भारत जमीन का टुकडा नहीं,जीता जागता राष्ट्रपुरुष है।
हे शब्द मनाला कायमच भुरळ घालणारे आहेत. ही कविता,त्या कवितेतील शब्दांची उंची,त्याची व्यापकता यासाठी श्रद्धेय भारतरत्न अटलजी कायमस्वरूपी स्मरणात राहणार आहेत. निव्वळ सत्तेसाठीच राजकारण चाललेल्या देशातले राजकारणी कधी आवडले नाहीत.. पण कळत्या वयात मन जिंकलं ते म्हणजे अटलजी यांनीच. नेता,पुढारी,विचार,तरुणाईवरचा प्रभाव,आदर्श, राजकारण कसं असावं याची प्रचीती यांच्यासारख्या व्यक्तीमत्वांकडे पाहिल्यावर यायची. आजतागायत अनेक भाषणंही ऐकली ती फ़क्त यांचीच. जरा कधी उमेद कमी झाली की आजही संसदेतल्या हळव्या कवीह्र्दय मनाच्या अटलजींच्या जुन्या भाषणांचे व्हिडीयो शोधुन शोधुन पाहतो त्यांच्या त्या ठहराव असल्या आवाजात हार नहीं मानूँगा, रार नहीं ठानूँगा, काल के कपाल पर लिखता मिटाता हूँ.. गीत नया गाता हूँ किंवा मग लोकसभेतील बहुमत सिद्ध करतांना केलेलं भाषण असो,ऐकताना आजही तितकाच सरसरून जिवंत काटा येतो…
काही माणसांचं ’फ़क्त’ असणंच फ़ार असतं कारण तिथं प्रचंड विश्वास असतो. मग हरलो तरी त्याचं काही वाटत नाही तसं माझ्यासाठी अनेक वर्ष राजकारणातून निवृत्ती घेतलेल्या अटलजींचं असणं होतं. आज विद्यमान भारतीय जनता पार्टी चे भव्य स्वरूप बघून त्यांना नक्कीच अत्यानंदच झाला असता.. संसदेत एका भाषणात त्यांनी छान संबोधन केले “सत्ता का खेल तो चलता रहेगा, सरकारे आयेंगी .. सरकारे जायेंगी.. ..पार्टीया बनेंगी बिखरेगी..मगर ये देश रेहना चाहिये.. इस देश का लोकतंत्र रेहना चाहिये” खडे बोल आणि प्रसंगी हळवं मार्गदर्शन करतील ते अटलजी आजही यु ट्युबवर बघतांना जवळचे वाटतात…गेल्या शतकाने बरेच महाने नेते पाहिले असतील पण देशाला देव मानना-या.. विरोधकांनांही वंदनीय अशा या शतकातला एकमेव अखेरच्या अजातशत्रू भारतरत्न अटलजी यांना बघण्याचे भाग्य आपल्या पिढीला लाभले आहेत. त्या महान व्यक्तीमत्वाला शत: शत: वंदन !! शेवटी माणूस देह रूपाने नसला तरी त्याचे शब्द हे कायम सोबत करत असतात आणि त्यातच आज त्यांचे अजरामर काव्यापैकी एक..
भारत जमीन का टुकडा नहीं,जीता जागता राष्ट्रपुरुष है।
हिमालय इसका मस्तक है, गौरीशंकर शिखा है।
कश्मीर किरीट है,पंजाब और बंगाल दो विशाल दो कंधे है।
विन्धाचल कटि है,नर्मदा करधनी है।
पूर्वी और पश्चिमी घाट,दो विशाल जंघाएँ है।
कन्याकुमारी इसके चरण है,सागर इसके पग पखारता है।
पावस के काले-काले मेघ,इसके कुंतल केश हैं।
चाँद और सूरज इसकी आरती उतारते हैं।
यह वंदन की भूमि है,अभिनंदन की भूमि है।
यह तर्पण की भूमि है,यह अर्पण की भूमि है।
इसका कंकर-कंकर शंकर है,इसका बिंदु-बिंदु गंगाजल है।
हम जिएँगे तो इसके लिए,मरेंगे तो इसके लिए।
मरने के बाद भी गंगाजल में बहती हुई
हमारी अस्थियों को कोई कान लगाकर सूनेगा तो
एक ही आवाज आयेंगी- भारतमाता की जय
-अटल बिहारी वाजपेयी.
http://sarveshfadnavis.blogspot.com/2021/12/blog-post_25.html
#SadaivAtal #AtalBihariVajpayee #ataljayanti