‘सामाजिक काम’ हे वाटते तेवढि सोपी गोष्ट नाही व कठीणही नाही, तर ती एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. साधन, साध्य यांचा विवेक बाळगावा लागतो. मध्यंतरी एम.टी. महामंडळाची “हात दाखवाल तिथे बस थांबा” अशी योजना होती. त्यामुळे प्रवाशी सुखी झाले. बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे त्यांचे घोषवाक्य होते. बिना वाहक योजनाही अशीच होती., एकदा गाडी भरली की सोडायची. फक्त चालक य प्रवासी हे एक नाते असते. गाडी सुटण्याचे ठिकाण आणि अंतिम गंतव्य स्थान निश्चित असते. अशा गोष्टी मोप्या असतात, जर त्याचे नियोजन उत्तम झाले तर. Vission, Mission हे यातले ध्रुवपद असते.. कोणत्याही गाण्याचा व सामाजिक संस्थेचा तो वैचारिक गाभा असतो, त्याच्या अनुषंगाने सारे असले पाहिजे, कारण ती आपल्या अत्तराची कुपी आहे. एकच सुगंध सुरवातीपासून शेवटपर्यंत असला पाहिजे. असं झालं तरच सामाजिक कामाची एक प्रभा निर्माण होते, ते समाजाचे मानबिंदू ठरते. व. पु. काळे म्हणाले होते की, वर्तुळाच्या परिघावरचा एखादा बिंदू हलना तरी चालेल, पण केंद्रबिंदू मात्र किंचितही हलता कामा नये. कारण असं झाल्यास पूर्ण चर्तुळ बिघडेल. जर ही वैचारिक स्पष्टता असेल तर गडबड होत नाही. संभ्रम राहत नाही. सारं काही लख्ख प्रकाशात पाहिलेले असेल, तर काम करायला आनंद मिळतो. सरकारी काम है बरेचदा टार्गेटमाठी चालवे, असे आपण खुपदा अनुभवतो. कार्यकर्ता भावनेने काम करणारे सरकारी अधिकारी खूप आहेत, पण ते कौतुकाचे ठरतात पण अनुकरणीय नाही. सामाजिक काम ही आनंदयात्रा झाली पाहिजे. PRA बेसलाईन सर्व्हे, नीडवेस असेसमेंट, रोडमॅप, आऊटकम, आऊटपुट या सर्व सामाजिक कामाच्या संज्ञा व त्याचे महत्व समजले पाहिजे. देणगीदारही मग मदत करताना सतीच दान भरपोस करतो. सामाजिक काम हेही एक नाव आहे. हे बरेचदा आपण विसरतो. माझा एक मित्र म्हणाला होता की, कामधेतु यासली तरी ती आपसुक दुध देत नाही, दुध काढवं लागतं. त्यासाठी गाय हा एक पशु नाही, तर आपल्याच घरातील ती एक सदस्य आहे हा भाव ठेवावा लागतो. भूकेने रडणाऱ्या बाळाला दुध पाजणे हा आईचा धर्म असतो. यासाठी कोणताही धर्मग्रंथ ती वाचत नाही. हे बाळ माझे आहे., यामध्ये सारे काही आले. सामाजिक संस्थांनी सामाजिक समस्येकडे मा भावनेतून पाहिले पाहिजे. समाज, सरकार, लोकप्रतीनिधी काही कमी पडू देणार नाही. आपल्या समाजामध्ये साध कधी उपाशी राहता कामा नये ही भावना आहे. संस्थांनी हे साधूत्व जपलं पाहिजे. खरे आव्हान तर तेच आहे असे आम्हाला वाटते.
