देश हाच देव आणि संविधान हाच धर्म

लेख

” देश हाच देव आणि संविधान हाच धर्म”

पण  बदनाम करण्याचे षढयंत्र कितपत योग्य ?

हिंदुस्थानच्या सर्वोच्च असलेल्या संसदेच्या दोन्ही सभागृहाने एन.आर.सी. (राष्ट्रीय नागरीक रजिस्टर)  आणि सी.ए.ए (नागरिकत्व संशोधन अधिनियम २०१९) कायदा बहुमताने पास केला आहे घटनेच्या तरदूती नुसार व चौकटमध्ये अधीन राहून सदर कायदा केंद्र सरकार देशात लागू करणार आहे हिंदुस्थानला धर्मशाळा होण्यापासून वचविणारा हा कायदा असून शक्ती सपन्न हिंदुस्थानसाठी देशाच्या उज्वल भविष्य आणि सुरक्षेसाठी कायद्याची कठोरपणे अंमलबाजवणी होणे आवश्यक आहे परंतु देशातील विरोधी पक्ष विशेषता कांग्रेस,डाव्या विचारसारणीच्या राजकीय पक्ष ,शहरी नक्षली,नक्षल समर्थक एन.आर.सी .आणि सी.ए.बी. कायदा मुस्लिम विरोधी असल्याची बतावणी करून मुस्लिम समाजात भीतीचे वातावरण निर्माण करीत असून  कायद्याला विरोध करण्यास सुरुवात केली आहे अशा विरोधातून देशात दंगल सदृश्य परिस्थीती निर्माण केली जात आहे  वास्तविक सदर कायद्याची  जन्मदाता कांग्रेसच आहे याचा सुद्धा विचार करावा लागणार आहे                    दोन  वर्षांपूर्वी दिल्लीच्या जे.एन. यु मधील नक्षल समर्थक तुकडे गँगने  “आझादी” च्या घोषणा देऊन देशविरोधी आणि देश गद्दाराच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली होती देश गद्दार,नक्षलीचे उघड समर्थन केले होते आता त्याच   ” आझादी” च्या घोषणा देत  शांतिदुतांनी दिल्लीच्या  जामिया मिलिया इस्लामीया  विद्यापीठा मधून सि. ए बी च्या विरोधात  हिंसक आंदोलना द्वारा हिंसेने सुरुवात केलेली आहे त्याची आग देशाच्या इतर भगत पोहचली आहे                                                                                            

