भुजबळांचा माता सरस्वती व साडेतीन टक्कयाचा जळफळाट.

भुजबळांचा  माता सरस्वती व साडेतीन टक्कयाचा जळफळाट.

 आर्थर जेल मध्ये जेलवारी करणाऱ्या माजी मंत्री छगन भुजबळ यांनी दि.27 सप्टें रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये म. फुले समता परिषदेच्या कार्यक्रमात सरस्वती मातेचा अपमान करणारे वायफळ वक्तव्य केल आहे भक्ति व शक्तीची उपासनेचा काळ असलेल्या शारदीय नवरात्र काळात देवी चा अपमान करून शाळा मध्ये  सरस्वती व शारदा मातेची पूजा कशाला हवे ? जीला आम्ही पाहिले नाही आम्हाला शिकविले नाही, शिकविले असेल तर फक्त साडेतीन टक्के लोकांना आम्हाला दूर ठेवले त्यामुळे त्यांची पूजा कशाला करायची ? अशा प्रकारचे हिंदू देवतांचा अपमान करणारे वक्तव्य  करून नव्या वादाला सुरुवात केली आहे तसेच आपल्या वक्तव्या मधुन त्यांनी साडेतीन टक्के अर्थात ब्राम्हण समाजाला लक्ष करण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे स्वतःला समाजात पुरोगामी,सेक्युलर प्रस्थापित करायचे असल्यास हिंदू देवीदेवतांची टिंगलटवाळी करण्याची स्पर्धा सुरु आहे  त्या स्पर्धे मधूनच छगन भुजबळ यांनी नवरात्र मध्ये देवीचा अपमान करणारे वक्तव्य करून संपूर्ण हिंदू समाजा सह छगन भुजबळ यांना मतदान करणाऱ्या हिन्दुचा सुद्धा अपमान आहे  सुप्रिया सूळे,छगन भुजबळ पासून अमोल मिटकरी यांच्या सह राष्ट्रवादी कांग्रेस मधील अनेकांचा साडेतीन टक्के विषयाचा जळफळात अधून मधून उफाळून येत असतो या पूर्वी पुणेरी पगडी, पेशवाई,छत्रपतीची निवड,देवाचा बाप आणि सातारा येथील सभेतील मुक्ताफळे लक्षात घेतली तर राष्ट्रवादी नेत्यांचे मनसूबे प्रकर्षाने जाणवतात व जे त्यांच्या पोटात असते तेच ओठावर येत असते अशा मानसिकते मधुनच  छगन भुजबळ यांनी शाळा मधुन सरस्वती मातेचे फोटो काढणारे व साडेतीन टक्कयावर भाष्य करणारे वक्तव्य केले आहे त्यामुळेच त्यांच्या सरस्वती व शारदा माता व साडेतीन टक्केच्या जळफळाट विषयी थोडा विचार करणे या वेळी अगत्याचे ठरणार आहे .

                           छगन भुजबळ यांनी साडेतीन टक्के शब्द प्रयोग करुन ब्राम्हण समाजाला लक्ष करण्याचा प्रयन्त केला आहे त्यामध्ये देवेंद्र फडणवीस पुरोगामी महाराष्ट्राच्या सत्ते मध्ये सगळ्यांचा करेक्ट कार्यक्रम करून पूर्ण ताकदीने परतल्या मुळे भुजबळ सह अनेकांचा जळफळाट झालेला आहे  भुजबळाच्या जळफळाटीला देवेंद्र फडणवीस यांच्या सत्तेची किनार सुद्धा आहे त्यामुळेच त्यांनी माता सरस्वती व साडेतीन टक्के हा विषय उकरुन काढला आहे परंतू त्यांनी उपरोक्त प्रमाणे बेताल वक्तव्य करतांना भिडे वाड्या तील शाळा सावित्रीबाई यांनी सरस्वतीच केलेली स्तुती लक्षात घ्यावयास पाहिजे होती  इतिहास तपासयाला पाहिजे होता कारण म. फुले व सावित्री बाई फुले यांनी सुरु केलेल्या शिक्षण कार्या मध्ये साडेतीन टक्के समाजाचा सुद्धा खारीचा वाटा आहे म. फुले व सावित्रीबाई यांनी दि.1ऑगस्ट 1848 रोजी  पुण्यातील बुधवार  पेठेमध्ये मुलींची शाळा सुरु केली होती ती शाळा साडेतीन टक्के असलेल्या भिडे माणसाच्या मालकिच्या वाड्यात म्हणजे भिडे वाड्यात सुरू केली होती त्यामध्ये एकूण सहा मुली होत्या (1) सोनू पवार ,2) दुर्गा देशमुख,3)जानी करडोले,4) माधवी थत्ते,5) सुमती मोकाशी, 6)अन्नपूर्णा जोशी  या सहा मुलींच्या जातीचा विचार केल्यास चार मूली साडेतीन टक्के असलेल्या ब्राम्हण समाजाच्या होत्या एक मुलगी धनगर व एक मुलगी मराठा समाजाची होती पण उदात्तीकरण मात्र फातिमा व शेख उस्मान यांचे केले जात आहे तसेच त्यांनी दूसरी शाळा दि.3 जुलै 1851 रोजी साडेतीन टक्के असलेल्या अण्णासाहेब चिपळूणकर यांच्या  बुधवार पेठेतील घरात सुरु केली होती व फुले दांम्पत्यास सहकार्य करणाऱ्या पैकी साडेतीन टक्के असलेल्या समाजातील एक सखाराम परांजपे होते म.फुले यांनी दत्तक घेतलेला व आपली संपत्ती त्यास दान दिली तो यशवंत हा मुलगा ब्राम्हण स्त्री च्या पोटी जन्मलेला होता तसेच म. फुले यांनी आपले मृत्युपत्र दि.19 जुलै 1887 रोजी रजिस्ट्रर केले होते व  मृत्युपत्रावर सेवाराम शिवराम तिवारी नावाच्या ब्राम्हणाची स्वाक्षरी होती उपरोक्त इतिहासाचा मागोवा घेतल्यास  म.फुले व सावित्रीबाई यांनी सुरु केलेल्या शिक्षण कार्यात साडेतीन टक्के समाजाचा खारीचा वाटा होता हे अधोरेखित होतो तसेच म.फुले यांना अपेक्षित असलेले कार्य पुढे महर्षि कर्वे व रानडे यांनी केलेल पण राजकीय फायदा साठी आपण इतिहास विस्मृत करून फातिमा ,शेख उस्मान यांचे उदात्तीकरण करून साडेतीन टक्केचे राजकारण करीत आहोत शेवटी छगन भुजबळ यांना सरस्वती, शारदा माता व साडेतीन टक्कयाचा जळफळाट का आहे ? हा विचार करावा लागेल.

 

-अशोक राणे, अकोला 9423658385

अशोक राणे

स्तंभ लेखक, माजी सदस्य-महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, महाराष्ट्र शासन.

Comments (0)
Add Comment