मी रेल्वे प्लॅटफॉर्मवर गेलो, तेव्हा तिथे थंडीने कुडकुडत झोपलेली लोक दिसली. मला गलबलून आले. मी दुस-या दिवशी पदरचे पैसे मोडले व काही ब्लॅंकेट नेऊन घातल्या. ते तेव्हाही गाढे झोपेतच होते. मला मात्र त्यादिवशी शांत झोप लागली. हा एक कार्यक्रम झाला. मुळ विचार, समस्या शोधावि लागते, ते शोधले नाही तर तापाचे निदान न करता ‘औषध दिल्यासारखे होईन, नाही का ? मग मनात येईल गावांमध्ये पाणी नाही, उपजीविकेची साधन नाहीत, पुरेशी आरोग्य व्यवस्था नाही, दर्जेदार शिक्षण नाही. परिणाम म्हणून काम शोधतं तो शहरामध्ये आला. स्वतःचे घर सोडा झोपडीही त्याची येथे नाही, गावातील झोपडी ही निसर्गाच्या कुशीत असते. शहरातील सोपडी ही एका बकाल नगराचं दर्शन घडविते. मग ग्लैटफॉर्म हेच घर बनते. विचारी कार्यकर्ता मग गावांमध्ये पाणी, उपजिविकेची साधने निर्माण करण्यासाठी कामे सुरु करतो. काम है गरजेवर आधारित असतं. निदान योग्य असतं. त्यामुळे ते काम चांगलं बहरतं. ‘सोटमुळ’ जमिनीमध्ये जेवढं खोल जाईल, उपमूळ जेवढी फुटतील तेवढं ते अधिक वाढत जाईल. मातीशी नात व गगनाशी संवाद असेल तर अशा झाडाचा डोलारा वादळ वाऱ्यातही उभा राहतो. समाज स्वतःहून खतपाणी घालतो. पशुपक्षीही त्या भोवती फिरतात. एक वातावरणही त्याभोवती तयार होते, कारण तो कल्पवृक्ष असतो. समाज मनातील इच्छा आकांक्षा येथे जाऊन मोकळेपणाने सांगाव्यात असे वातावरण तयार होते. मन येथे रीतं करता येत, तसेच नवीन जगण्याची ऊर्मीही मिळते. ती केवळ सामाजिक संस्थेची इमारत राहत नाही, तर ते समाजाचे घर बनते. अशा सामाजिक कामांना पैसे मागावे लागत नाहीत. देणगीदार चांगल्या कामाच्या शोधत येतात. प्रेरणा, हेतू शुद्ध असेल तर शुद्ध चलनही मिळते. अन्यथा सामाजिक काम म्हणजे Black to white पैसा करण्याचे साधनं ठरते , समाजाला ही भोंदुगिरी कधीतरी समजते. पंढरपूरची वारी ही समाजासोबत चालत गेल्याने समजते (उमजते). गळयात तुळशीची माळ, कीर्तन, अभंग, द्वैताकडून अद्वैताकडे जाणे यातच खरी वारी असते. मुखाने विठ्ठल हरिनामाचा ध्वनी जरी येत असला, तरी मन एका वेगळ्याच आनंदाच्या डोहामध्ये चिंब झालेलं असतं. ‘आनंदाचे डोही आनंद तरंग ही मनाची भावावस्था असते. पंढरीची वारी ही केवळ चालणे नसते, तर तो एक स्वसंवाद असतो. सरकारी GR नाही, अनुदान नाही, शिफारस पत्र नाही, तरी पण अब्याहृतपाने चालत आलेली वारी ही सामान्य वारक-यांपासून ते माननीय मुख्यमंत्र्यापर्यंत तीच असते. सूर्यनारायण तोच, पण प्रत्येक प्रकाशाचा कवडसा वेगळा असतो. मुखदर्शन क्षणाचे असते, पण होणारे समाजदर्शन हे दीर्घकाल लक्षात राहते. कोणत्याही कामामध्ये प्रेरणा ही अत्यंत महत्वाची आहे. एका फळातून, बी मधून पुन्हा नवीन झाड तयार होते. एवडी सुसत शक्ती त्या बी मध्ये असते. समाजमनामध्ये पण अशीच सुप्त शक्ती असते. याच शक्तीने कधीकाळी व अजूनसुद्धा करोडो रुपये समाजातून उभे करून मंदिरे बांधली. कुणी रुपया दिला, कुणी करोडो रुपये दिले, कुणी श्रमदान केलं त्यामुळे मंदिरासाठी टेंडर काढ़ब लागलं नाही. नावाची पाटी कुठेच नव्हती. समाजामध्ये अशा लोकचळवळी होत असतात. सामाजिक संस्था हे त्याचेच प्रगट रूप असते. पण सरकारी पैसा आला, राजकारण आलं यामुळे गावोगावी नळ आले, पण पाणी मात्र आलं नाही. गावाचे गावपण राजकारणामुळे नासलं. समाजमनाला लागलेला हा रोग सामाजिक कामातून दूर झाला पाहिजे, शेवटी सरकार सरकार म्हणजे तरी कोण? आमच्या गावात आम्ही सरकार, दिल्लीमध्ये आमचं सरकार ही लेखामेंडा गावाची भूमिका म्हणून अधिक महत्वाची ठरते. नाहीतर पुरवठा आधारित कामांच गाठोड हळूहळू मोठ होत जात. पैशासाठी काम सुरू राहते. त्या कामाचा