आशा ….
(photo google )
जगातील प्रत्येक मनुष्य वा स्त्री हे आज कोणत्यातरी आशेवर जीवंत आहे, प्रसंगी तत्वज्ञान हा त्याला अटक म्हणून स्वीकारावा लागणारा मार्ग आहे. आशा अमर आहे.आशा मधूर असते पण आशेशिवाय जीवन कंटाळवाणे बनते.बालक, तरुण, तरुणी, श्रेष्ठ, क्षुद्र, श्रीमंत, गरीब हे सर्व आशेवरच आवलंबून असतात पण कधी -कधी त्याला कर्तव्यासाठी आशेला मागे ढकलावे लागते.सर्वच आशा सफल होतील वा नाही.आशा सफल झाल्या तर मनुष्याला समाधान वाटते , अपयश आले तर त्याला दुःख होते.
ज्या मनुष्य किंवा स्त्री च्या मनात ज्या प्रमाणे आशा असतील त्याने त्या प्रमाणे कर्तव्य केले पाहिजे, आशा सफल करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे.एखाद्या गोष्टीची आशा ठेवण्यापेक्षा, त्या गोष्टीची इच्छा ठेऊन, त्याचे स्वप्न बघून, स्वप्नाला साकार करण्याचे द्रुष्टीने मेहनत घेतली पाहिजे अन्यथा स्वप्न फक्त स्वप्नच राहिल ते कधीही अस्तित्वत येणार नाही. मला परीक्षेत 70% मार्कस मिळाले पाहिजेत असे म्हणण्यापेक्षा मला 70% मार्कस मिळतीलच असे म्हणणे योग्य ठरेल परंतु हेच ध्येय डोळ्यासमोर ठेऊन अभ्यास केला तर !
भविष्यात काही तरी गोंडस आहे या आशेच्या गुंगीवरच सर्व चराचर सृष्टीचा दैनंदिन कार्यक्रम अव्याहतपणं चालू आहे.वर्षाऋृतून पाऊस पडणार आहे. या आशेवरच पृथ्वीसुध्दा उन्हाळ्यात कडक उन्हात धीर धरून उभी आहे. आशा वेडी असते, ध्येय शहाणे असते; आशा हातातल्या रेषा बघत असते.तर ध्येय हातातील सामर्थ्य अजमावते !
- प्रकाश चिकारे,नागपूर