंतव्य स्थान आहे हे विशेष.
हिंदी ,तेलगू, कन्नड ,बंगाली ,पंजाबी अशा विविध भाषांमध्ये ते तिथे रेडिओ स्टेशन्स आहेत. महानगरांमध्ये फक्त बॉलीवुडचे किंवा तेलगू सिनेमा दाखवणारे मूवी थिएटर्स पण आहेत. 2012 मध्ये तेजू प्रसाद यांनी अमेरिकेतील भारतीयांचा प्रवास दाखविणारा एक सिनेमा पण काढला होता नाट ए फीदर बट डॉट, असे त्याचे नाव आहे.
नजीकच्या काळात पॉप्युलर मीडियामध्ये अनेक भारतीय अमेरिकन यांनी आपली छाप सोडली यात प्रमुख आहेत कोविद गुप्ता, काल पेन अजीज अन्सारी ,हसंन मिन्हाज आणि मीडी कॉलिंग.
50 ही राज्यात मंदिरे:
भारतीय समाजाच्या विविध आधारे भाषा पंथ धर्म व्यवसाय अशा अनेक संघटना इथे आहेत त्यांचे फेडरेशन पण आहेत आणि ते अमेरिकेत भारतीयाचा आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न करीत असतात .सर्व प्रकारचे मंदिर गुरुद्वारा येथे 50 ही राज्यांमध्ये आहेत.
2008 च्या ठिकाण अंदाजानुसार अमेरिकेत बावीस लाखावर हिंदू समाज आहे तर तीन ते पाच लाखाच्या दरम्यान शीख समाज आहे. भारतीयांचे स्वतंत्र चर्च पण वेगवेगळ्या ठिकाणी आहेत भारतीय ज्यु हा भारतीय-अमेरिकन मधील सर्वात लहान धार्मिक समूह आहे त्याची संख्या आहे 350 फक्त. (photo – financialexpress)
- अनिल सांबरे ,नागपूर
+91-922-521-0130