           आपल्या देशात  आपणास  न पटणाऱ्या गोष्टी विरुध्द आंदोलन करणे देशातील प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे पण हिंसा करणे ,सरकारी मालमत्ता नुकसान करणे हा गुन्हा आहे तसेच देशातील कायदा आणि सुव्यवस्था राखणे सामाजिक एकता जपणे,सार्वजनिक मालमत्तेची सुरक्षा करणे प्रत्येकाचे कर्तव्ये आहेत  याचा विसर पडून दिल्लीच्या जामिया मधील शांतिदुतानी सुरू केलेली  हिंसेची आग आता  देशातील प.बंगाल,आसाम,महाराष्ट्र उत्तरप्रदेशच्या २५शहरात दंगली घडविण्यात आल्या आहेत ज्यामध्ये  लखौन, गोरखपुर ,बुलंदशहर, मेरठ दिल्ली येथे हिंसेचा अतिरेक झालेला आहे महाराष्ट्रातील बीड,परभणी, हिंगोली मध्ये सरकारी मालमत्तेचे जाळपोळ करण्यात आलं आहे तसेच या आंदोलना वेळी पोलिस सुरक्षा यंत्रणावर जीवघेणे  हल्ले मोठ्या प्रमाणात करण्यात आले  कर्नाटकात मंगलोर ,उत्तर प्रदेशातील लखनौ, दिल्ली  येथे शांतिदुत असलेल्या आंदोलका कडून सरळसरळ पोलीसावर समोरा समोर दगडफेक करण्यात आली  सार्वजनिक स्थानी दगडफेक, करून पोलिस स्टेशन जाळणे, मीडियाच्या मोबी व्हॅन जाळपोळ करण्यात आली  आहे देशात सुरू असलेल्या जाळपोळीचे प्रकार लक्षात घेतले तर आंदोलन स्थळी दगड,पेट्रोल,लोखंडी पाईप,पेट्रोल बॉम्ब कसे उपलब्द होते ? म्हणजे आंदोलनाच्या निमित्ताने  पोलीस यंत्रणा आणि मीडियाच्या व्हॅनवर हल्ले करणे दंगल घडविणे पूर्व नियोजीत असल्याचे निष्पन्न होते  त्यामुळे पोलीस आणि मीडिया वरील हल्ल्याचे मास्टर माईंड कोण आहेत याचा शोध घेणे व कोणतीही परवा न करता कडक कारवाई आवश्यक आहे  तसेच आंदोलनामध्ये देण्यात आलेल्या घोषणाबाजीचा ,हिंसेचा बारीक विचार केल्यास या हिंसे मागे रोहिंगे समर्थक ,देश विरोधी मानसिकता, समाजात भेद निर्माण करून अराजकता निर्माण करणारा मेंदू कार्यरत असल्याचे लक्षात येते त्यामुळे समाजाने हे सत्य ओळखून  विरोधाकांचा कांगावा लक्षात घेण्याची आवश्यकता आहे  सी.ए. बी. च्या समर्थनार्थ जागरूक नागरिकांनी सरकारच्या पाठीशी उभे राहण्याची सुद्धा  गरज आहे देशात कायद्याच्या विरोधात काही मूठभर लोक, काही सेलिब्रेटी, लेखक ,बुद्धिजीवी असतील पण कायद्याच्या समर्थनात देशभरात  देशभक्ताचा फार मोठा वर्ग असून त्याच प्रदर्शन सुद्धा झाले पाहिजे किंवा प्रदर्शन करण्याची आता वेळ आलेली आहे तसेच पोलीसा वरील हल्ले ,मीडियाच्या जाळलेल्या व्हॅन प्रकारावर बेगडी सेक्युलर जमात, मानवअधिकार कंपनी गप्प का आहे ? याचा विचार करण्याची गरज आहे                                                                                                                                                                    देशात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह “देश हाच देव आणि संविधान हाच धर्म” अशा शुद्ध विचाराने उत्तम कार्य करीत आहेत जनताजनार्दन सुद्धा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे पण बेदाग प्रतिमेचे धनी असलेल्या या जोडीला बदनाम करण्यासाठी विरोधीपक्षांनी एन.आर.सी ,सि. ए. बी ला विरोध करण्याच्या  आंदोलनाच  हत्यार हाती घेतलं आहे आणि त्यामधून  केवळ मोदी शाह यांचा विरोध  करण्यासाठी सर्व खटाटोप मांडला गेला आहे तसेच  विरोध करण्याचे एकमेव कारण म्हणजे नरेंद्र मोदी-अमित शहा यांना  वैचारिक किवा राजकीय टक्कर देण्याची क्षमता उरलेली नाही किवा त्यांचा सामना करणारा  राजकीय नेता देशात दिसत  नाही त्यामुळे देशहित बाजूला सारून केवळ रोहीग्या मुस्लिमाच्या हितासाठी आणि मोदी शाह यांना बदनाम केले जात आहे तसेच अशा विरोधा मधून देशविरोधी शक्ति देशात अराजकतेच वातावरण निर्माण  केले जात आहे सोबतच  कांग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि इतर राजकीय नेते हिंसेला थांबविण्याच आवाहन करण्या ऐवजी हिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या मुलाखती मीडियाला देऊन वैचारिक गोंधळ निर्माण करीत आहेत राजघाट वरील सत्याग्रह आणि राहुल गांधी यांचं वक्तव्य तसेच ममता बॅनर्जी यांची घोषणाबाजी सामान्य लोकांची दिशाभूल करणार आहे या सर्व पार्श्वभूमीवर सी.ए. बी च्या विरोधा मधून जाणीवपूर्वक शांतिदुता कडून सुरक्षा यंत्रणा,   पोलिस मीडिया यांना लक्ष का करण्यात येत आहे ? हल्ले का केले जात आहेत, पोलीस,मीडियावर हल्ल्याच्या मागील षढयंत्र कोणाचे आणि सेक्युलर मीडिया ,मानवअधिकार कंपन्या का मुंग गिळून का गप्प बसले होते याचा विचार करण्याची आवश्यकता आहे शेवटी “देश हाच देव आणि संविधान हाच धर्म ” या तत्वाने काम करणाऱ्या सरकारला बदनाम करण्याच षढयंत्र सुरू आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही —–   

– अशोक राणे, अकोला, ९४२३६५८३८४

अशोक राणे

स्तंभ लेखक, माजी सदस्य-महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, महाराष्ट्र शासन.

Comments (0)
Add Comment