कोरोनाचा असाही अनुभव

अनुभव

कोरोनाचा असाही अनुभव.

धीचं करोना बिरोना काही होणार आहे, आस माहित असत त आम्ही इथे आलोच कशाला आसतो.” असं इंडियन स्टोर मध्ये भेटलेल्या मराठी काकू मला सांगत होत्या. इंडियन स्टोर यासाठी कि मी अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनाच्या ग्रीन्सबोरो या शहरात राहते. तर त्या काकू या सगळ्या परिस्थितीला वैतागलेल्या दिसत होत्या. त्या भेटीत आम्ही एकमेकांचे नंबर शेअर केलेत आणि दोघीही आपापलं समान घेण्यात व्यस्त झालोत.

घरी आल्यानंतर माझ्या डोक्यात विचार यायला लागलेत. त्या काकू इथे कधी आल्या असतील, त्यांचे कुठे फिरायला जायचे ठरले होते का?, किंवा त्या कुठे जाऊन आल्या आसतील का? आसे प्रश्न माझ्या डोक्यात येत होते. त्या दिवशी त्यांच्या सोबत त्यांचा मुलगा असल्याने, त्या त्यांच्या मुलाकडे काही दिवसासाठी आल्या आहे हे कळत होत. त्या दिवशीच्या त्यांच्या वावरण्य वरून त्या इथे पहिल्यांदाच आल्या आहेतं हे जाणवत होतं. त्या काकूंचा वय ६० ते ६५ च्या दरम्यान असाव आस मला वाटते. या वयात एखाद्या नवीन जागी जाऊन जुळवून घ्यायला किती त्रास होत असेल. केवळ जागाच नवीन नाही, तर हे सगळ जगच त्यांच्या साठी निराळं आहे. इथले लोकं त्यांची भाषा हे सगळाच त्यांच्या करता नवीन आहे. त्यात भर म्हणजे करोना मुळे कुठे फिरायला जाणा तर सोडाच, पण घराबाहेर वॉकला जाण सुद्धा बंद झाल आहे. त्यामुळे त्या घरात कंटाळल्या असतील असं मला वाटत होतं. शेवटी नराहावता दुसऱ्या दिवशी मी त्यांना फोन केला आणि त्यांना माझ्या मनात येतील ते प्रश्न विचारलेत, आमचा गप्पांचा कार्यक्रम बराच वेळ चालला.

त्यांच्याशी बोलताना मला कळलेकी त्या त्यांच्या मुलाकडे आल्या आहेत. त्यांचा मुलगा पाच सहा वर्षापूर्वी अमेरिकेत शिक्षणासाठी आला होता. तो आता इथेच नोकरीला लागला. शिक्षण आणि नोकरी यामुळे  त्याला भारतात जाणा जमला नाही. त्यामुळे काका काकूच त्याला भेटायला आलेत.  गेले सहा महिने झालेत ते इथे आहेत. खरतर tourist Visa हा सहा महिन्यान करताच valid आसतो. काका काकूंची परत जाण्याची तयारी झालीच होती पण मधातच करोनाच सुरु झालं. करोनाची सुरवात अमेरिकेत झाली तेव्हा कोणत्याच प्रवासावर बंधनं नव्हती. परंतु प्रवासात इतर लोक आणि काका काकूंचा वय हे लक्षात घेता त्यांच्या मुलानी त्यांना पाठवलं नाही. त्यांच्या मुलाने घेतेलेला निर्णय खरच योग्य आहे आणि कोणीही हाच निर्णय घेतला असता.

त्यावेळी विचार आला कि काकू आधीच इथल्या सगळ्या परिस्थितील कंटाळल्या होत्या. भारतातल्या सारखा इथे चार मंदिर असतील किंवा शेजारी पाजारी आपण जाऊन बोलू आस काही नसतं. काका काकू जेथे राहतात त्या सोसायटीत क्वचितच भारतीय असतील पण आजून त्यांची कोणाशी ओळख झाली नाही. त्यामुळे बोलायला कोणी नसल्याने ते आजुनच कंटाळले आहेत. बाहेर आता थंडी नसली तरी करोना मुळे कुठे जाण देखील बंद झाला आहे. करोनाचा प्रसार पाहता त्यांना आजून इथे चार पाच महिने तरी काढावे लागणार आहेत.  

असे कितीतरी जणं इथे वेग वेगळ्या कारणांनी आले असतील आणि इथे आडकून पडले असतील. कोणी ट्रेनिंगला एक दोन महिन्या साठीच आल असेल, तर कोणी आपल्या मुला मुली कडे काही दिवांसाठी आला असेल. त्यांचे भारतात काही प्लान्स ठरले असतील कोणी आपल्या मुलाबाळांना सोडून आले असतील. त्या सर्व लोकांचे परत जाने निदान चार पाच महिन्या साठी तरी लाबंले आहे. इथे काही कामा निमित्त्य आलेले लोकं आणि त्यांची मायदेशी वाट पहाणर्या लोकांची काय अवस्था झाली असेल हे त्यांच त्यांनाच ठाऊक. सध्या स्थितीत अमेरिकेत करोनाचे रुग्ण इथे खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. हि परिस्थिती आणखीन  किती दिवस राहील काही सांगता येणे कठीण आहे. त्यामुळे शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे आणि हे संकट लवकर संपू दे अशी देवाजवळ प्रार्थना करणे हेच आपल्या हातात आहे. (photo – naukaridotcom & google)

  • धनश्री पंडित नानोटी, अमेरिका.

धनश्री पंडित नानोटी

लेखिका ह्या अमेरिकेतील ग्रीन्सबोरो ह्या शहारच्या रहिवासी असून, सामाजिक विषयाच्या अभ्यासक आहेत.

Comments (0)
Add Comment