अन्नपूर्णे सावध हो.

अन्नपूर्णे सावध हो

सकाळ संध्याकाळ,
घरोघरी पेटणारी चूल ,
आता झालीय इतिहास जमा …!
पण प्रगतीच्या वेगात ,
याची कोण बाळगताय हो तमा?

आपल्या सुगंधानं घरा दाराला वेड लावणारी तूरडाळ ,
आम्ही कोंडली कुकरच्या शिटीत !
घरचं बाहेरचं विश्व आता, अन्नपूर्णेच्या मुठीत.

छान! मुलगी शिकली …प्रगती झाली .
आता वाढवावाच लागेल
प्रगतीचा वेग …
पण किचनच्या भिंतीला मात्र पडू लागलीय भेग !

क्वचित दिसणारे स्विग्गी-झोमॅटो चे डबे आता दिसतात वारंवार,
फोडणीचा सुगंध,
होऊ लागलाय हद्दपार.

अन्नपूर्णे वेळीच सावध हो!
नाहीतर खल्लास होईल सारा खेळ.
गमावलीस चूल तर ..
मूल गमवायला नाही लागणार वेळ.

स्वयंपाक घर असते एक जागा… परिवाराला एकत्र बांधण्याचा धागा.
पश्चिमेच्या या वाऱ्याने ओलांडली जर वेस!
आपणही होऊ अमेरिकेसारखेच फादरलेस ..!

 

निकिता गजानन गावंडे
न्यू सुभेदार, ले आऊट, नागपूर.

निकिता गजानन गावंडे, नागपुर.

लेखिका सामाजिक विषयाच्या अभ्यासक आहेत. विविध वृत्तपत्रांमध्ये नियमित स्तंभलेखन, विविध सामाजिक विषयांवर कविता, विशेषत्वाने हास्य कवितांचे लेखन करतात. मोबा - 9970663813.

मराठी कविता
Comments (0)
Add Comment