आत्मा / प्राण कधीच गेलेला असतो. फक्त सांगाड़ा शिल्लक असतो. त्यामध्ये प्राण फुंकणारे कार्यकर्ते नसतात, कर्मचारी असतात. धर्मादाय आयुक्तांची नोंद, ऑडीट रिपोर्ट, चेंज रिपोर्ट, DPR, अहवाल छपाई, सर्वसाधारण सभा या साऱ्यामध्ये आपण एवढे व्यस्त होतो, की ‘बहुजन सुखाय’ ऐवजी ‘हात दाखवेल त्याला तिथे आपली गाड़ी थांबते, देणगीदार गाडी थांबवतो व तोच नंतर ठरवतो, मी पैसे देतो आता तुम्ही हे करा. स्वयंसेवी संस्थेची अवस्था ही गर्दीत हरवलेल्या माणसारखी होते. फक्त तो त्या गर्दीचा एक भाग झालेला असतो. ‘कोण होतास तू काय झालास तू’ अशी अवस्था होते. बर अशावेळी कुणी सांगायला धजावतही नाही की, बाबारे पोहोचलास एवढे खरे पण जागा चुकलास. दिशा चुकली की सामाजिक कामाची ‘दशा’ होते. हे न होण्यासाठी खुप जपायची गरज आहे. प्राणपणाने लावलेली पणती बरेचदा बादळवा्यामध्ये
जपण्याचे मोठे आव्हान असते. तेल, पणती, वात यापेक्षा अखंडपणे तेवणारी ज्योत महत्त्वाची असते, नाही का? अवस्था आहे. पैसाही आहे, पण पुन्हा पणती पेटवण्यासाठी लागणारी चिंगारी जर आम्ही विसरून बसलो तर त्या पणतीच्या पेटण्याला काही अर्थ राहत नाही. पणती पुन्हा पेटवायची असेल तर चिंगारीला विसरून कसं चालेल, कारण अंधाराचा अभाव म्हणजे प्रकाश,
मला गुजरातच्या भूकंपावेळची एक घटना आठवते. आम्ही वैद्यकीय मदत कार्यामध्ये होतो. गाडीमध्ये औषधांसोबत अन्नधान्यही होते. दिवेलावणीची वेळ होती, त्या वेळेला कातरवेळ म्हणतात. मूर्यास्तानंतर मनाला एक बिषण्णताही असते. अशावेळी आम्ही एका उध्वस्त घराशेजारील एका महिलेला भेटलो होतो. भूकंपामध्ये सारेच उध्वस्त झालेले होते. आम्ही तिला म्हणालो, आपको कुछ चाहिये, हमारे पास सबकुछ है!, हा आमचा गर्व होता. ती म्हणाली, ‘सुबह से बहुत लोगोंने बहुत कुछ दिया है, फिर भी मेरी माचिस कही गुम हो गई है, आपके पास माचिस क्या?’ आमचे गर्वाचे, हुशारीचे विमान वास्तवामध्ये लँडिंग झाले होते. त्यादिवशी आम्हाला हे समजले की ‘गरज’ ही महत्वाची असते. तुमच्याकडे देण्यासाठी काय आहे, त्यापेक्षा तिची गरज काय आहे हे जाणून घेतले पाहिजे होते, कारण तिची गरज ही ठिणगी’ निर्माण करणारी होती. मला असे बाटते की, सामाजिक काम म्हणजे समाजमनामध्ये ‘ठिणगी निर्माण करणे आहे. ‘ठिणगी’ ही प्रेरणा असते. माणसे, पैसा है सारे नंतर आपसूक येतेच. कमळ उगवले की भ्रमर येतो. त्यासाठी वेगळे काही करावे लागत नाही, फक्त चिखलामध्ये गाढून घ्यावे लागते एवढे मात्र नाड़ी!
बरेचदा हे भान सुटते. चांगली सायकल चालते ती चांगल्या ब्रेकमुळे. सतत वाजणारी घंटा, फेसबुक, वेबसाईट हे सारे हवेचं, पण विवेकाचा ब्रेक व चष्मा महत्त्वाचा असतो. ही दृष्टी मिळावी हा या लेखाचा हेतू आहे. वाचकहो आपण वाचणारे सारेचं कार्यकर्ता आहोत, पण पुढच्यास ठेच, मागचा शहाणा व्हावा लागेल. आपण काय करणार त्यापेक्षा आम्ही काय करणार नाही, तेही ठरवावे लागेल. सगळे प्रश्न एका छोट्या जन्मामध्ये नाही सोडविता येणार समविचारी संस्थांना आपला पैसाही व्यराबा लागेल. काही गोष्टी स्वतंत्र, तर काही गोष्टी एकत्र हा फॉर्मुला’ यशस्वी ठरतो. शेवटी उजाडणं हे महत्वाचं, कोंबडा कोणाचा ओरडला हे महत्वाचं नाही. आमच्या कोकणामध्ये एक म्हणं आहे की, ‘बैद्याचं पोरगं हे गालगुंडाने मरता नये’ असे होणे उपयोगी नाही. म्हणून पुढच्या काळामध्ये पैशाचा अभाव व प्रभाव दोन्ही वाईट असतील हे लक्षात ठेवले पाहिजे. याचे भान ठेऊन समाजकेंद्री काम उभे करणे हे आपणा सर्वांसमोर मोठे आव्हान आहे. ते पेलण्यासाठी सगळ्यांना परमेश्वर उदंड आयुष्य व आरोग्य देवो ही प्रार्थना!
डॉ. प्रसाद वामन देवधर ९४२२५९६५००